Skip to main content

कुलदिपक भाग ३

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 15/06/2018 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोखले काकूंना पेढे देऊन मेघा घरी परतत होती तोच तिच्या लक्षात आले की " अरेच्चा शर्मिष्ठेच्या घरी पेढे द्यायला तर विसरलेच की मी. काय वेंधळी आहे ना मी!" स्वत:शीच बडबडत मेघा आपल्या प्रिय बालमैत्रिण म्हणजेच शर्मिष्ठाच्या घराकडे वळली. " नलू काकू, शमू आहात का घरी?" दरवाज्यातून हाका मारत मेघा शर्मिष्ठाच्या घरात शिरली. दिवाणखाण्यातून आत जाताना काहितरी अस्पष्ठ कुजबूज तिच्या कानी पडली पण त्याकडे दुर्लक्ष करत ती माजघरात गेली तोच खमंग तळणाचा वास तिच्या नाकात शिरला. " अहाहा काय खमंग वास दरवळतोय नलू काकू! काय तळताय चकल्या का?" " अरे ये ना मेघा आत. होय चकल्या करतेय बग. ये बैस खाऊन सांग कश्या झालेत." नलू काकू म्हणजे शर्मिष्ठेच्या आई बोलल्या. " काकू तुमच्या चकल्या अप्रतिमच असतात. अगदि जिभेवर टाकल्याक्षणी विरघळतात. पण आमची प्रिय सखी कुठे दिसत नाही ती. कुठ गेली म्हणायची स्वारी?" ताटलीतल्या चकल्यांवर ताव मारत मेघाने काकूंना विचारले. "अग ती तिच्या आत्याकडे चाललीये पुण्याला. तिच्या एडमिशनच चालू आहे ना ग MBBS साठी. त्याची पहिली फेरी आहे परवा. मग तिचा आतेभाऊ आलाय तिच्या सोबत जायला." " पण मला तर शर्मिष्ठा काहीच नाही बोलली. येऊ दे ती तिचा चांगला समाचारच घेते." " काय कुणाचा समाचार घेणार राणीसरकार" ईती शर्मिष्ठा. " तुझाच. मला नाही बोलली ते तू पुण्याला चाललीये म्हणून." मेघा लटकेच राग आणत फुरगटली. " अग अचानक ठरल. मी म्हणत होते नको तसही ऑनलाईनच असत ना सगळी प्रक्रिया. पण कुणाल दादा म्हणाला बाबांना की मला तिकडे पाठऊन द्या एडमिशनच पण काम होईल आणि चार दिवस राहिल सुद्धा. खूप दिवस झाले आत्याकडे जाऊन. त्यात जयू आत्याचा मुलगा पण आलाय ग तो पुण्याला असतो ईंजिनीयरींगला. त्याच्या सुट्ट्या संपलेत मग तो येतोय सोबत माझ्या." " अग किती वेळ लावलाय शमू? मामी आवरायला सांग ना ग तिला. मी केव्हाचा......" शर्मिष्ठाचा आते भाऊ वैतागून आत येत बोलत होता तोच समोर पाहून थबकला. त्याचे शब्द तोंडातच विरघळले. ' हिच ती हो हिच. जिला पाहताक्षणी मी माझ मन हरवून बसलो. जिच्या सौंदर्याने माझ्या मनाला मोहिनी घातली. जी परत मला भेटेल की नाही? या विचाराने मी कासाविस होत होतो. ती आज माझ्या समोर आहे. यावर माझा विश्वासच बसत नाही. की ही माझी कल्पना आहे. मी स्वप्नात तर नाही ना? जर हे स्वप्न असेल तर देवा मला या स्वप्नातून सत्यात यायच नाहीये. आणि हे जर सर्व खरे असेल तर अहाहा.' मनातल्या मनात त्याच्या शाब्दिक द्वंद्व चालू होते. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तिच्या सौंदर्याला मनात साठवत होता ' हाच तो जो माझ्याकडे एकटक पहात होता. पण हा ईथे काय करतोय?' मेघा डोळे विस्फारून त्याच्याकडे पहात होती. तिच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ चालला होता...... ( क्रमशः) - ( विप्लव)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2308
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by एस

धन्यवाद. नक्कीच प्रयत्न करेन. २ वर्षा नंतर पुन्हा सुरू केलय लेखन. पुढिल मोठा भाग लवकरच प्रकाशित करेन.