सुरतच्या वखारीतील बदमाश अँथनी स्मिथ भाग १
लेखनविषय (Tags)
'त्या अँथनी स्मिथपेक्षा जगात इतका नास्तिक नालायक इसम जगायच्या लायकीचा नसावा' हे वाक्य आहे सुरतच्या कौन्सिल ने इस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या ३१ मार्च १६६५ च्या पत्रातील आहे!
गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या Shivaji : His Life and Times या इंग्रजी ग्रंथातून सुरतच्या वखारीतील मुख्य कार्यालयातील हकिकती वाचताना आणखी एका गणंगाची रंजक माहिती हाती आली. ती सादर...
त्यामधून शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीच्या कारवाईची माहिती समजून घ्यायला सोपे जाते.
शिवाय त्या निमित्ताने दोन बंगाली इतिहासकारांच्या मधील मतांतरे समजतात. यातून मेहेंदळे यांनी इतिहासकार म्हणून पुराव्यांचा समतोलपणा साधणारे अभ्यासक म्हणून कसे प्रयत्न केले आहेत ते ही प्रकर्षाने जाणवते.
(घटनेत नाट्यमयता यावी म्हणून खालील घेतलेले लेखन स्वातंत्र्य माझे आहे)
" सगळीकडे धमाके होत होते. घरांना आगीलावून शिवाजीचे सैनिकांनी दुकाने, जडजवाहीर, किमती कापडचोपड जे हाताला लागेल ते सुरतच्या बाजारातून लुटून शिवाच्या समोर आणून टाकत होते आणि परत आणखी आणायला जात होते. मी असा आपल्या स्वालीतील वखारीकडून लपत छपत आपल्या मुख्य इमारतीच्याकडे येत होतो. त्या डच इमारतीपाशी पकडले हो मला! आणि तलवारींचा धाक दाखवून मला घेऊन चालले. वाटेत आणखी काही पकडून घेऊन झाले. हबशी लोकांचा तो नाही काऽऽ तो रेऽऽ काळाकुट्ट फेर्या मारत असतो त्यांच्या देशाच्या राजासाठी, तोही आला गप गुमान! आम्हाला केलं उभं त्या लबाड शिवा समोर. तेवढ्यात सुरतच्या सरदार खानचा वकील पण नेमका तिथे भेटायला आला होता.
'काय रे तुझा सरदार बायल्या निघाला. कुठे लपून बसलाय?' शिवा आणि त्यांच्यात झकाझकी सुरू झाली.
'आम्ही नाही बायले तूच आहेस. सूरतचा माल चोरून नेतोस काय' ? असे त्याने म्हटले. मग अचानक त्या वकीलाने लपवलेला सुरा हातात घेऊन शिवावर हल्ला केला. त्याचा सुरा धरलेला हात शिवाच्या अंगरक्षकाने तलवारीने छाटून टाकला. मग तो शिवाच्या अंगावर कोसळला. दोघे धडपडत उठले. हेऽऽ सगळे रक्ताने भरले शिवाचे कपडे. तिकडे त्या वकिलाचे डोके धडापासून तोडले शिवाच्या रक्षकांनी. रक्ताने माखलेले ते दृष्य पाहून सगळेच घाबरून गेले. पण मी कसला भितोय! शिवाने खवळून आमच्याकडे पहात म्हटले, 'एकेकाला समोर आणा'. अन मग एकाचे डोके उडवले गेले. पुढच्यांना दोन्ही हात तर एकाला उजव्या हाताच्या मनगटाला गमवावे लागले. आता माझी बारी होती. मी धिटाई दाखवून इंदुस्तानीत बोलायचा प्रयत्न केला. माझा उजवा हात तोडण्याची आज्ञा शिवाने केली. आता कारवाई होणार इतक्यात मी डोक्यावरची हॅट काढली अन मला मारूनच टाका. म्हणजे सुटेन'असे ओरडून म्हणालो. ते माझे रूप पाहून शिवाने हाताने थांबवून मला बाजूला केले. अन मी वाचलो! 'हॅट काढल्यावर मला पाहून घाबरला रे तो'!
परत जाऊन मुख्य कौन्सिलर समोर उभा राहिलो तेंव्हा हा आपल्या कडील कैदी पळाला केंव्हा आणि पकडला जाऊन देखील शिवाच्या कचाट्यातून त्याने जीवंत कसा सोडला? म्हणून सगळे चकित झाले राव!
... वरील घटना आपल्या मित्रांना तो रंगवून सांगत असे. ते सुरतेच्या मुख्यालयातील एक निवासी पाद्री रेव्हरंड एल इस्कालियट ऐकून होता. ती हकीकत त्यानी आपल्या मित्राला पत्राद्वारे कळवले. ते मेहेंदळे यांनी शोधून ग्रंथात नोंदले.
... सुरमा भोपाली अंगात संचारला असावा अँथनी स्मिथच्या!
...
जिगरबाज अँथनी स्मिथची आधीची एक एक लफडी पुढील भागात...
भाग १ समाप्त.
प्रतिक्रिया
मनोरंजक हकीगत
आवडलं.पुढचा भाग लवकर टाका
रोचक माहिती. काय काय धुंडाळत
लंडन गॅझेटमधील सुरतेच्या लुटीची वार्ता
ग्रेगोरियन कॅलेंडर..., S font..., उसंडू...
रोचक माहिती! :)
f आणि s
राही, मनवा s की चिंता क्यों सताती है?
हो
येथे पहा
धन्यवाद
शिवाजी महाराजाबद्दल
ट्रंप महाशय....
देव तुमचे कल्याण करो ....