Skip to main content

पार्थीव

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 12/03/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
येते एक बांग मशिदीतून चीरुन शांतीचा पडदा.. अन देवूळी, गोड भुपाळी दंग उठविण्या दगडा...!! अन इथे... परि माणुसकीचे पार्थिव येथे पडले हो बेवारस... कुत्रे एक परि,करुनी तंगडी वरी मुतले त्यावरी, फस..फस..! पंचम्रुतं स्नानं करिश्ये... पुरोहितांचा मंत्र गजर देवळातल्या मुर्ती वरती दह्या दुधाची संतत धार.. इथे.. घोंगवती प्रेतावरती असंख्य माशा किती अंग चोरुनी उभी माणसे. दुरुनच जरा बघती... तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान.. मंदिरात चाले किर्तन... आली आली पोलीसाची, गाडी आली कुठुन करुनी पंचनामा, माणुसकीचा नेले प्रेता उचलुन...!! मंदिरातले संत शिरोमणी गाती अम्रुत वाणी.. ॐ सर्वे भवन्तु सुखीना: सर्वे सन्तु निरामया:..... दिवस संपला त्याचा माझा अन देवळातल्या देवाचाही....!! ॐ शांती : शाती: शांती:
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3874
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

ज ह ब ह र्‍या ! एकदम डोक्यात गेली कविता ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

वास्तवावर नेमके बोट ठेवलंय! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

In reply to by शिवापा

मिपा वरिल माझ्या२५ व्या काव्य पुष्पाला मनापासुन दिलेल्या प्रतिसादा बाद्दल धन्यवाद !! आणि तात्यांचे विशेष आभार..!!!

>>जळजळीत वास्तव हेच म्हणतो. २५ व्या काव्यपुष्पाबद्द्ल अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा !