Skip to main content

छकु

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 14/11/2018 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
छकु एकदा एक गंम्मत झाली.... माझी आईच शाळेत गेली. प्रयोग वही अपूर्ण म्हणून... हातावर पट्टी देखील ख्खाली; इंग्रजीच्या स्पेलिंगची; प्प्रॅक्टिस तिने नव्हतीच् केली... सरांनी 'ढ़ढ्ढोबा' म्हणताच मात्र, हिरमुसली झाली! 'छकुला नाव सांगिन....' अस मनातच म्हणाली; तेवढं म्हणून मग... माझ्यासारखीच खुश झाली. 'सारखा सारखा अभ्यास... मग खेळायचं कधी आम्ही? तुम्ही मोठे झालात..... आमच्यासाठी काही?' खूपसारं खेळून मग खूप खूप दमली; घरी येऊन एकदम 'हुश' करुन बसली. 'भूक लागली ग खूप छकु... खायला काय आहे? शूज काढून दे न....' म्हणे मी दमले आहे. 'अग तू आई नं... मग मी काय खायला देऊ?' म्हंटलं... शाळेत मिच जाईन... मला राहु दे फ़क्त छकु!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3090
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छकुला छकुच राहू द्यावी. :) Sandy

"ढढ्ढोबा" शब्दाशी कितीतरी वर्षांनी पुनर्भेट झाली.

छकूसारखीच निरागस कविता