सकाळी सकाळी व्हॉट्सॅप ओपन केले अन प्लॅस्टीकबंदीचे मेसेज धडाधड कोसळायला लागले!
फायनली एकदाची प्लॅस्टिक बंदी झाली . तसे महाराष्ट्र शासनाने गुढी पाडव्याला ( की आधीच केव्हातरी ) घोषित केले होते की प्लॅस्टीक बंद करणार , कारवाई कधी सुरु होते हे च पहाणे फक्त बाकी राहिले होते !
सर्वप्रथम सर्वात महत्वाचे म्हणुन हे एक क्लॅरीफिकेशन :
प्लॅस्टिक बंदी हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे ! खरेतर हा फार पुर्वीच घायला हवा होता पण ठीक आहे देर से आये दुरुस्त आये ! प्लॅस्टिकचा वापर शॉर्ट टर्म मध्ये अत्यंत सुलभ कंव्हिनियंट आणि आर्थिक दृष्ट्या फाय्देशीर दिसत असला तरीही लाँग टर्म मध्ये पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि त्याची मोजावी लागणारी किंमत पहाता हा तोट्याचाच व्यवहार होता !
ट्रेक करताना गडकिल्यांवर पडलेल्या प्लॅस्टिकचा खच पाहुन मन हळहळायचे ! अजिंक्यतार्यावर अगदी लहानपणीपासुन जात असल्याने तिथे जागोजागी झालेली प्लॅस्टिक कचर्याची वाढ अगदी नजरेत भरण्यासारखी होती ! आमच्या पवनामाईतही लोकं प्लॅस्टिकच्या पिशव्यात निर्माल्य अन काय काय भरुन फेकताना पाहिले की डोक्यात तिडीक जायची !
काही समाजसेवी संस्था प्लॅस्टिक गोळा करायचे काम करत होत्या, मी स्वतः एकदा पुण्यातील पाषाण लेक जवळ स्वस्छता करणार्या ग्रुपसाठी वॉलंटीयरींग केले होते तेव्हा मात्र लक्षात आले की प्लॅस्टिक गोळाकरुन सुटेल अशी ही समस्या नाही. त्यासाठी समस्येचेच्या मुळावर घाव घालणे आवश्यक होते ! तस्मात ह्या निर्णयाचे कौतुकच आहे :)
पण
पण एकुणच दंडाची किंमत पहाता आणि दंड कोणाला लावला जात आहे हे पहाता सरकारी हेतु बद्दल शंका उत्पन्न होते ! सरकारचा हेतु पर्यावरणाचे रक्षण करणे हा नसुन सरकारी महसुल वाढवावा हा आहे असे वाटत रहाते . तसेही आपल्या देशात कायदे हे सुव्यवस्थेसाठी नसुन चिरिमिरी गोळाकरण्यासाठी आहेत हे जगजाहीर आहे ! पोलिस सोडाच हो पण आपला साधा आर.टी.ओ. जेव्हा कैच्याकै कारण काडुन तुम्हाला पावती फाडतो त्या पावतीवर स्पष्ट " तडजोडमुल्य " असे लिहिलेले असते ! शुध्द मराठीत मांडवली रेट ! शिवाय त्यांना ते कायदे लागु नसतातच , पोलिस , आरटीओ ह्यांना कित्येकदा हेल्मेट न घालता गाडी चालवलेले पाहिले आहे . दुसरे उदाहरण म्हणजे सुप्रीमकोर्टाने जनहितार्थ म्हणून हायवेच्या पासुन ५०० मिटर अंतरात असलेले दारु चे बार बंद केले , सरकारचा महसुल बुडायला लागला म्हणुन मग सरकारने पेट्रोल च्या टॅक्स् मध्ये वाढ करुन पैसा वसुल केला हे म्हणजे दारु न पिणार्याला देखील भुर्दंड ! थोडक्यात मुळ उद्देश ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह अॅक्सीडेंट कमीकरुन लोकांचे जीव वाचवणे हा होता पण सरकारने त्यात सुध्दा महसुल वाढवण्याचा मार्ग शोधला! इथेही असाच काहीसा प्रकार दिसत आहे ! मुळ उद्देश प्लॅस्टीक बंदी असला तरी त्याचा वापर लोकांना पिळुन पैसावसुल करणे हाच दिसतो. ( वर्षभराने आ.टी.आय खाली , वसुलीचे टारगेट कितीहोते अन दंडाच्या रक्कमेतुन किती महसुल जमा केला ह्याची माहीती कोणीतरी काढायला हवी.) सरकारची अकाऊंटॅबिलीटी काय हे कोठेच स्पष्ट दिसत नाही ! सामान्य माणासाच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली की त्याला दंड लावणार , सरकारी कार्यालयात जर कोणी सामान्य माणासाने प्लॅस्टिकचा वापर निदर्शनास आणुन दिल्यास त्याला दंडाच्या रकमे इतकी रक्कम बक्षीस म्हणुन देणार का ? शहरात कोठेही प्लॅस्टिक कचरा आढळ्यास नगरपरिषदेला , मनपा ला दंड लावणार का ? दंडाचे वसुल केलेले पैसे आधीचे प्लॅस्टिक निर्मुलनाला वापरणार की अकार्यक्षम संपखोर सरकारी कामगारांचे पगार वाढवायला अन तोट्यात असुनही बोनस द्यायला वापरणार ? तर सारांश चर्चेचा मुद्दा म्हणजे मुळ प्लॅस्टिक बंदीचा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असला तरी त्यामागील सरकारी हेतु शंकास्पद आहे असे वरकरणी जाणवत आहे . तुम्हाला काय वाटते ? #उत्तरदायित्वास_नकारलागु # तुकाम्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावेवर्गीकरण
वाचने
45724
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
छापी सुरु झाली देखील !
हे पहा: मुंबईचे आकडे ही आले ३
In reply to छापी सुरु झाली देखील ! by प्रसाद गोडबोले
प्लास्टीक नको म्हणून भरमसाट
अंदाधुंद झाडांची कत्तल होईल
In reply to प्लास्टीक नको म्हणून भरमसाट by यशोधरा
रस्त्यावर , नदी नाल्यात
एक नंबर
In reply to रस्त्यावर , नदी नाल्यात by सोमनाथ खांदवे
मुळात विक्रेत्याने पिशवी द्यावीच का ?
फडणवीसी सरकार हे लोकांचे
काहीही, प्लास्टीक बंदीमुळे
In reply to फडणवीसी सरकार हे लोकांचे by साहना
नियम केला कि तो एखाद्या
In reply to काहीही, प्लास्टीक बंदीमुळे by खटपट्या
काही उनुत्तरीत प्रश्न
In reply to काहीही, प्लास्टीक बंदीमुळे by खटपट्या
त्यांच्या पत्नीद्वारे??
In reply to फडणवीसी सरकार हे लोकांचे by साहना
प्रवासात ओले कपडे कसे
सध्या कॅरीबॅग्जवर लक्श आहे.
दंडाची रक्कम योग्य वाटते
प्लास्टिकचा भस्मासूर
मुदलात हा निर्णय नवीन नाही.
दुर्गविहारी ,
In reply to मुदलात हा निर्णय नवीन नाही. by दुर्गविहारी
+100
In reply to मुदलात हा निर्णय नवीन नाही. by दुर्गविहारी
एक फॉरवर्ड
हेच म्हणतो मी
In reply to एक फॉरवर्ड by दुर्गविहारी
+१००
In reply to एक फॉरवर्ड by दुर्गविहारी
या अभियंत्यांच्या सर्व गोष्टी
In reply to एक फॉरवर्ड by दुर्गविहारी
रस्त्यात पडणाऱ्या खड्डयाना नागरिक कसे जबाबदार आहेत
In reply to या अभियंत्यांच्या सर्व गोष्टी by सुबोध खरे
साहेब इतकं सोपं नाहीये ते
In reply to रस्त्यात पडणाऱ्या खड्डयाना नागरिक कसे जबाबदार आहेत by चारु राऊत
अगदी बरोबर
In reply to एक फॉरवर्ड by दुर्गविहारी
+१११
- नाले सफाई साठी खाबुगिरी करता येत नाही म्हणून संबंधित NGO मार्फत याचिका दाखल करतील काय
- गुटखाबंदी सारखा हा फक्त पैसे उकळायचा राजरोस अवैध व्यवसाय होईल का?
शक्य तिथे प्लास्टिकच्या वस्तूं वापर टाळणारा पर्यायशील नाखु पांढरपेशाआमच्या काळी नव्हती हो
माझ्या कडे १० जुन्या पिशव्या
जुन्या पॅस्टीक पिशव्या
In reply to माझ्या कडे १० जुन्या पिशव्या by भीमराव
प्लास्टिक पिशव्यांनी गटारे
पण...
२,३ परफेक्ट
In reply to पण... by jinendra
प्लॅस्टिक बॅन आणि सरकारी
अंशतः बन्दी हवीच ...
एक शंका.
व्हाॅट अबौट प्लास्टिक मनी?
कोणी एक प्लास्टिक मनी
In reply to व्हाॅट अबौट प्लास्टिक मनी? by यशोधरा
मंजे परत प्रदूषण की ओ काका!!
In reply to कोणी एक प्लास्टिक मनी by डॉ सुहास म्हात्रे
तसं ही
In reply to मंजे परत प्रदूषण की ओ काका!! by यशोधरा
नाय हो ! "कचरा करणे हा आमचा
In reply to मंजे परत प्रदूषण की ओ काका!! by यशोधरा
मंगळवारी रात्री (19 जून)
जपानी लोक वेगळ्या मातीने
In reply to मंगळवारी रात्री (19 जून) by सोमनाथ खांदवे
विलक्षण
In reply to जपानी लोक वेगळ्या मातीने by डॉ सुहास म्हात्रे
जपानी लोक वेगळ्या मातीने घडविलेले आहेत, हेच खरे !
In reply to जपानी लोक वेगळ्या मातीने by डॉ सुहास म्हात्रे
या बाबतीत जगभरात काही देश
In reply to जपानी लोक वेगळ्या मातीने घडविलेले आहेत, हेच खरे ! by अर्धवटराव
उत्तम प्रतिसाद..!
In reply to या बाबतीत जगभरात काही देश by डॉ सुहास म्हात्रे
प्लॅस्टिक बंदीला बहुतांशी
ब्लांकेट बंदी ही जनरली यशस्वी
डिसोप्झेबल डस्टबीन बॅग्स
कुठल्या प्लास्टिकवर बंदी
<<<कुठं काय करायचं त्याची
In reply to कुठल्या प्लास्टिकवर बंदी by गामा पैलवान
प्लॅस्टिकवरची बंदी ही कल्पना
In reply to कुठल्या प्लास्टिकवर बंदी by गामा पैलवान
जी बंदी उत्पादनाच्या टप्प्यात घालायला हवी ती सामान्य ग्राहकाच्या पातळीवर घातल्याने शासनाच्या हेतूविषयी शंका उत्पन्न होते आहे.कुठं काय करायचं त्याची प्राधान्ये सरकारने नीटपणे ठरलेली नाहीत.सरकारच्या प्राधान्यक्रमाबाबत (प्रथम वापरावर बंदी, उत्पादनावर नाही) माझा अंदाज असा... जे उत्पादन अनेक वर्षे चालू आहे त्यावर सरळ सरळ बंदी घालण्यात अनेक अडचणी असतात... त्यातली मुख्य म्हणजे त्या उत्पादनाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या सबळ झालेल्या कारखानदारांचा कोर्टात खटले लावून केला जाणारा विरोध. भारतात असे खटले अनेक दशके चालवून, त्यांच्या आड उत्पादन बिनघोरपणे चालू ठेवणे शक्य असते... अर्थात, अश्या छुप्या कारवायांनी बंदीचा बोर्या वाजवणे शक्य असते व बर्याचदा केलेही जाते. त्याविरुद्ध, त्या उत्पादनाच्या वापराला बंदी घातली तर उत्पादकांवर बंदी नसल्याने त्यांची बाजू कायदेशीररित्या पांगळी होते. तरीही उत्पादकांनी कोर्टात खटला दाखल करून बंदीवर स्टे आणण्याचा प्रयत्न केला आहेच... मुंबई उच्च न्यायालयाने स्टे ला नकार दिल्याने सद्याची बंदी व्यवहारात येऊ शकली... खटला चालू राहीलच ! :) पण... वापरावर बंदी आल्याने व तसेच, काही काळात प्लस्टिकच्या बदली सामग्री वापरून संसाधने (उदा : कागदी/कापडी पिशव्या, बायोडिग्रेडेबल प्लस्टिक, इ) बाजारात येऊन स्थिरावली की बंदी असलेल्या प्लस्टिकचा खप शून्य झाल्याने त्याचे उत्पादन करण्यात उद्योजकांना रस (आर्थिक फायदा) राहणार नाही... त्यामुळे उत्पादन आपोआप बंद होईलच ! "सबळ शत्रूला समोरासमोर तोंड न देता, त्याची रसद तोडून, जेरीस आणून संपवावे", असा शिवरायांनी शिकवलेला गनिमी कावा मला सरकारच्या या कृतीमागे दिसत आहे ! जय महाराष्ट्र ! :)खरंतर जैविक प्लास्टिकच्या
In reply to प्लॅस्टिकवरची बंदी ही कल्पना by डॉ सुहास म्हात्रे
खरंतर जैविक प्लास्टिकच्या संशोधनास उत्तेजन द्यायला हवं.हे आताच उघडपणे केले तर; बंदीने ग्रस्त प्लास्टिक उद्योजक (आणि सरकारला कोंडीत घेण्यासाठी असल्या-नसलेल्या कारणाच्या शोधात असलेले राजकारणी) यांना, "बघा, बघा, हे आमचे उद्योग बंद करून आपल्या बगलबच्च्यांचे उद्योग पुढे आणत आहेत", असा कांगावा करायला कारण दिल्या सारखे होईल. भारतात प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची फॅशन जोरात आहे... तिला नजरेआड करणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, अगोदर आणि सद्याही जैविक प्लास्टिकच्या उत्पादनाकडे काही व्यावसायिक वळले आहेतच, त्यांना या बंदीने अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत आहेच !बरोबर!
In reply to खरंतर जैविक प्लास्टिकच्या by डॉ सुहास म्हात्रे
मी तर यातून बाहेर पाडण्यासाठी
In reply to बरोबर! by जेम्स वांड
.
In reply to मी तर यातून बाहेर पाडण्यासाठी by विशुमित
" चालू सरकार " की " चालू "
In reply to मी तर यातून बाहेर पाडण्यासाठी by विशुमित
जे उत्पादन अनेक वर्षे चालू
In reply to प्लॅस्टिकवरची बंदी ही कल्पना by डॉ सुहास म्हात्रे
जास्तीत जास्त महसूल गोळा
In reply to जे उत्पादन अनेक वर्षे चालू by मार्मिक गोडसे
जे राज्य १५००० कोटी रुपयांचा
In reply to जास्तीत जास्त महसूल गोळा by सुबोध खरे
जे राज्य १५००० कोटी रुपयांचा
In reply to जे राज्य १५००० कोटी रुपयांचा by सुबोध खरे
देशप्रेम , निसर्गप्रेम आणीक
प्लास्टिक बंदीमूळ सामान्य
बघा हे चालतंय काय?
आज घडलेला प्रसंग एकदम ताजा
+१
In reply to आज घडलेला प्रसंग एकदम ताजा by खिलजि
अरेरे
In reply to आज घडलेला प्रसंग एकदम ताजा by खिलजि
आमचीही एक घटना
:-)))
In reply to आमचीही एक घटना by चौकटराजा