वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.
ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.
कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!
घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.
तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.
तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.
त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.
मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.
सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.
आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!
तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.
त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.
बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.
डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.
पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.
२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.
खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.
डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ
ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/
डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4
मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.
एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.
--------------------------------------------------------------
(श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.)
एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते.
यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात.
तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा.
https://youtu.be/99iQOs-u_HU
वाचने
164762
प्रतिक्रिया
313
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचनखूण साठवली आहे.
याबद्दल नुकतेच व्हॉट्स अॅपवर
तुमचे निरिक्षण बरोबर आहे.
In reply to याबद्दल नुकतेच व्हॉट्स अॅपवर by मराठी कथालेखक
धन्यवाद
In reply to तुमचे निरिक्षण बरोबर आहे. by शाम भागवत
हो
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
खूप छान काम केलेत हा धागा
मी सध्या follow करतोय.. 8च
महत्वाची गोष्ट, मी खूप
In reply to मी सध्या follow करतोय.. 8च by आनन्दा
झकास.
In reply to मी सध्या follow करतोय.. 8च by आनन्दा
आनंदराव
In reply to मी सध्या follow करतोय.. 8च by आनन्दा
मला वाटते ही आयुष्यभराची
In reply to आनंदराव by सुबोध खरे
मिताहार ही संकल्पना या
In reply to आनंदराव by सुबोध खरे
चहा
In reply to मिताहार ही संकल्पना या by शाम भागवत
तरी पण दोन्ही भाषण नीट ऐका.
In reply to चहा by नाखु
त्या भाषणात चहा बद्दल ही
In reply to तरी पण दोन्ही भाषण नीट ऐका. by शाम भागवत
हे करायचे अहे तर आयुष्यभर, एक
In reply to आनंदराव by सुबोध खरे
अहाहा भागवत साहेब , जब्बरदस्त
मनापासून शुभेच्छा.
In reply to अहाहा भागवत साहेब , जब्बरदस्त by खिलजि
आपल्या समाजात अंगमेहनतीने काम
:) __/\__
In reply to आपल्या समाजात अंगमेहनतीने काम by कंजूस
माझ्या आईने ही भाषणं बघितली
ऋजुता दिवेकर यांचे ऐकल्यामुळे
In reply to माझ्या आईने ही भाषणं बघितली by पिलीयन रायडर
भागवत साहेब,
In reply to ऋजुता दिवेकर यांचे ऐकल्यामुळे by शाम भागवत
चालण्याला सायकल हा पर्याय असू
In reply to भागवत साहेब, by सोमनाथ खांदवे
कंसेप्ट्स वेगळे आहेत दोघांचेही
In reply to माझ्या आईने ही भाषणं बघितली by पिलीयन रायडर
मला वाटते इन्शुलिन तयार करणे
In reply to कंसेप्ट्स वेगळे आहेत दोघांचेही by अनिरुद्ध.वैद्य
याबाबत डॉ. जिचकारांनी प्रथम
In reply to मला वाटते इन्शुलिन तयार करणे by आनन्दा
मधुमेह रक्तदाब वगैरे साठी
In reply to याबाबत डॉ. जिचकारांनी प्रथम by शाम भागवत
वेळ मिळाला की लिहितो.
In reply to मधुमेह रक्तदाब वगैरे साठी by मराठी_माणूस
मधुमेह दोन प्रकारचा असतो.
In reply to मधुमेह रक्तदाब वगैरे साठी by मराठी_माणूस
धन्यवाद
In reply to मधुमेह दोन प्रकारचा असतो. by शाम भागवत
मी वरती शरीर हा शब्द वापरला
In reply to मधुमेह दोन प्रकारचा असतो. by शाम भागवत
दोन्ही व्याख्याने पुर्ण ऐकली.
In reply to मी वरती शरीर हा शब्द वापरला by शाम भागवत
_/\_
In reply to दोन्ही व्याख्याने पुर्ण ऐकली. by मराठी_माणूस
भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर
In reply to माझ्या आईने ही भाषणं बघितली by पिलीयन रायडर
अगदी बरोबर. माझे आई बाबा
In reply to भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर by अनुप ढेरे
मलाही केक वगैरे आवडतात. घरात
In reply to अगदी बरोबर. माझे आई बाबा by पिलीयन रायडर
या बाबतीत मला माझा अनुभव
In reply to भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर by अनुप ढेरे
एकाच जेवणात भात, पोळी, आमटी
In reply to या बाबतीत मला माझा अनुभव by शाम भागवत
:)
In reply to एकाच जेवणात भात, पोळी, आमटी by गवि
ताजे खाणे मिळायला बायकांनीच
In reply to :) by शाम भागवत
बायकोलाच स्वयंपाक करायला
In reply to ताजे खाणे मिळायला बायकांनीच by पिलीयन रायडर
प्रश्न तुमच्या बायकोचा एकटीचा
In reply to बायकोलाच स्वयंपाक करायला by शाम भागवत
:)
In reply to प्रश्न तुमच्या बायकोचा एकटीचा by पिलीयन रायडर
भागवत साहेब,
In reply to :) by शाम भागवत
मी निवृत्त जिवन जगत आहे.
In reply to भागवत साहेब, by चामुंडराय
+१०००
In reply to प्रश्न तुमच्या बायकोचा एकटीचा by पिलीयन रायडर
गवि साहेब,
In reply to एकाच जेवणात भात, पोळी, आमटी by गवि
मि दोन दिवसापुर्विच माझे
मधुमेह सल्लागाराना विचारून तर
In reply to मि दोन दिवसापुर्विच माझे by palambar
सुरक्षीततेला नेहमीच प्रथम
In reply to मधुमेह सल्लागाराना विचारून तर by शाम भागवत
तर सांगायच म्हणजे अशा माणसाने
खूप खूप धन्यवाद. १९९७ नंतर
In reply to तर सांगायच म्हणजे अशा माणसाने by एकुलता एक डॉन
teva khup gardi hoti
In reply to खूप खूप धन्यवाद. १९९७ नंतर by शाम भागवत
उत्तम धागा
हा उपाय केल्याने १५ किलोने
खर आहे तुमचे म्हणणे. तुम्ही
In reply to हा उपाय केल्याने १५ किलोने by सुबोध खरे
माझ्या बायकोच्या एका चेपु
In reply to हा उपाय केल्याने १५ किलोने by सुबोध खरे
__/\__
In reply to माझ्या बायकोच्या एका चेपु by आनन्दा
अनेकदा उद्देश चांगला असूनही
ह्म्म.. असा समज होऊ शकतो खरा.
In reply to अनेकदा उद्देश चांगला असूनही by गवि
म्हणूनच तर अशी शंका येऊ देऊ
In reply to ह्म्म.. असा समज होऊ शकतो खरा. by आनन्दा
तुमचे म्हणणे बरोबर आहे. या
In reply to अनेकदा उद्देश चांगला असूनही by गवि
सविस्तर प्रतिसाद देऊन शंका
In reply to तुमचे म्हणणे बरोबर आहे. या by शाम भागवत
__/\__
In reply to सविस्तर प्रतिसाद देऊन शंका by गवि
दिवेकर विरुद्ध दीक्षीत
मस्त सांगितलेत..
In reply to दिवेकर विरुद्ध दीक्षीत by मराठी कथालेखक
धन्यवाद
In reply to मस्त सांगितलेत.. by आनन्दा
युट्युब वर ज्या लोकांनि वजन
व्वा. छान. शुभं भवतु.
In reply to युट्युब वर ज्या लोकांनि वजन by palambar
डॉ दीक्षितांचे भाषण मी
ऋजुता दिवेकर बाईंबद्दल मला
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
एके काळी त्यांनी लिहिले होते
In reply to ऋजुता दिवेकर बाईंबद्दल मला by पिलीयन रायडर
तूप खाऊ नका असं लिहिलेलं आठवत
In reply to एके काळी त्यांनी लिहिले होते by सुबोध खरे
पहिल्याच पुस्तकात( जे माझ्या
In reply to तूप खाऊ नका असं लिहिलेलं आठवत by पिलीयन रायडर
तूप
In reply to एके काळी त्यांनी लिहिले होते by सुबोध खरे
"पण दोन वेळ च्या जेवणात
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
बाकी ठीक आहे, एक अनुभवाचा भाग
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
याचे कारण आपण वजन कमी करायचं
In reply to बाकी ठीक आहे, एक अनुभवाचा भाग by आनन्दा
तुम्ही अंतर्मना मनाबद्दल
In reply to याचे कारण आपण वजन कमी करायचं by सुबोध खरे
पोट भरल्याची संवेदना नेहमीच
In reply to तुम्ही अंतर्मना मनाबद्दल by शाम भागवत
तुम्ही जिचकारांचा ऑडिओ ऐकला
In reply to पोट भरल्याची संवेदना नेहमीच by सुबोध खरे
नाही पण मिताहार घेतल्याने
In reply to तुम्ही जिचकारांचा ऑडिओ ऐकला by शाम भागवत
मग मात्र मिताहारवाले तज्ञ
In reply to नाही पण मिताहार घेतल्याने by सुबोध खरे
अणू उर्जा ?
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
E =MC वर्ग चा संदर्भ
In reply to अणू उर्जा ? by मराठी कथालेखक
E = MC वर्ग हे सामान्य
In reply to अणू उर्जा ? by मराठी कथालेखक
E = MC वर्ग हे सामान्य
In reply to E = MC वर्ग हे सामान्य by सुबोध खरे
धन्यवाद!
युट्युबवर दिलेल्या लिंकमध्ये
जरा आणखी शोधा. डॉ.
In reply to युट्युबवर दिलेल्या लिंकमध्ये by कंजूस
चर्चा चालू द्या , आम्ही
मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ.
___/\__
In reply to मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. by पाषाणभेद
सहमत!!
In reply to मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. by पाषाणभेद
सहमत!!
In reply to मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. by पाषाणभेद
मी हा लेख मायबोलीवरपण
हेच :)
In reply to मी हा लेख मायबोलीवरपण by शाम भागवत
डॅाक्टर दीक्षित पाच मिनिट
http://www.akshardhara.com/en/ check events
धन्यवाद. __/\__
In reply to http://www.akshardhara.com/en/ check events by शुभां म.
उत्तम लेख लिहिलाय. मी हे
मिपा उघडल की प्रथम शिफारस हा
भागवत साहेब ,
तो मी नव्हेच.
In reply to भागवत साहेब , by सोमनाथ खांदवे
उपयुक्त माहिती. व्हिडीओ वेळ
माझ्या आईने गेले एक आठवडा हा
हा प्रयोग एक महिना नव्हे तर
In reply to माझ्या आईने गेले एक आठवडा हा by पिलीयन रायडर
ही संधी मी तुम्हाला नक्की
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
अगदी अगदी! ती हे किती दिवस
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
हा प्रयोग एक महिना नव्हे तर
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
माझा पहिलंच वाक्य हे आहे.
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by माझीही शॅम्पेन
हा प्रयोग एक महिना नव्हे तर
In reply to माझा पहिलंच वाक्य हे आहे. by सुबोध खरे
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील.
खरे साहेब तुमचे म्हणणे खरे
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
सहा महिने टिकणे अवघड आहे असे
In reply to खरे साहेब तुमचे म्हणणे खरे by शाम भागवत
खरे साहेब तुमच्या व माशॅ
In reply to सहा महिने टिकणे अवघड आहे असे by सुबोध खरे
माझे सध्या दीड महिन्यात ५
In reply to खरे साहेब तुमच्या व माशॅ by शाम भागवत
खरय.
In reply to माझ्या आईने गेले एक आठवडा हा by पिलीयन रायडर
डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले.
डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे
In reply to डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. by चामुंडराय
वरती एका प्रतिसादामध्ये डॉ.
In reply to डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. by चामुंडराय
वरील प्रकार, एकदा करुन पाहिला
मी आता दोन नाही पण तीन वेळा
झकास. कार्याला शुभेछा. _/\_
In reply to मी आता दोन नाही पण तीन वेळा by मराठी कथालेखक
धन्यवाद
१. दोघेही डॉ. २४ तासांत दोन
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त
In reply to १. दोघेही डॉ. २४ तासांत दोन by शाम भागवत
जिचकरांच्या भाषणात शुगस
In reply to जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त by पिवळा डांबिस
तुमच्याकडून दुजोरा मिळाला.
In reply to जिचकरांच्या भाषणात शुगस by मराठी कथालेखक
असं?
In reply to जिचकरांच्या भाषणात शुगस by मराठी कथालेखक
माझ्या प्रश्नाचा रोख असा होता
In reply to जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त by पिवळा डांबिस
ओके
In reply to माझ्या प्रश्नाचा रोख असा होता by शाम भागवत
एकदाच ऐकून भाषणातले सगळे
In reply to ओके by पिवळा डांबिस
हा VDO फक्त ६ मिनीटे २
In reply to एकदाच ऐकून भाषणातले सगळे by शाम भागवत
पिडां साहेब
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
धन्यवाद
In reply to पिडां साहेब by सुबोध खरे
दुधात लॅक्टोज हि दुग्ध शर्करा
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
मस्त समजावून सांगीतल. _/\_
In reply to दुधात लॅक्टोज हि दुग्ध शर्करा by सुबोध खरे
डॉ. खरेसाहेब
In reply to दुधात लॅक्टोज हि दुग्ध शर्करा by सुबोध खरे
आत्ता घराबाहेर आहे.
मना पासुन धन्यवाद !
_/\_
In reply to मना पासुन धन्यवाद ! by सुचिता१
तरीपण माझी तुम्हाला विनंती
In reply to मना पासुन धन्यवाद ! by सुचिता१
निश्चीत च
In reply to तरीपण माझी तुम्हाला विनंती by शाम भागवत
_/\_
In reply to निश्चीत च by सुचिता१
सध्या आमच्या घरातही डॉक्टर
डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला
In reply to सध्या आमच्या घरातही डॉक्टर by अमर विश्वास
क्लीन डाएट ... हा शब्द खूप
In reply to डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला by शाम भागवत
आणि हो...
In reply to क्लीन डाएट ... हा शब्द खूप by अमर विश्वास
धन्यवाद. _/\_
In reply to आणि हो... by अमर विश्वास