Skip to main content

सल्ला मसलत

OLX बद्दल सल्ला हवाय..

लेखक चिगो यांनी गुरुवार, 06/09/2018 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, नमस्कार.. OLX वरुन विक्रीसंबंधात आपली मदत हवी आहे. सुमारे दोन वर्षांपुर्वी सफरचंदाच्या मोहात पडून मी एक MacBook Pro (A1502) 13-inch लेपटॉप घेतला. मात्र विंडोज वापरण्याची सवय, यत्र-तत्र-सर्वत्र ऑफीसात विंडोज असल्याने, आणि मॅकबूकमधल्या आयओएसशी जुळवता न आल्याने, जवळपास शुन्य वापरानंतर तो परत त्याच्या डब्यात जाऊन विसावला. मग त्यावर विचार केल्यावर उमगले की आता ह्यास विकून थोडा अडका जोडावा. (लोनच्या EMIचा मॅसेज हा फारच प्रेरणादायी असतो बघा.. ;-) ). म्हणून मग काल त्याला विकण्यासाठी OLX वर अ‍ॅड दिली. त्याला आज लगेच एका व्यक्तीचा रिप्लाय आला.