श्रीगणेश लेखमाला - || केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ||
|| केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे || अर्थातच 'DIY' ## Do It Yourself ##
हे बडी!! व्हॉट्स अप ड्यूड!! गोइंग कूल!! ओह शिट यार!! इंग्लिश शब्दांच्या या अतिक्रमणाला जरी 'वेळेची गरज' असं म्हणून आपण 'वेळ मारून नेली', तरी एक खंत कायमची मनात राहते... खंत आपल्यातील अस्सलपणा हरवत चालल्याची, खंत मातीच्या धुंद करणाऱ्या वासाची जागा कुठल्यातरी इंपोर्टेड बॉडी स्प्रेने घेतल्याची, खंत अस्सल देशीपणाचा खमंग वास देणाऱ्या शब्दांना केवळ गावठी वाटतात म्हणून सोडून दिल्याची. कदाचित हीच 'खंत' टोचत असेल आणि म्हणूनच की काय # 'मिसळपाव' # म्हणजेच # मि.पा.# नावाचं अस्सल मराठी संकेतस्थळ सुरू केलं. 'मिसळपाव' या नावातच एक वेगळा खमंगपणा आहे. एक वेगळा अस्सलपणा आहे. नुसतं नाव घेतलं, तरी कट्ट्यावरची तर्री, ताज्या पावाची लादी, फरसाणाची वाटी, बारीक चिरलेला कांदा आणि या सगळ्यावर आडवा हात मारताना चवीला असणारे चर्चेचे अनेक विषय... तिथे त्या कट्ट्यावर जी चर्चा व्हायची, जे निर्णय घेतले जायचे, जे नियोजन ठरायचं, ते जगात कुठेच एवढ्या अस्सलपणे ठरणार नाही अथवा घेतलं जाणार नाही, पण त्याकरिता मॅकडी, पिझा, कॅफे आणि बर्गर सोडून 'मिसळपाव'वर आडवा हात मारायलाच जायला पाहिजे. कदाचित संसाराच्या तथाकथित जबाबदार्या सांभाळताना अथवा पेलताना ह्या कट्ट्यापासून आपण जर दूर दूर जाऊ लागलो, मनात असूनही मिसळीवर ताव मारतानाचा चर्चेचा आडवा हात फिरेना, त्यामुळेच मिसळपाव ही कट्टा संस्कृती जिवंत राहण्यासाठी ती चर्चा, तो अनुभवांचा फड घरबसल्या सगळ्यांना मिळण्यासाठी 'मिसळपाव' हे अद्ययावत मराठी संकेतस्थळ सुरू केलं असावं. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती आज 'मिपा'वर आहेत आणि विविध विषयांवर त्यांचे लेख, माहिती आणि चर्चा मिपावर सढळ हाताने वाढलेली मिळते. आज १२व्या वर्धापनदिनानिमित्त मलाही माझा अनुभव लिहायची संधी मिळाली, हे माझं भाग्यच आहे . मिपाबद्दल प्रशांतकडून माहिती मिळाली. प्रशांतची आणि माझी ओळख ICCमध्ये - म्हणजेच इंडो सायकलिस्ट क्लबमध्ये एक इव्हेंटमध्ये झाली. ICCने आयुष्यात खूप काही दिलं, त्याची गणना खरोखर शब्दामध्ये करणं अशक्य आहे. त्यातलाच एक हिरा म्हणजे प्रशांत तायडे! अत्यंत मितभाषी आणि सदा हसऱ्या चेहऱ्याने कोणालाही मदत करायला तयार असणार प्रशांत पहिला की याच्यासारखा आपला मित्र - किंबहुना भाऊ - आहे, हे पाहून अभिमान वाटतो. त्याचं प्रत्येक काम अगदी परफेक्ट असतं, म्हणूनच त्याच्या सायकलिंगची पोस्ट पाहिली की "आला परफेक्ट प्रशांत" असं म्हणत त्याचं नामकरणच 'परफेक्ट प्रशांत' असं करून टाकलं आणि त्यानेसुद्धा दादाने दिलेलं नाव हसत हसत स्वीकारलं. हां, तर सायकलिंगवरून मुद्दाम सांगावंसं वाटतं, ते म्हणजे आमच्या प्रेमाचं चाक सायकलीने फिरवलं अगदी जोरात आणि असं की आता ते काही थांबेल असं मला तरी वाटत नाही. २०१७ साली १४५ किलो वजन घेऊन ICCच्या 'हाइक एन बाइक'च्या इव्हेंटमध्ये मी शरीराचा सगळा डोलारा संभाळात कसाबसा साधारण दहा ते पंधरा किलोमीटर सायकल चालवीत घोरवडेश्वर सर केला.In reply to उत्साहित करणारा लेख! by कंजूस
In reply to अतिशय प्रेरणादायी लेख by सतिश गावडे
In reply to अतिशय प्रेरणादायी लेख by सतिश गावडे
In reply to अतिशय प्रेरणादायी लेख by सतिश गावडे
In reply to उत्तम लेख. by टर्मीनेटर
In reply to मस्त लिहिलंय! by यशोधरा
In reply to मस्त लिहिलंय! by यशोधरा
In reply to भन्नाट लिहिलय by भ ट क्या खे ड वा ला
या गोष्टीतून खूप आनंद घेत राहिलो, कारण त्याशिवाय जगात हीच काय, कुठलीच गोष्ट करू नये.
कधीच कोणाशीही स्वतःची तुलना नाही केली. पण स्वतःबरोबरची स्पर्धा कधीच सोडलीही नाही!
आम्ही पाणी देऊ शकू, पण तहान नाही देऊ शकणार. ती तुमची तुम्हालाच लागली पाहिजे.
आम्ही पाण्याजवळ नेऊ, पण पाणी नाही पाजू शकणार. ते तुमचं तुम्हालाच प्यावं लागेल.
यातून जसे तुम्ही एकटे करायला लागला, तसं त्यातून हजारो करायला लागतील. हे वाचून तुम्ही एकाने जरी आठवड्यातून एकदा तरी स्वतःसाठी उत्तम व्यायाम केला, सायकल चालवली अथवा मस्त पाण्यात डुबकी मारली, तरी मला माझी 'रॉयल्टी' नक्की मिळेल!!
एकंदरीत, खर्या आनंदाची गुरुकिल्ली सापडलीय तुम्हाला आणि ती तुमच्याकडून कधीच हरवणार नाही याची खात्री या लेखातून दिसते आहे :) किंबहुना, त्या किल्लीच्या प्रती काढून तुम्ही त्या इतरांमध्ये वाटत सुटलाय, हे केवळ स्पृहणिय आहे !
भविष्यात अशी अनेक शिखरे काबीज करण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!
In reply to काय भारी लिहिलंय ! असं, "जसे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काय भारी लिहिलंय ! असं, "जसे by डॉ सुहास म्हात्रे
एकंदरीत, खर्या आनंदाची गुरुकिल्ली सापडलीय तुम्हाला आणि ती तुमच्याकडून कधीच हरवणार नाही याची खात्री या लेखातून दिसते आहे :) किंबहुना, त्या किल्लीच्या प्रती काढून तुम्ही त्या इतरांमध्ये वाटत सुटलाय, हे केवळ स्पृहणिय आहे !रच्याकनः शंभर दा लेख वाचुन तुझ्या सोबत राईड करण्यासारखीच मजा आली
In reply to अप्रतिम जिद्द!! by तुषार काळभोर
In reply to भन्नाट लिहिलंय. अतिशय by प्रचेतस
In reply to शंकर भौ... by डॉ श्रीहास
In reply to जबरदस्त... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to जबरदस्त लेख आहे ! अतिशय by चौथा कोनाडा
In reply to हे... कसलं भारी ना ! by प्रभू-प्रसाद
In reply to अप्रतिम. आपल्याला मनापासून by ज्योति अळवणी
In reply to असामान्य! अभिनंदन ...... by सुधीर कांदळकर
In reply to जबरदस्त जिद्द. सुंदर लेख. by पद्मावति
In reply to चपखल उदाहरण by चित्रगुप्त
उत्साहित करणारा लेख!