Skip to main content

<<गाळलेली हात भट्टीची>>

लेखक कुंदन यांनी गुरुवार, 12/03/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
गाळलेली हात भट्टीची>> लेवुन तवंग नवसागराचा, दारु होती तेलकट|| न पोलिसांचे डोंगर आडवे न एक्साईज चे किल्ले रासवट|| देशीच्या बारची दारं उघडी सताड उद्याचा दिवस आहे रात्रीच्या पल्याड|| बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा|| शिलगावुनी सिगारेट मारला एक झुरका|| सोडा/पाणी टाकुन घेणे मला कधी ते जमणेच नाही || फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4626
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

वा! या विडंबक पंथात तुम्हीच बाकी होते.... --अवलिया

In reply to by अवलिया

हेच म्हणतो. बाकी .. लैभारी कुंदन... ! लगे रहो !

In reply to by दशानन

सहमत. देर से आये, लेकिन आये तो सही!!!

दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी हाहाहा, मानलं हो कुंदनभौ तुम्हाला! (अवांतरः ही घ्या उपकारांची परतफेड!) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

कुंदनशेठ, तरीच तुम्ही सात्विक कट्ट्याला का टांग देता ते आता कळलं. मैदानात स्वागत आहे. जबरदस्त. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कट्टा का टाळला गेला ते आत्ता कळाले हो ;) बाकी विडंबन झकासच हो कुंदनभौ ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

सुंदर विडंबन.... चला अजुन एका विडंबकाची एंट्री .... बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा|| पेक्षा बरोबर हवी खरी , साथ खारट मीठाची खारे दाणे किंवा फुटाणे , अन ग्लास हवा काचेचा|| असे बरे वाटले असते. ;)

In reply to by शेखर

खरे तर देशी आणी हातभट्टी ह्यामध्ये खुप फरक आहे. खारे दाणे , फुटाणे वगैरे माल मिळतो देशी थर्र्या मध्ये आणी हातभट्टीच्या अड्ड्यावर फक्त सुकलेल्या मिरच्या आणी काळे मिठ असते. प्यासा चा शेजारी ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

उंटाला पण मदिरेची तहान लागते तर!!! ;) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

In reply to by मदनबाण

उंटाला पण मदिरेची तहान लागते तर!!! आणी पीउन झाल्यावर विडंबन ही करतो उंट !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विडंबनकारांची संख्या दिवसेदिवस अशीच वाढत राहो.

अजुन एक विडंबन.... चालु द्या मस्तच मज्ज्या येत आहे..... बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा|| वा क्या बात है

फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||
लज्जत कशी आहे बघावी म्हंतो? कवा बसायच? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by कुंदन

बिलाची लज्जत तुमी चाका आमी भट्टीच पघतो. फारतर लिज्जत पापड आमी पघतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अरे वा...... एक से बढकर एक चल रहा यहा तो :) मज्जा येतेय सॉलीड !! दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी........ हे तर झकासच ......! लगे रहो लोक्स :)

In reply to by जयवी

मस्त! कुन्दन जी..... :) बाकी, उन्टालाही मदिरेची तहान लागते.... हेच खरं! ;) ;) ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कुंदन....यु टू?????????? =)) आयला, काय लिहलंय, काय लिहलंय! अशक्य आहेत बॉ मंडळी!! लढ बाप्पू लढ! अवांतरः आयला, ह्या कवितांना एक अप्पर सर्किट लावा बॉ! ट्रेड व्हॉल्युम गपागप वाढत चाललाय आणि पंगा असा की बोंबलायला त्यातलं काडीभरही कळत नाय आमच्यासारख्या दगडांना :( -(बी ग्रुपमध्ये चवल्या-पावल्या गुंतवणारा) ध मा ल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

जबरा..! मान गये भिडू... आपला, (मदिराप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वा !!! आपला (कोक ऑण द रॉक्स प्रेमी) टार्‍या भयंकर आता मार खायच्या आत पळायला हवे

भारी झालंय विडंबन ... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाहवा झकास जमले आहे विडंबन. :) एक लंबर. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984