मुस्लीम समाजातील पडदा पद्धती योग्य आहे काय ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
11 Jun 2018 - 12:50 pm

You are not free if you feel the need to hide
Burkha

* Burqa-clad women prone to vitamin D deficiency: Doctors : Syed Mohammed TNN (टाईम्स ऑफ ईंडिया न्यूज नेटवर्क) Updated: Jun 7, 2013, 03:11 IST

** ' ड' जिवनसत्व विषयक अलिकडील कुमार यांचे चर्चा धागे 'ड' जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता (पूर्वार्ध) ; ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता ( उत्तरार्ध)

** सौदी अरेबीयात कार चालवायला परवानगी मिळाली तरी घरातल्या पुरुषाच्या परवानगी शिवाय हॉस्पीटलमध्ये सुद्धा एकटे जाता येत नाही. सौदी स्त्रीयांची न्युयॉर्कटाईम्स कहाणी

** मिपा तथाकतीत पुरोगामी आणि नास्तिकांना आक्षेप घेतल्याने चर्चा सहभाग सोपा जात असल्यामुळे धागा शीर्षक जरासे बदलून घेतले आहे. तथाकथीत पुरोगामी आणि नास्तिक स्वतः पडदा पद्धतीने ग्रस्त असतात असा आमचा सहेतूक दावा आहे ; या दाव्याचे वैचारीक खंडन करून दाखवावे असे त्यां सर्वांना विनम्र आवाहन आहे.

*** हे उदाहरण पुर्नचर्चेसाठी घेण्याचे कारण : तथाकतीत पुरोगामी आणि नास्तीक हिंदू आणि इतर धर्मीय अनीष्ठ प्रथांची तर उहापोह करत असतात , पण शत्रुचा शत्रु आपला मित्र या न्यायाने मुस्लीम धर्मीय अंधश्रद्धा आणि अनीष्ठ प्रथांना आपल्या पडद्याचे वैचारीक संरक्षण देण्याचा जोरकस प्रयत्न करतात. त्यांच्या या अदृष्य पुरोगामी पडदा पद्धतीचे कौतुक करण्यासाठी हा धागा आहे.

तेव्हा तथाकतीत पुरोगामी आणि नास्तिकांना मुस्लिमांमधील पडदा पद्धत कशी योग्य आहे, हिंदूमध्ये सुद्धा कशी पडदा पद्धती आहे/ होती . हिंदू आणि ख्रिश्चन धर्मात पडदा पद्धती असेल तर मुस्लीम पडदा पद्धतीचे समर्थन झालेच पाहीजे . पडदा पद्धतीच्या विरोधक अधिकआंबट शौकीन असतात म्हणून पडदा पद्धतीस विरोध करतात असे विवीध दावे करून मुस्लीम धर्मीय पडदा पद्धतीच समर्थन करून वैचारीक भूकेचे शमन करून घेण्याचे तथाकथीत पुरोगाम्यांना आवाहन आहे.

हे करताना इतर धर्मीय अनीष्ठ प्रथांमागचे ग्रंथ प्रामाण्य कमी होत चालले आहे आणि मुस्लीम धर्मीय ग्रंथ प्रामाण्यही अंधश्रद्धांवर आधारीत आहे ह्याचा सोईस्कर विसर पाडून घेण्याचे आवाहन आहे. असा विसर न पडल्यास त्यांची पुरोगामी चळवळ आणि नास्तिकता प्रगती साधू शकणार नाही हे सत्य ते स्विकारतातच त्यावर पुन्हा पुन्हा शिक्का मुर्तब करणे अत्यंत गरजेचे असते.

पुरोगामी अंधश्रद्धां सांभाळणारी मते मनमोकळेपणाने मांडून सहभाग घ्यावा हे विनम्र आवाहन

*** लेखाचे आधीचे शीर्षक : कुंकू, पडदा आणि संवाद आणि आधीचा मजकुर : ***
पं. जवाहरलाल नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ ईंडिया' (भारताचा शोध) बर्‍याच वर्षांनी पुर्नवाचनास आहे. त्याच वेळी रामायण विषयावरही काही लिहित आहे.

अनुकरणियता हे सुद्धा मानवी स्वभावाचे वैषिष्ट्य असावे. आपण आपल्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या कि शेजार पाजारच्या घराच्या खिडक्या उघड्या रहाणे आणि आपण पडदे लावले की त्यांनीही लावणे - हे माझे बर्‍याच वर्षांचे ऑब्झर्वेशन आहे , बहुधा असे नकळतच घडते. व्यक्तीच्या व्यक्तिगत आणि कौटूंबीक जिवनास प्रसंगी खासगीपणाची गरज असते, त्याच वेळी व्यक्तीस सामाजिक अभिव्यक्तीची सुद्धा गरज असते हे विसरता येत नाही. (पण दुर्दैवाने बऱ्याचदा याचा विसर पडतो अथवा दुर्लक्षिले जाते )

व्यक्तीगत आणि कौटूंबीक जिवनात पडद्याचा प्रवेश खासगीपणाच्या गरजेतून होणे आणि असुरक्षीततेच्या भावनेतून होणे यात फरक असावा. खासगीपणाच्या गरजेतून होणारा पडद्याचा ऊपयोग समजण्यासारखा आहे. पण असुरक्षीततेच्या भावनेतून होणारा पडद्याचा प्रवेश व्यक्तीला स्वतःला , कुटूंबाला आणि सामाजिक व्यवहार , अभिव्यक्तीस आणि समाजाच्या सांस्कृतिक जडघडणीस पोषक असतो का ?

असुरक्षीततेच्या भावनेतून येणारा पडदा प्रत्येकवेळी फिजीकल कापडाचा पडदा असतो असे नाही. त्याची बऱ्या पैकी नम्रतेशी गल्लत केली जाते . कुणाच्या तरी बद्दलच्य आदरातून येणारी नम्रता वास्तूत: मनात बाळगण्याची नैसर्गिक भावना आहे . अपेक्षित नम्रता व्यक्तीचे शारीरिक हावभाव आणि पोशाख आणि वावर कसा असावा अथवा असू नये या बद्दल संकेत आणि नियम या द्वारे लादण्याचा प्रयास समाजातील असुरक्षिततेची भावना बाळगणारे आणि वाढवणारे घटक करता असतात . पण असा प्रयत्न करताना संकेत आणि नियम हा देखावा असतो याचा एकतर विसर पडतो . मुख्य समस्या हा कृत्रिम देखावा अति ताणण्यातून निर्माण होते . मनमोकळ्या संवाद आणि सामाजिक व्यवहारास अडचण निर्माण करणाऱ्या कृत्रिम बंधनांची निर्मिती होते . मनमोकळ्या संवाद आणि सामाजिक व्यवहारास अडचण झाली तरीही मुकाटपणे बंधने पाळली गेलीच पाहिजे अशा अपेक्षा व्यक्ती भवतालची संस्कृती बाळगावयास लागते .

फिजीकल कापड मध्ये नसेल तरीही स्वतःला स्वतःच्या कुटूंबीयांना अथवा स्वसमाजातील व्यक्तींना विवीध बंधनांमध्ये जखडुन टाकले जाते . वर आधी म्हटल्याप्रमाणे मानवी स्वभाव अनुकरणीय असल्यामुळे बर्‍याचदा बंधन हे बंधन आहे हे माहित नसताना अथवा हे बंधन आहे हे माहित असले तरी केवळ अनुकरणातून पाळले जाते .

कुणी स्वेच्छेने अनुकरण करत असेल अथवा बंधन पाळत असेल तर त्यात हरकत काय आहे असा एक मुद्दा उपस्थित केला जातो. यावर अधिक चर्चा खाली पुढे करुयात. तत्पुर्वी पंडीत जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मध्ये भारतात असलेल्या पारंपारीक पडदा पद्धती बद्दल भाष्य केले आहे आहे त्या कडे वळूया . मुस्लिम-अफगाण आक्रमणांचा भारतीय संस्कृतीवर पडलेल्या इष्टानिष्ट प्रभावांबद्दल उहापोह करताना , पडदा पध्दतीच्या माध्यमातून विशेषतः: स्त्रियांना वेगळे ( segregate) करून स्त्रियांवर सामाजिक-एकांत ( seclusion) लादले जाते याकडे जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ ईंडिया ग्रंथातून लक्ष वेधतात .

भारतीय संस्कृतीत पडदा पद्धतीच्या माध्यमातून स्त्रीवर दृश्यता आणि आचरण शुचिता मुस्लिम-अफगाण आक्रमणानंतर अधिक कठोर होता गेली तरी भारतीय राज्यकर्त्या अभिजन वर्गात ती आधीपासून अंशतः पाळली जात असावी याकडे नेहरू जो अल्प निर्देश करतात त्याची बऱ्याच जणांना कल्पना नसते.

रामायणात प्रक्षिप्त भाग बरेच असावेत त्या प्रक्षिप्ततेतही फरक असे कि एका स्त्री विषयक उदार मतवादी प्रभाव जसा दिसतो तसा आजच्या स्त्री वाद्यांना रास्तपणे खटकू शकेल असाही एका प्रभाव आहे . त्याबाबतचे इतर मुद्दे या लेखाच्या कक्षेत येत नसल्याने त्याबद्दल नंतर कधी . रावणवधानंतर सीता जेव्हा रामास भेटावयास पालखीतून येते तेव्हा राम तिला पालखी सोडून पायी येण्यास आणि तिला बघण्यास उत्सुक असलेल्या वानर सेनेस तिला बघता आले पाहिजे असे काहीसे म्हणतो , त्या नंतर स्त्री कोणकोणत्या परिस्थितीत परक्या व्यक्तींसमोर येऊ शकते याचे वर्णन जोडण्याचा प्रयास तो (प्रक्षिप्त ?) श्लोक लिहिणारा कवी चा दृष्टिकोन स्त्री विषयक दृश्य शुचितेने बाधित आहे हे लक्षात येते .

प्राचीन भारतीय संस्कृतीतील स्त्री व्यवहाराची माहिती जातक कथातून अधिक व्यवस्थित पुढे येते त्यात स्त्रीवर व्यवहारात अतिरेकी बंधने असावीत असे दिसत नाही . उलटपक्षी काही बौद्ध जातककथांमधील -त्यांचा उद्देश जीवन अशा दुःखानी भरलेले असते तेव्हा सन्यास श्रेयस्कर असे पुरुषांना सांगण्याचा असला तरीही - पूर्वनिष्कर्षित एडलट्रीच्या वर्णनांनी स्त्रियांच्य बद्दल विश्वासा ऐवजी संशयाच्या वातावरणास हातभार तर लावला नसेल ना अशी साशंकता वाटते . या जातक कथांचा नेमका सामाजिक प्रभाव तत्कालीन समाजावर काय पडला असेल हा अँथ्रोपॉलॉजी आणि स्त्रीवादी समीक्षेच्या दृष्टीने अभ्यासनीय विषय ठरावा . जातककथांशी स्पर्धाप्रक्रियेतून रामायणातील स्त्री विषयक काही दृष्टिकोन जोडण्याचे प्रयत्न प्रक्षिप्त श्लोकातून झाले नसतील ना अशीही एका साशंकता कुठेशीक वाटून जाते . (चुभूदेघे)

स्त्रियांचे स्ट्रिक्ट सेक्लुजन (रोमन) बायझेंटाईन राज्यकर्त्या कुटुंबात चालू होऊन त्यांचा प्रभाव रशियन आणि रशियातून मग अरब पर्शियन संस्कृतीवर पडला असावा असे काहीसे मत नेहरू त्यांच्या पुस्तकातून व्यक्त करताना दिसतात. तर इंग्रजी विकिपीडियावरील व्हेल लेखातील संदर्भानुसार ग्रीस मेसोपोटेमिया असिरिया आणि पर्शिया भागातून पडदा पद्धत व्यवहारात येत गेल्याचा दाखला देताना आणि त्याचा प्रभाव इतर आजूबाजूच्या संस्कृतींवर पडल्याचा संकेत देताना दिसतात .

पडदा पद्धत मुस्लिम-अफगाण आक्रमणांपेक्षा जूनी का असेना, तिचा सर्वसामान्य जीवनातील प्रभाव त्यानंतर पडला यावर सर्व साधारण एकमत होताना दिसते . मुस्लिम स्त्रियांना गोषा आणि बुरख्याच्या आत जखडले गेले तर, हिंदू स्त्रियाही डोक्यावरून पदर , पुरुषांच्या मागून पादत्राणांशिवाय चालणे , आणि परपुरुषांशी संवाद टाळणे अशा संस्कारामच्या बंधनात अडकल्या. विधवा नसलेल्या हिंदू स्त्रीची सांस्कृतिक स्थिती त्यातल्या त्यात बरी होती. त्यांना किमान त्यांच्या मर्यादित परिघात प्रसंग परत्वे का होईना, स्वतःच्या संगीत, चित्र, सामूहिक नृत्य, घरगुती खेळ इत्यादीत सहभाग घेता येत होता. तर मुस्लिम स्त्रीचे सांस्कृतिक अस्तित्व नाकारले जात होते - आणि आजही परंपरावादी, पुस्तकीय दृष्टीकोणांनी बर्‍यापैकी प्रभावित असावे.

मुख्य समस्या पडदा आणि पोशाखांच्या तांत्रिक अडचणीची नाही. अरब-युरोप, इस्लामिक ख्रिश्चन दृष्टिकोनातून प्रभावित वाद , पोशाख आणि पडदा स्वेच्छेने वापरला तर बिघडला कुठे या भोवती फिरताना दिसतो. वस्तूत: प्रश्न पडदा आणि बांधीत पोशाख बंधनामुळे शिक्षण , खेळ , सामूहिक नृत्यादी कला उत्सव आणि व्यवसाय या सर्वच क्षेत्रात वावरताना येणाऱ्या अडकाठीचा आणि स्त्रीच्या निवड स्वातंत्र्याचा आहे हे लक्षात घेणे गरजेचे असावे .

पडदा पद्धती बद्दल नेहरू पुढे काय म्हणतात बघा

I have no doubt at all that among the causes of India's decay in recent centuries, purdah, or the seclusion of women, holds an important place. I am even more convinced that the complete ending of this barbarous custom is essential before India can have a progressive social life. That it injures women is obvious enough, but the injury to man, to the growing child who has to spend much of its time among women in purdah, and to social life generally is equally great. Fortunately this evil practice is fast disappearing among the Hindus, more slowly among the Moslems.

The strongest factor in this liquidation of purdah has been the Congress political and social movements which have drawn tens of thousands of middle-class women into some kind of public activity. Gandhiji has been, and is, a fierce opponent of purdah and has called it a 'vicious and brutal custom' which has kept women backward and undeveloped. 'I thought of the wrong being done by men to the women of India by clinging to a barbarous custom which, whatever use it might have had when it was first introduced, had now become totally useless and was doing incalculable harm to the country.' Gandhiji urged that women should have the "same' liberty and opportunity of self development as men. 'Good sense must govern the relations between the two sexes. There should be no barrier erected between them. Their mutual behaviour should be natural and spontaneous.' Gandhiji has indeed written and spoken with passion in favour of women's equality and freedom, and has bitterly condemned their domestic slavery.

अशी प्रखर भूमिका घेणार्‍या नेहरुंना त्यांच्या स्वतःच्याच पुस्तकपूजक शातंतेत्च्या अनुयायांपुढे बोटचेप्या अनुनयवादी धोरणांपुढे शरणागती घेऊन, स्त्रीयांना प्रतिगामी परंपरांच्या जोखडास बांधलेले ठेवावे लागले हे खेदकारक असावे.

महात्मा गांधींच्या भूमिकेची दखल अशात एका मुस्लीम लेखिकेने घेतल्याचे दिसते.

Gandhi's words are as true today as they were then. The outward pur­dah is bad enough; what is worse is the purdah of minds. My own exp­­erience of enforced burqa has strengthened my antipathy to the notion of veiling and the 'violation' and 'subservience' that inevitably follow. I have come to believe in the axiom: that which is separate is inherently unequal.

Rakhshanda Jalil संदर्भ

डॉ . बाबा साहेब आंबेडकरांनी सुद्धा पडदा पद्धती च्या अनुचितते बद्दल प्रखर भाष्य केले असल्याचे वाचनात आहे . तरी सुद्धा आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारेही समाज-संस्कृती-अर्थ - राजकारणात स्त्रियांना प्रत्यक्षात कितपत समान संधी देतात हा वेगळ्या अभ्यासाचा विषय नक्कीच असावा .

शांततेच्या धर्माचे अपोलोजिस्ट प्रेषितांची पत्नी स्वतः: व्यापारी होती याकडे लक्ष वेधतात; पण व्यापार असो वा सामाजिक व्यवहार आणि सांस्कृतिक व्यवहारांवर येणाऱ्या बंधनांकडे , निवड स्वातंत्र्य नाकारले जाण्याकडे डोळे झाक करताना दिसतात.

Burkha and social exclusion

अर्थात समस्या शांततेच्या धर्मा पुरती मर्यादित नाही ; शिक्षण, खेळ, सामूहिक नृत्यादी कला, उत्सव आणि व्यवसाय , सामाजिक व्यवहारात राजकारण अशा कितीतरी क्षेत्रात आजही अदृष्य पडदा पद्धती बर्‍याच ठिकाणी प्रत्यक्ष पडदे नसले तरीही अस्तित्वात दिसते .

पडदा आणि संवाद सोबत मी कुंकू हा विषय का जोडला आहे ! कुंकू अथवा टिकली हे खरेतर सौंदर्य प्रसाधनाची साधन केवळ एका सांस्कृतिक परंपरा , दुर्दैवाने त्याचा संबंध सौभाग्य म्हणजे पतीचे जिवंत असणे आणि हिंदूइतर लोकांनी धार्मिक असल्याचा समज करून घेतला; म्हणजे पुन्हा एकदा निवड स्वातंत्र्यावर बंधन आले . कुंकवाचा आधार धार्मिक आहे या गैरसमजातून जो वापर होत होता तो कमी होत चालला असेल तर ठीकच पण कुंकू अथवा टिकली या प्रकाराची अंधश्रद्धा विरहित अजून एका उजवी बाजू असू शकते का ? असा विचार कधी कधी मनात येतो .

आय कॉन्टॅक्ट विशेषज्ञ परस्पर संवाद डोळ्यात बघून करताना, ते अवघड गेल्यास कपाळाकडे बघावे असे सूचित करताना दिसतात. शिवाय पुरुषांची नजर खालच्या दिशेने ओघळू नये अशी अपेक्षा सहसा ठेवली जाते. या दृष्टीने कुंकू अथवा टिकलीचा कपाळावरील ठळक रंगाचा टिळा वापर संवाद साहाय्यकारी असू शकेल का ? म्हणजे सहसा आपोआपच लक्ष योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी केंद्रित होण्यास फुलं ना फुलांची पाकळी मदत होऊ शकते का. दुसरे असेही कि स्त्रियांचे पोशाख निवडस्वातंन्त्र्य मान्यच, पण पारंपारिक भारतीय पोशाख, कोणाशी संवाद साधताना आपला पोशाख कसा हाताळायचा याचे, बुरखा प्रणालीपेक्षा अधिक स्वातंत्र्य देत असावा तरी सुद्धा बुरखा पद्धतीस केवळ शब्दपूजा आणि कुणाच्यातरी मानसिक असुरक्षिततेपायी चिटकून राहणे समजणे अवघड जाते .

बुरखा घालून सर्वच सामाजिक व्यवहार अशक्य असतात असा कोणताही दावा नाही; मुख्य मुद्दा शिक्षण, खेळ, सामूहिक नृत्यादी कला, उत्सव, व्यवसाय , सामाजिक व्यवहार, राजकारण या सर्वच क्षेत्रात संवाद साधण्याच्या, एकरूप होण्याच्या स्वातंत्र्याचा आहे आणि आज बऱ्याच क्षेत्रात स्त्रिया नवी कर्तबगारी बजावताना दिसत असल्या तरी तिच्या निवड स्वातंत्र्यास आडकाठी करणारे अनेक -दृश्य -अदृश्य पडदे अद्यापि शिल्लक असावेत .

* ट्विट

Exactly.

You are free to choose: you want to go to heaven or hell?

That’s the choice you’re given as a child before they wrap your head up.

*** ***
If someone tells you their #MeToo story, do you respond by saying NOT ALL MEN ARE SEXUAL PREDATORS

No?

Then stop telling me not all women are forced to wear hijab. I’m aware of that fascinating and insightful basic fact.

ट्विटर हॅशटॅग FreeFromHijab is to fight for the women who ARE compelled

If someone tells you that they’re fighting to cure breast cancer, do you say ALL CANCERS ARE BAD

No?

Then stop telling me all religions/cultures have negative aspects. I’m aware of that fascinating and insightful basic fact.

ट्विटर हॅशटॅग FreeFromHijab are fighting a specific fight

*** ***
When a Muslim defends the hijab, I get it.

When a nonMuslim defends it, I don’t get it at all.

Saying the hijab is just ‘fabric in the head’ is as vacuous as saying a slave in chains just has ‘metal on their wrists’

*** ***
Prescribed modesty clothing is so much more than simply pieces of fabric

It’s a physical representation of the misogyny, subjugation, and dehumanization that many women fight against

*** ***
It’s never about fabric. It’s always about the ideology behind the fabric: women’s bodies are shame incarnate, too dirty, too beautiful, too much, not enough, dangerous, fragile, in need of control. It’s erasure, with “choose your own reason” enforcement.

*** ***
It is their desperate attempt to sound secular. Though constitutionally it is your right to practice the religion the way you want and I would not force anyone to take it off ever. But it is so wrong to glorify it when we know it is either forced or indoctrinated in the system.

*** ***
अजून काही ट्विट दुवे : , , , , ,

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार

* फिजीकल पडदा मागे पडला तरी त्या संस्कृतीचे अंश मागे कसे रहातात या बद्दल पाकीस्तानी लेखिका रफिआ झकारीआ चा पाकीस्तानी वृत्तपत्र डॉन वरील ब्लॉग.

.

.
.
.
.
.
* अजून एक सांशंकता युट्यूब व्हिडीओ

* बुरखा पद्धती बद्द्ल २० प्रश्न युट्यूब

* बुरखा वापरुन नंतर त्यागलेल्या महिला अनुभव वृत्ते : ,

* '१ फेब्रुवारी' नो हिजाब डे ट्विटर हॅशटॅग

* How Are Women Represented in Urdu Print Media? - Huma Kayoom - 8 January 2019

* पर्दा पद्धतीचा सुक्ष्म अर्थशास्त्रीय परिणामा बद्दलचा लेख

* पर्दा डॉक्युमेंटरी बद्दल समिक्षण ,

* Purdah and Polygamy कादंबरी समिक्षण

* Women and the Masjid: The case for mixed prayer spaces

* स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

* आत्मकथन आणि हिजाब विषयी मत

संस्कृतीइतिहाससमाज

प्रतिक्रिया

४८० वाचने अन्‌ प्रतिक्रियाच नाइ. अन्याव. success of some religions is because of women's slavery. and women don’t call it slavery because of beleif system. विंग्लीससाठी क्षमस्व. बिलीफ सिस्टीमवरील व्हिडू पाह्येल आसणच आपन.

माहितगार's picture

13 Jun 2018 - 5:15 pm | माहितगार

सॉर्ट ऑफ सहमत, प्रतिसादासाठी आभार .

शाली's picture

13 Jun 2018 - 10:37 am | शाली

ऊत्तम लेख. आवडला.

कुंकू अथवा टिकलीचा कपाळावरील ठळक रंगाचा टिळा वापर संवाद साहाय्यकारी असू शकेल का ? >>>
हा मुद्दा या अगोदर चर्चेत आलाय का माहित नाही, पण मला मात्र नविन आहे.

माहितगार's picture

13 Jun 2018 - 4:05 pm | माहितगार

...हा मुद्दा या अगोदर चर्चेत आलाय का माहित नाही, पण मला मात्र नविन आहे.

कुंकू गंध अथवा टिकली ह्या मुलतः सांस्कृतिक गोष्टी आहेत , संस्कृती आणि धर्म याची गल्लत करुन हिंद्वेतर लोकांनी धार्मिक समजून वापरणे टाळण्याची गरज नाही असा मुद्दा पुर्वी माझ्याकडुन मांडून झाला असावा.

कुंकू अथवा टिकलीचा कपाळावरील ठळक रंगाचा टिळा वापर संवाद साहाय्यकारी असू शकेल का ? हा मुद्दा मात्र मी प्रथमच मांडला आहे. या पुर्वी ईतर कुणी मांडला असण्याची शक्यता कमी असावी.
हा विषय स्वतंत्र धागा चर्चेचा आहे का ते माहित नाही.

आता ते नेमके मासिक आठवत नाही बहुधा बर्‍याच वर्षांपूर्वीचे काँपीटीशन सक्सेस रिव्ह्यू असावे* , त्यातील एका लेखात संवाद साधताना आय काँटेक्ट कसा असावा या बाबत मार्गदर्शन होते. त्या लेखका (की/खिके) ने समोरच्या व्यक्तीशी म्हणजे ज्याच्याशी संवाद साधत आहात त्याच्या डोळ्यांना त्रिकोणाची एक रेष समजून त्रिकोणाचा दुसरा बिंदू विवीध ठिकाणी कल्पना करण्यास सांगितले होते .

* म्हणजे फॉर्मल कॉन्व्हरसेशन मध्ये त्रिकोणाचा एक बिंदू कपाळावर कल्पना करावा बाकी दोन्ही डोळ्यांना दोन बिंदू कल्पना करावी. काही सेकंदा नंतर काही सेकंदासाठी पापण्या मिटाव्या अथवा नजर दुसरीकडे न्यावी (जसे नाकाच्या टोकावर किंवा संवाद फॉर्मल राहील असे इतरत्र) मग पुन्हा डोळ्यात नजर मिसळून बोलावे असे मार्गदर्शन होते. - नजर अधून मधून जराशी हललीतर रोखून पहात आहेत असे होणार नाही- (आता कपाळावरच्या कल्पना करावयाच्या बिंदूवर गंध अथवा कुंकू टिकली काही असेल तर आयती सोय होते हा माझा विचार आणि अनुभव जो मी या लेखात प्रथमच मांडला)

* त्या लेखातील मतानुसार, समोरच्या व्यक्तीच्या नाकाच्या शेंड्याला त्रिकोणाचा तिसरा बिंदू पकडल्यास आणि कपाळाचाही आंतर्भाव केल्यास असा संवाद सेमी-फॉर्मल साठी उपयूक्त ठरतो.

* मैत्रीपूर्ण संवाद साधावयाचा असेल तर समोरच्या व्यक्तीचे डोळे आणि ओठ असा त्रिकोण कल्पना करुन पहावे .

* समोरच्या व्यक्तीचे डोळे आणि खांदे यांचा त्रिकोण कल्पना करताना तुमचे त्या व्यक्तीशी बर्‍यापैकी घनीष्ठ संबंध हवेत.

* आणि खांद्या खालचा भाग तुम्ही पाहताना अंतर्भूत करत असाल तर खूपच क्लोज रिलेशन हवेत, नाहीतर तुम्ही समोरच्या व्यक्तीस अस्वस्थ करु शकता खास करुन अल्पपरिचीत अथवा फॉर्मल स्त्री-पुरुष संवादात असे करणे अशीष्टपणाचे समजले जाऊ शकते.

माहितगार's picture

13 Jun 2018 - 4:07 pm | माहितगार

...बर्‍याच वर्षांपूर्वीचे काँपीटीशन सक्सेस रिव्ह्यू असावे*

चुभूदेघे

विशुमित's picture

13 Jun 2018 - 5:42 pm | विशुमित

आय काँटेक्ट बद्दल उपयुक्त माहिती.
===

माहितगार's picture

11 Jul 2018 - 8:04 pm | माहितगार

उशीराने का होईना #मॉस्कमीटू ची दखल भारतीय स्त्री पत्रकाराने घेतलेली दिसते. तिचे शेवटचे वाक्य खाली.

There is an urgent need to open up about safety issues that women might face in religious spaces and within the community. Segregation, as advocated by some, is not a solution to issues pertaining to sexual misconduct. Rather, greater visibility of women in religious spaces as well as ensuring gender-parity when it comes to leadership in the same would go a long way in creating a safe environment for women within the realm of religion.

बाकी हा दुवा स्वतःच बोलतो अधिक काय लिहिणे ?

माहितगार's picture

11 Jan 2019 - 2:09 pm | माहितगार

दिना Tokio (हे देवनागरीत नेमके कसे लिहायचे माहित नाही ) एनी वे, दिना Tokio हे सध्याच्या सोशल मिडिया वादळात सापडलेल एक व्यक्तिमत्व. कोण आहे दिना Tokio ? एक युट्यूब आणि सोशल मिडियावर पॉप्युलर असलेली (ब्रिटीश मुस्लिम) हिजाबी मॉडेल जी गेली आठेक वर्षे तिने डोक्यावरील केस आणि कान यांना इस्लामीक पद्धतीने झाकणे युरोपीयन मुस्लीम मुलीत फॅशनेबल बनवले होते, पण गेला काही काळ तीला ह्या हिजाबचा कंटाळा आला आणि विशेषतः लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हिजाब वापरत रहावे हे तिला पटले नाही, म्हणून तिने तिच्या पती समवेत एक युट्यूब पॉडकास्ट रिलीज करून केस न झाकण्याचे स्वातंत्र्य वापरण्याचे घोषीत केले.

एकीकडे हिजाब वापरणे कंपलसरी नाही म्हणायचे पण कुणी हिजाब वापरण्याचे थांबवले तर ट्रोलांनी दबाव तंत्र वापरले जाते त्याचा अनुभव दिना Tokio यांच्या या युट्यूब मधून सार्‍या जगाला दिसला.

काही हिजाबी मुस्लिम स्त्रीयांनी सुद्धा स्वतःचे युट्यूब चढवून दिना Tokio वरील या दबवांचा निषेध केला.