येते एक बांग मशिदीतून
चीरुन शांतीचा पडदा..
अन देवूळी, गोड भुपाळी
दंग उठविण्या दगडा...!!
अन इथे...
परि माणुसकीचे पार्थिव येथे
पडले हो बेवारस...
कुत्रे एक परि,करुनी तंगडी वरी
मुतले त्यावरी, फस..फस..!
पंचम्रुतं स्नानं करिश्ये...
पुरोहितांचा मंत्र गजर
देवळातल्या मुर्ती वरती
दह्या दुधाची संतत धार..
इथे..
घोंगवती प्रेतावरती
असंख्य माशा किती
अंग चोरुनी उभी माणसे.
दुरुनच जरा बघती...
तुळशी हार गळा
कासे पितांबर
आवडे निरंतर
हेची ध्यान..
मंदिरात चाले
किर्तन...
आली आली पोलीसाची,
गाडी आली कुठुन
करुनी पंचनामा, माणुसकीचा
नेले प्रेता उचलुन...!!
मंदिरातले संत शिरोमणी
गाती अम्रुत वाणी..
ॐ सर्वे भवन्तु सुखीना:
सर्वे सन्तु निरामया:.....
दिवस संपला त्याचा माझा
अन देवळातल्या देवाचाही....!!
ॐ शांती : शाती: शांती:
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3862
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम!
ज ह ब ह
एकदम डोक्यात गेली कविता ! ! !
In reply to ज ह ब ह by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to एकदम डोक्यात गेली कविता ! ! ! by मदनबाण
जळजळीत
हेच म्हणते
In reply to जळजळीत by जयवी
खुप छान
झकास!
दोन भिन्न
अप्रतिम...
आभार!
In reply to अप्रतिम... by शिवापा
भेदक वास्तव
अस्वस्थ करणारी कविता
>>जळजळीत