Skip to main content

फ्रायडे नाईट

लेखक लौंगी मिरची यांनी गुरुवार, 06/09/2018 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार आला कि अगदि सकाळपासुनच ह्याची तयारी चालु असते . सगळ्यात पहिली स्टेप माझी मानसिक तयारी करणे , जी लवकर होत नै . मी फारच आढेवेढे घेते , तो तेवढावेळ माझ्या मागेपूढे गोंडा घोळत असतो . सकाळपासुनच “ आज जरा रीलॅक्स व्हायचय , खुप काम केलं आठवडाभर “ . मी गप्प . परत एक दिड तासांनी ,“ थोडेसे हात पाय दाबुन देतेस का , नैतं तो पेन रीलिफ स्प्रे मारुन दे पाठीवर “ . मी गप्प . मग अजुन थोडा वेळ वाट बघुन ,“ आज रात्री तु मस्त चिकनचा रस्सा बनव , अगदि सेम तुझ्या आई सारखा “ ह्यावर मी फक्त “ ह्म्म “ एवढं बोलते . आजकाल त्याने जास्त युक्त्या काढल्यात . उगाच नॉस्टॅल्जीक व्हायचं , जुन्या मित्रांच्यात मी कसा जॉली होतो ते सांगायचं , ऑफीसच्या कामाने मी किती त्रासलोय ते दाखवायचं . एरवी दिवसातुन मोजुन पन्नास शब्द ( कुटूंबासोबत ) बोलनारा माणुस शुक्रवारी मात्र हजाराच्या आसपास शब्द वापरुन बोलतो , फार कौतुक वाटतं मग मलाही . आठवडाभर ऑफीसमधुन साधा एकहि फोन न करणारा माणुस , शुक्रवारी मात्र चार ते पाच वेळा कॉल करतो , फारच गोड गोड बोलतो . मस्क्यावर मस्का लावतो . सगळं कळत असतं मला पण मी एकदम अनभिज्ञ असल्यासारखं वावरते . फायनली संध्याकाळ होते आणि घरी आल्यावर त्याचे प्रयत्न जोर धरु लागतात . सारखं सारखं किचन मध्ये येणं , उगाच फिल्टर भरणं , टेबल वर प्लेट्स लावणं , ओह्ह माय गॉड . रोज लॅपटॉपवरुन ऊठुन टेबलावर जेवायला येणारा प्राणी ज्याला ताटात काय असणारे याची साधीशी भणकहि नसते तो दर फ्रायडे नाइटला बायकोला कसला भारी मस्का मारतो हे कोणाला जर पहायचं असेल तर माझ्या घरी फक्त शुक्रवारी या . कसला गोड बोलतो . आणि त्याचा मु़ख्य विषय असतो “ माझ्या माहेरची माणसे “ . त्यांचे अक्षरशा गोडवे गातो तो , कुणाकुणाची आठवण काढेल काहि सांगता येत नै . मी काहि लवकर रीस्पॉन्स देत नै , कधी नव्हे ते इतका मस्का लावुन मिळतोय तो का सोडा ? शेवटी तो मेन मुद्द्याकडे आपला मोर्चा वळवतोच , “ ए .. अगं मी तुझ्याशी बोलतोय “ मी : “ बोलना “ तो : “ आज खुपच काम केलं दिवसभर “ मी : “ ह्म्म “ तो : “ आता जॉब चा कंटाळा आलाय “ मी : “ म्हणजे “ ? तो : “ जराही स्वता:साठी वेळ मिळत नै “ मी : “ काढावा लागतो वेळ “ तो : “ आज काढलाय ना “ मी : “ रीअली ? “ तो : “ आज थोडं जागायचच , जरा आरामात होऊ द्यायचं “ मी : “ आज मूड मध्ये दिसतोय्स “ तो : “ हो , एकदम ... मग ? बोलना ? बघ मुलं पण नाहियेत इथं “ मी : “ .......” तो : “ सांगना , घेऊका ?“ मी : “ हो , पण एकच पेग “
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6183
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

:)

हायला हे तर BTM क्लबचे सन्मान्य (emeritus) अध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे दिसतात. BTM -- बायकोच्या ताटाखालचे मांजर

In reply to by लौंगी मिरची

हुजूर मायबाप , तुमचा प्रतिसाद खरे साहेबांच्या नंतर होता . आणि या अडाणी पामराला थोडासा खवचट वाटला , शिवाय तुम्ही विधानसभेची एक टर्म पूर्ण केली आहे पण मिपावरील माझ्या नवतारुण्याच्या धुंदीत ती टर्म दिसलीच नाही त्यामुळे या पामराकडून ती आगळीक घडली तेवढी पदरात घ्या :) :)

:) 'तोलून मापून असेल तर जगून घ्या !' बद्दल उत्तम लेखन !!

काय दारुण अवस्था करून ठेवलीय. अमच्या मित्राकडे त्याची बायको स्टॅाक चेक करून बाटली आणून ठेवते. "काय प्यायची ती इथेच प्या, बाहेर तोंड वेंगाडू नका कुणाकडे." नवऱ्याचा शिंव्व करायचा का भिजका उंदीर बनवायचा बायकांच्याच हातात असतं.

दारू पिण्याने नवरा शिंव्ह होत असेल तर किती शिंव्हाना त्यांच्या शिव्हणी मैत्रिणींसोबत बार मध्ये जाऊन बाटली मागून बाटली रिचवतायत आणि मग रात्री कधीतरी डुलत डुलत घराकडे येतायत हे झेपेल याची थोडी शंका वाटतेय... :P

आठवडाभर राब राब राबून, थोडासा वेळ काढायचा, जगायचं, आरामशीर वाटू द्यायचं कुणामुळे तर एका पेगसाठी एवढं सगळं वाचून गम्मत वाटली आणि नवरा एवढा मूडमध्ये असूनही लेखिका तटस्थ का तेही कळलं. गम्मतशीर

बायकोच्या संमतीने पिलेली अंगी लागते.

हं..या बायकोच्या ताटाखालील बोक्याला मस्का मारुन का होईना दर आठवड्याला प्यायला मिळतंय हे महत्वाचं... झालंच तर एक पेग नेहमी एकच राहत नसेल.. तेव्हा उगाच वाघ सिह इत्याही बनून , गुरगुर करुन शेवटी उपाशीच रहायला लागणार असेल तर त्यापेक्षा ही आनंदाची देवाण घेवाण बोक्याच्या फायद्याचीच की :)