घडवणूक शब्दांची!
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.
ही आवक अजूनही सुरुच आहे.
पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.
खालील वाक्ये पहा.
"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."
"पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी"
"पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील."
"अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून!"
अशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे.
अशा भाषेला आपण मराठी का समजावं? मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून? अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत?
मराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर? प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे? याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम "घडवणूक शब्दांची!"
१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द
२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा
३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द
वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!"
आपणही या उपक्रमात सामील होऊ शकता.
हे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल.
या उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता?
१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता.
२) "घडवणूक शब्दांची!" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे बरेचसे सदस्य हे मिपाकरच आहेत.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं व्यनिद्वारे मला पाठवू शकता.
३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास मदत करु शकता.
दर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल.
असाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय?
याचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत.
असा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
अशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल.
सर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.
याद्या
79810
प्रतिक्रिया
148
वर्गीकरण
मिसळपाव
स्तुत्य उपक्रम
काही दिवस आधी मी एका फ्रेंच
आभार
In reply to काही दिवस आधी मी एका फ्रेंच by साहना
चांगला उपक्रम
वमो
In reply to चांगला उपक्रम by वरुण मोहिते
छान उपक्रम. हल्ली सर्वात
अगदी अगदी..
In reply to छान उपक्रम. हल्ली सर्वात by एस
आम्हाला गर्व आहे मिपाकर
In reply to छान उपक्रम. हल्ली सर्वात by एस
आम्हाला गर्व आहे मिपाकर
In reply to आम्हाला गर्व आहे मिपाकर by सतिश गावडे
चांगला धागा . माझे २ पैसे:
रूळगाडी सोडून
In reply to चांगला धागा . माझे २ पैसे: by हेमंतकुमार
कुमार१
In reply to चांगला धागा . माझे २ पैसे: by हेमंतकुमार
कर्णपिशाच्च
In reply to चांगला धागा . माझे २ पैसे: by हेमंतकुमार
मार्मिक
In reply to कर्णपिशाच्च by रमेश आठवले
भारी :)
In reply to कर्णपिशाच्च by रमेश आठवले
रुजवातपत्र
In reply to चांगला धागा . माझे २ पैसे: by हेमंतकुमार
मराठी शब्द आणि आपली लाज
उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच
In reply to मराठी शब्द आणि आपली लाज by हेमंतकुमार
उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच रूढ झालेला असताना आपल्या तोंडी पट्कन 'toilet' च येते.अश्या शब्दांच्या बाबतीत आपण खूपच लाजरेबुजरे आहोत. याविरुद्ध, मलेशियन लोक बघा, क्वालालंपूर आंतरराष्ट्रिय विमानतळावर सगळीकडे चक्क "Tandas (टंडास) असे लिहिलेले आहे.जय टंडास, जय मलेशिया !
In reply to उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच by डॉ सुहास म्हात्रे
"Tandas (टंडास)" म्हणजे
In reply to उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच by डॉ सुहास म्हात्रे
लोकं डंडास मध्ये राहतात :)
In reply to मराठी शब्द आणि आपली लाज by हेमंतकुमार
:-)
In reply to लोकं डंडास मध्ये राहतात :) by चामुंडराय
लाज वाटणे इंग्लिशमध्येही चालू आहेच
In reply to मराठी शब्द आणि आपली लाज by हेमंतकुमार
'स्वछतागृह '= Wash room
In reply to मराठी शब्द आणि आपली लाज by हेमंतकुमार
हल्ली मराठीत कुणीही कुणाला
बातम्या सांगतांना अनेकवेळा '
आजी, आई आणि मुलगी !
ICU
आजकाल कोणी "स्वयंपाक" करत
जारी
इंग्लिशचे मूळ
आधुनिक इंग्लिश चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत (सुमारे ६०० वर्षे) ब्रिटिश राजघराण्याची, सरदार-उमरावांची आणि राजदरबाराची भाषा लॅटिन व फ्रेंच होत्या. तोपर्यंत, हुच्च लोकांत, इंग्लिश बोलणे गावंढळ समजले जात असे ! उत्तम इंग्लिश बोलणार्या पहिल्या इंग्लिश राजाची (Henry III; १२१६-१२७२) ती मातृभाषा नव्हती. Henry IV (१३९९-१४१३) हा इंग्लिश मातृभाषा असलेला पहिला इंग्लिश राजा होता. (अ) औद्योगिक क्रांतीमुळे व (आ) वसाहतवादातील इंग्लंडच्या यशामुळे जसजसे इंग्लंडचे, युरोपच्या व नंतर जगातल्या राजकारणातले महत्व वाढत गेले; तसतसे इंग्लिशमध्ये आयात केल्या जाणार्या शब्दांचा ओघ वाढत गेला. ब्रिटिश साम्राज्य जगभर पसरलेले असल्याने कोणताही एक देश या आयातीस वर्ज्य समजला गेला नाही. तेव्हा सद्याच्या इंग्लिश शब्दांचे मूळ आशियातील व आफ्रिकेतील भाषांत असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. सद्याच्या आधुनिक इंग्लिशमध्ये सुमारे ८०% शब्द (विज्ञान व तंत्रज्ञानासंबंधीत शब्द पकडले तर हे प्रमाण ९०% इतके वर जाते) जगभरातील इतर भाषांतून घेतलेले आहेत... त्यामुळे, या "अनधिकृत जागतिक भाषा" समजल्या जाणार्या भाषेला "उसनी घेतलेली भाषा (borrowed language)" असे गमतीने म्हटले जाते. :) लॅटिन आणि ग्रीक भाषांचा इंग्लिशमधला शिरकाव या भाडोत्री शब्दांच्या आवकीतून झालेला आहे. इथे त्या सावकार भाषांची सूची मिळेल. तेव्हा, दुसर्या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे हे तितकेसे वाईट आहे असे नाही. जी भाषा अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण इत्यादींवर प्रभुत्व मिळवते ती जास्तीत जास्त सहजपणे लोकांच्या तोंडी येते. त्याबरोबरच, हे पण समजून घेतले पाहिजे की, हा भाषेचा प्रवाह उलट दिशेनेही वाहतो... म्हणून तर इंग्लिशमध्ये आशियायी आणि आफ्रिकन भाषांमधील शब्दांचा सहज शिरकाव झालेला आहे !
वाह!!
In reply to इंग्लिशचे मूळ by डॉ सुहास म्हात्रे
भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ
In reply to इंग्लिशचे मूळ by डॉ सुहास म्हात्रे
पुढील पान
In reply to भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ by उपयोजक
पाषाणभेद यांनी
brand ambassador= मुद्रादूत .
संबोध
ज्या नवीन संकल्पना/ संज्ञा
घाटपांडे साहेब बहुधा तुम्ही धागा संपूर्ण वाचला नसावा.
In reply to ज्या नवीन संकल्पना/ संज्ञा by प्रकाश घाटपांडे
मुद्दा समजला पण...
In reply to घाटपांडे साहेब बहुधा तुम्ही धागा संपूर्ण वाचला नसावा. by उपयोजक
ज्ञा.पै.
In reply to मुद्दा समजला पण... by ज्ञानोबाचे पैजार
ठिक आहे...
In reply to ज्ञा.पै. by उपयोजक
बंधो कृपया मजला त्वरेने
In reply to मुद्दा समजला पण... by ज्ञानोबाचे पैजार
कपिलमुनी
In reply to बंधो कृपया मजला त्वरेने by कपिलमुनी
डेव्हिल्स अडवोकेट.
अगदी अगदी
In reply to डेव्हिल्स अडवोकेट. by गवि
थेट बुल्स आय = मर्मभेद.
In reply to अगदी अगदी by राही
बरोबर आहे. "बुल्स आय" असं
In reply to थेट बुल्स आय = मर्मभेद. by कलंत्री
लक्ष्यवेध
In reply to थेट बुल्स आय = मर्मभेद. by कलंत्री
नमस्कार
तुमचं शब्द घडवणाचं कार्यक्रमामुळे महाराष्ट्रीय समुदायालाहीं महाराष्ट्राचं बाहेर राहणार मराठी समुदायालाहीं एकत्र मिळणं शक्य झालं तर उदंड आनंदावाणीं असेल. तुमचं प्रयत्नांस शुभेच्छा..!!
गेलं ३५० वर्षांत मराठी भाषांत भरून शब्द परिवर्तन झालं त्यामुळे महाराष्ट्राचं मराठींतहीं तंजावूराचं मराठींतहीं उदंड व्यत्यास येऊन गेलं आहे. तसं व्यत्यास आलं त्यामुळे तंजावूराचं मराठीहीं महाराष्ट्राचं मराठीहीं दोघेहीं मराठीच असलं तरीपणहीं दोघांला मिळाला साध्य वाटत नाही… त्यामुळे उत्पन्न झालं ते कष्टाला हे वीडियोंत दक्षिणी मराठी वर्णन करलों आहों. दया करून ते वीडियो पहांत.
वीडियोंत्सून एक परिच्छेद...
"तरीपणीं... इतिहास साक्ष आहें.. आमच्या तंजावूर राज्याचं छत्रपति श्रीमद् भोंसलें महाराजांच्या वंशावळींत जन्मलें ते अख्खेहीं राजे-महाराजे संस्कृत भाषावरं उदंड प्रीति करलेंत. आमच्या महाराजांनी संस्कृतांतून लिव्हालापणहीं उदंड प्रोत्साहन करलेंत, स्वतःपणी संस्कृतांतून साहित्य लिव्हलेंत. आणखी एक विषय काय म्हणजे, “संस्कृत भाषा हे एक देवाचं भाषा, तसंच आमचं मराठी भाषापणहीं एक साधु – संतांचं भाषा आहे.. साधु – संतांला कसं देवाचं सोयरिक.. तसं आमचं भाषालापणहीं संस्कृताचं सोयरिक” असं म्हणून सांगतीलं आमचं महाराजा.. त्याच्यामुळं भरून जुनं शब्द, मूळ शब्द आहेंत, आमच्या तंजावूर मराठींत.. गेलं साडेतीनशे वर्षं आम्हीं राहात असाच्या ठिकाणांत कुठंपणहीं मराठी भाषाचं चलनं-वलनं नाहीं तरींपणहीं, मराठी लिवाला-वांचाला येणारं लोकं उदंड उणं असलं तरींपणहीं.. आमचं लोके कित्ती यत्न करून आमच्या जुनं मराठीच्या शब्दांला सांभाळून ठिंवलेंत? हे आमच्या लोकांला उदंड अभिमान, फार गर्व भोगाचं विषय...."
पूर्ण वीडियो पहांत हे ठिकाणांत...!!उपक्रमास शुभेच्छा,
हे काही
युजर
In reply to हे काही by उपयोजक
४१ ते ६८
वि.दा.सावरकर यांच्या भाषाशुद्धी या पुस्तकातून साभार!
लेखाचा आणि लेखकाच्या मतांचा
एकदम चपखल !
In reply to लेखाचा आणि लेखकाच्या मतांचा by वीणा३
आजोबांच्या पिढीचे उपकार
सुनील
In reply to आजोबांच्या पिढीचे उपकार by सुनील
चपखल प्रतिसाद
In reply to आजोबांच्या पिढीचे उपकार by सुनील
अगदी अगदी
श्री सुनील
In reply to अगदी अगदी by राही
चांगला उपक्रम
काही गैरसमज....
भाषा हे केवळ विचारांचे
In reply to काही गैरसमज.... by उपयोजक
४)भाषा हे केवळ विचारांचे
In reply to काही गैरसमज.... by उपयोजक
४)भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.ती बोलीभाषांपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.अनेक भाषा शिकायला नकोत,परक्या शब्दांचं आक्रमण नको.बरेचसे प्रश्न निकालात निघतील.असहमत. sign language तुलनेने क्लिष्ट आणि सर्व विषयांवर बारकाव्यांनी संवाद साधण्यास अत्यंत तोकडी आहे. जर ती सोपी आणि शिवाय परिपूर्ण संवाद साधण्यास योग्य असती तर ती केव्हाच लोकप्रिय झाली असती ! किंबहुना, संवाद साधण्याची प्रक्रिया मूलभूत आवाज आणि खाणाखूणा यानीच झाली. वाढणारा संवाद साधण्यासाथी ती साधने तोकडी पडत असल्याने आणि त्याबरोबरच मानवी ध्वनियंत्राचा विकास झाल्याने, विशिष्ट आवाजांना शब्दरूप देत देत भाषा निर्माण झाल्या... खरे तर ते आवाज म्हणजे ठराविक अर्थ दर्शविणार्या ध्वनीखुणाच आहेत, नाही का ?! त्यापुढे, विकसित मानवी मेंदूने, विकसित ध्वनियंत्र वापरून त्याचे सोने केले ! जे शब्द, व्याकरण आणि भाषा आपल्याला चांगले "फायदा-व्यय* गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)" मिळवून देतात असे वाटते तेच सहज प्रचारात येतात लोकप्रिय होतात... या बाबतीत लहान-मोठे, शिक्षित-अशिक्षित, इत्यादी सर्व मानवी गटांची वागणूक समान असते. तश्या फायद्याची पर्वा न करणारा केवळ एखादा एकांडा शिलेदार अपवाद असू शकतो... आणि बर्याचदा इतरांच्या तो चेष्टेचा विषय झालेला असतो. =========== * या बाबतीत फायदा-व्यय गुणोत्तरामधला फायदा हा केवळ आर्थिकच अस्तो असे नाही... समवयीन आणि/अथवा समविचारी आणि/अथवा सहकर्मी (यांना एकत्रितपणे 'पियर्स' असे म्हणता येईल), आणि ज्यांच्याशी आपला कोणत्याही इतर कारणाने संवाद होत असतो ते लोक; इत्यादींशी सहज संवाद साधण्यासाठी होणारी वेळ व श्रमांची बचतही या गुणोत्तरात सामील असते. याशिवाय, पियर्समध्ये खास (भावनिक जवळीकीचे, वरचढपणाचे, इ) स्थान निर्माण करणारा एखादा शब्द, शब्दप्रयोग अथवा भाषा लकब सहजपणे (किंबहुना) अभिमानाने अंगवळणी पडतात... यातला फायदा म्हणजे सामाजिक महत्वामध्ये होणारी वाढ. या फायद्यामुळेच, विशिष्ट वय-विचार-काम या पायावर तयार होणार्या गटांची एक खास परिभाषा (लिंगो) बनते... आणि त्या गटात सामील झालेल्या प्रत्येकाला तिचा योग्य वापर माहित असणे आवश्यक बनते.हा एक अनुभव (अग्रेषित)
तुमच्या चिकाटीचे कौतुक आणि
In reply to हा एक अनुभव (अग्रेषित) by उपयोजक
मराठी_माणूस
In reply to तुमच्या चिकाटीचे कौतुक आणि by मराठी_माणूस
इंग्लिश भाषेच उत्पनांच्या
In reply to मराठी_माणूस by उपयोजक
मराठी_माणूस
In reply to इंग्लिश भाषेच उत्पनांच्या by मराठी_माणूस
मला असे म्हणायचे आहे की
In reply to मराठी_माणूस by उपयोजक
शिंपल मराठी आहे..
In reply to मराठी_माणूस by उपयोजक
खी खी खी...
In reply to शिंपल मराठी आहे.. by ज्ञानोबाचे पैजार
ओ म्हात्रे सर
In reply to खी खी खी... by डॉ सुहास म्हात्रे
दिसले ते सांगितले... फक्त,
In reply to ओ म्हात्रे सर by ज्ञानोबाचे पैजार
आमच्या मनात काडीचीही शंका
In reply to दिसले ते सांगितले... फक्त, by डॉ सुहास म्हात्रे
सरकारी नियमांचे उल्लंघन होत
In reply to हा एक अनुभव (अग्रेषित) by उपयोजक
वर ते सर्व आणखी तोषाने मला
In reply to हा एक अनुभव (अग्रेषित) by उपयोजक
एक एक करून आत्तापर्यंत जवळ
In reply to हा एक अनुभव (अग्रेषित) by उपयोजक
या व्हिडिओत
परफेक्ट आहे की हो, तुम्हाला
In reply to या व्हिडिओत by उपयोजक
:)
In reply to परफेक्ट आहे की हो, तुम्हाला by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी
In reply to :) by उपयोजक
(हर्षे मॅडमच्या मराठीबद्दल
In reply to :) by उपयोजक
भाषेच्या कुबड्या
नवीन आवक
४. डेटा केबल - वितार (विदा
In reply to नवीन आवक by उपयोजक
हो
In reply to ४. डेटा केबल - वितार (विदा by मराठी कथालेखक
इतरांनीही सुचवावेत
In reply to ४. डेटा केबल - वितार (विदा by मराठी कथालेखक
या परभाषिक शब्दांसाठी मराठी शब्द सुचवा.
Monitor ला दृश्यदर्शक ?
तिकीट च्या धर्तीवर
पेनड्राईव्ह = पांण्डू हवालदार ?
In reply to तिकीट च्या धर्तीवर by श्वेता२४
हा शब्द चालणार नाही
In reply to पेनड्राईव्ह = पांण्डू हवालदार ? by माहितगार
चांगला प्रयत्न. शक्य सगळं आहे
धागा वाचून यष्टिचित झालो.
मी त्रिफळाचित झालो.
In reply to धागा वाचून यष्टिचित झालो. by कंजूस
नवीन आवक २
हार्दिक , ओतार , विदार वगैरे
एडव्हान्स सूचना आम्ही नूतन
ज्या धागा / प्रतिसादम्मध्ये /
दीर्घ उत्तराचा विषय आहे, ते
In reply to ज्या धागा / प्रतिसादम्मध्ये / by मराठी कथालेखक
मला वाटतं मिसळपावसारख्या
In reply to दीर्घ उत्तराचा विषय आहे, ते by माहितगार
मत ज्याचे त्याचे, पण
In reply to मला वाटतं मिसळपावसारख्या by मराठी कथालेखक
पण कुणितरी सारखे सारखे टोकणे
In reply to मत ज्याचे त्याचे, पण by माहितगार
periodic table=आवर्त-सारणी, content=अनुक्रमणिका
सप्तरंगी
In reply to periodic table=आवर्त-सारणी, content=अनुक्रमणिका by सप्तरंगी
मार्दव (politeness)
In reply to सप्तरंगी by उपयोजक
१) “ संघमित्रा संध्याकाळी
मस्त..
In reply to १) “ संघमित्रा संध्याकाळी by रंगीला रतन
:)
In reply to मस्त.. by ज्ञानोबाचे पैजार
अनेक आभार.
In reply to १) “ संघमित्रा संध्याकाळी by रंगीला रतन
:)
In reply to अनेक आभार. by माहितगार
रंगीला रतन साहेब,
In reply to १) “ संघमित्रा संध्याकाळी by रंगीला रतन
लेखनात कॉफी हा फाऊल असलेला
In reply to १) “ संघमित्रा संध्याकाळी by रंगीला रतन
ठिक आहे....
In reply to लेखनात कॉफी हा फाऊल असलेला by डॉ सुहास म्हात्रे
जराशी गम्मत केली हो !
In reply to ठिक आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
कॉफीस मराठीत प्रतिशब्द आहे
In reply to ठिक आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
कॉफी मूळची इथिओपिया, सुदान व
In reply to कॉफीस मराठीत प्रतिशब्द आहे by गामा पैलवान
प्यायची व कोरडी कॉफी
In reply to कॉफी मूळची इथिओपिया, सुदान व by डॉ सुहास म्हात्रे
अर्रर्रर्र तिच्या...हो कि.
In reply to लेखनात कॉफी हा फाऊल असलेला by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येक इंग्लिश शब्दाला अगदी
मळसूत्र हा आधीच प्रचलित आहे
In reply to प्रत्येक इंग्लिश शब्दाला अगदी by मराठी कथालेखक
:) पण कोणता?
In reply to मळसूत्र हा आधीच प्रचलित आहे by मराठी कथालेखक
वरील प्रतिसादात चुकून
वीजेवर चालणारा विद्युत
In reply to वरील प्रतिसादात चुकून by उपयोजक
सर्व प्रतिसाद वाचले. कोणा
गविशेठ, यु गो अहेड, हम
In reply to सर्व प्रतिसाद वाचले. कोणा by गवि
काय हे.. मी तीन चार जणांना
In reply to गविशेठ, यु गो अहेड, हम by प्रचेतस
हम भी है.
In reply to काय हे.. मी तीन चार जणांना by गवि
गविसाहेब
In reply to सर्व प्रतिसाद वाचले. कोणा by गवि
पण तो नतद्रष्ट परभाषेतला मूळ शब्द नको. भले तो तोंडात बसलेला का असेना.पण मी म्हणतो एवढे भारंभार परके शब्द स्वीकारायचा मक्ता मराठीनं कशाला घ्यावा? अहो नवीन मराठी शब्द ही रुळतील की,तोंडात बसतील की.हाकानाका.अहो मालक तंत्रज्ञान रोज
In reply to गविसाहेब by उपयोजक
अहो रंगीला रतन मालक
In reply to अहो मालक तंत्रज्ञान रोज by रंगीला रतन
+१
In reply to सर्व प्रतिसाद वाचले. कोणा by गवि
टंकायला खूप वेळ लागेल. थोडा
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला आहे.
In reply to टंकायला खूप वेळ लागेल. थोडा by खटपट्या
परत नाही लिहीत आता.हा प्रतिसाद वाचा.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
User manual
+१११११
In reply to User manual by मराठी कथालेखक
नवीन आवक ३
brand ambassador
In reply to नवीन आवक ३ by उपयोजक
नवीन शब्द
ब्रेनस्टोर्मिंग
विमर्श
ब्रेनस्टॉर्मिंग साठी ....
त
मस्त धागा