मिपाकरांनो, नमस्कार.. OLX वरुन विक्रीसंबंधात आपली मदत हवी आहे.
सुमारे दोन वर्षांपुर्वी सफरचंदाच्या मोहात पडून मी एक MacBook Pro (A1502) 13-inch लेपटॉप घेतला. मात्र विंडोज वापरण्याची सवय, यत्र-तत्र-सर्वत्र ऑफीसात विंडोज असल्याने, आणि मॅकबूकमधल्या आयओएसशी जुळवता न आल्याने, जवळपास शुन्य वापरानंतर तो परत त्याच्या डब्यात जाऊन विसावला.
मग त्यावर विचार केल्यावर उमगले की आता ह्यास विकून थोडा अडका जोडावा. (लोनच्या EMIचा मॅसेज हा फारच प्रेरणादायी असतो बघा.. ;-) ). म्हणून मग काल त्याला विकण्यासाठी OLX वर अॅड दिली. त्याला आज लगेच एका व्यक्तीचा रिप्लाय आला. सदर व्यक्तीशी व्हॉट्सॅप चॅटले असता कळले की त्याचे व्हॉट्सॅप मधे बिजनेस अकांऊट आहे. ( हा ही एक नवीनच शोध) भाऊंनी मी सांगितलेली किंमत (रु. ७५ हजार ) लगेच कबूल करुन मला सांगितले की हा लॅपटॉप त्यांना त्यांच्या मित्रास भेट द्यायचा असून, ते मागितलेली रक्कम अधिक वर ३००० रुपये 'कुरीयर चार्जेस' म्हणुन द्यायला तयार आहेत. आणि मला माझं पुर्ण नाव, बँक डीटेल्स, फोन नंबर, इमेल वगैरे द्यायला सांगितलं. मित्राचा पत्ता विचारला असता एक नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबरवाला मॅसेज पाठवून 'त्याच्याशी बोलू नका हं.. मला त्याला सरप्राईज द्यायचंय' अशी गळ घातली..
आता ह्यात मला असलेल्या शंका आपणासमोर मांडतो.
१. OLX वरील खरेदी-विक्रीकर्ते verified असतात का? अॅड पोस्टवतांना मला तरी काहीही विचारण्यात आले नव्हते.
२. माझ्याकडे असलेल्या स्पेसिफीकेशन्सचा नवाकोरा मॅकबूक सिंगापूरात जवळपास ९५ हजारात मिळतो. भाऊ मला ७८०००/- द्यायला तयार आहेत. भाऊंनी किंमतीच्या बाबतीत यत्किंचींतही घासाघीस केली नाही.. शंकास्पद आहे.
३. फंड ट्रांसफरसाठी फोन नंबर आणि इमेलची काही गरज आहे का? मला तरी आजपर्यंत गरज भासली नाही, एटीएम वापरुन फंड डिपॉजीट सोडल्यास. त्यातही फक्त मोबाईल नंबर लागतो. इमेल आजपर्यंत कधीच वापरावा लागला नाही.
४. OLX किंवा तत्सम साईट्स वापरुन केलेल्या कारभारामधे काय काय काळजी घ्यावी? कुणास काही वाईट अनूभव?
आपल्या सल्ला / मदतीसाठी आभारी असेन.
वाचने
10193
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला फेक वाटतोय तो. माझा अनुभव
माझा अनुभव
मित्राला द्यायला ७५००० ची भेट थोडा जास्त होतंय .
फोन नंबर (बँक अकाऊंटशी लिंक
आधी रक्कम ट्रान्सफर करायला
In reply to फोन नंबर (बँक अकाऊंटशी लिंक by संजय पाटिल
रोख व्यवहार..
Olx वर फक्त दहाबारा किलोमीटर
रोख व्यवहार करत असाल तर उत्तम
विका बिन्धास्त.. फक्त ही काळजी घ्या
+१
In reply to विका बिन्धास्त.. फक्त ही काळजी घ्या by मास्टरमाईन्ड
भाऊ सरळ दुसरं गिर्हाईक बघा,
+१
In reply to भाऊ सरळ दुसरं गिर्हाईक बघा, by सतिश पाटील
पुनःश्च धन्यवाद..
अनुभव
मी काही दिव्सापूर्वीच OLX वर
मी दोन वर्षांपुर्वी माझी टू
In reply to मी काही दिव्सापूर्वीच OLX वर by विनिता००२
गंडवण्याची केस
एकदम बरोबर.
In reply to गंडवण्याची केस by अमित खोजे
२०१२
In reply to एकदम बरोबर. by मास्टरमाईन्ड
लॅपटॉप
खतरनाक केस आहे, असा थरारक
In reply to लॅपटॉप by अमित खोजे
असे किस्से येऊंदेत...इथली ममा
Create a throwaway account
मिपावर हवा का कुणाला ?
हा हा हा..
In reply to मिपावर हवा का कुणाला ? by चित्रगुप्त
+१
In reply to मिपावर हवा का कुणाला ? by चित्रगुप्त
झेड+ ग्यारंटी हवी असेल तर
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
आयला..
तो मिपा वाचत असावा कदाचित् ;
In reply to आयला.. by चिगो
नोकरी
In reply to आयला.. by चिगो