शब्द. ..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
15 May 2017 - 9:28 pm

सगळे शब्द कधी कधी साथ सोडून निघून जातात
दूर दूर रानात एकटे पळून जातात..

मन घिरट्या घालत रहातं वटवाघळांसारखं
पटकन फांदि न मिळणाय्रा..

प्रयत्न करतो मी खूप. शब्दांना पुन्हापुन्हा माझ्या दावणीला बांधायचा.
पण ते गेले एकदा,की जातातच.
पुन्हा परत भेटेपर्यंत!

शब्दांचा हा पाठशिवणीचा खेळ.
हेच माझं अटळ प्राक्तन आहे की काय
असं वाटेपर्यंत...
ते त्याच खेळाचा भाग म्हणून मला करवंदीच्या जाळीअडून डोकावणाय्रा उनाड पोरासारखे लांबून हळूच बघायला लागतात.

मी म्हणतो त्यांना "साल्यांनो, या की लवकर माझ्या गळाभेटीला? का असे दुष्टपणे बघता माझ्याकडे.. लांबून.. अगंतूकासारखे? "

ते ही मग खट्याळपणे उत्तरतात... "अरे गाढवा!, जीवनापासून पळून जाऊ नकोस लांब लांब.. मग आंम्ही तुझ्या बरोबरच राहू सदैव.. कारण , जीवन हाच आमचा प्राण आहे.. आणी सहजता हा श्वास.. "

मी ही समजलो मग... हा उन पावसाचा खेळ आहे... चालायचा असाच! शब्दांना आनंदाने बाय बाय केले.. म्हटलं. .., "हवे तेंव्हा या.. तुम्ही जसे माझे तसा मीही तुमचाच आहे"

हसून निघून गेले ते . जाताना मात्र म्हणाले एव्हढेच... "आठवण आली आमची तर हाक मार हं आंम्हाला! लाजू नकोस!"
==================
अतृप्त. .

मुक्त कविताशांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

15 May 2017 - 9:39 pm | पद्मावति

:) छान लिहिलंय. आवडले.

प्रचेतस's picture

15 May 2017 - 9:45 pm | प्रचेतस

छान लिहिलंत अत्रुप्त.
बाकी तुमच्या शब्दांनी तुम्हास पहिल्याइतकीच साथ द्यावी आणि अशाच उत्तमोत्तम कविता तुमच्या लेखणीद्वारे याव्यात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 May 2017 - 10:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा. बरेचं दिवसांनी आज?

रातराणी's picture

15 May 2017 - 11:09 pm | रातराणी

:)

साथ, बाइबाइ काढा. "आठवण आली अमची तर हाक मार हं अम्हाला! लाजू नकोस!" असं येऊ द्या.

पैसा's picture

16 May 2017 - 9:39 am | पैसा

वा, बुवा!

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 9:44 am | सतिश गावडे

कविता दवणिय झाली आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2017 - 12:32 pm | अत्रुप्त आत्मा

प्रती साद आ दरणीय जाहला आहे. :)

शार्दुल_हातोळकर's picture

16 May 2017 - 11:18 am | शार्दुल_हातोळकर

मस्तच हो गुरुजी.... :-)

बुवांच्या मैतराची प्रतिक्रिया येत नाय तोवर मजा नाय. त्याच्या प्रतिसादाशिवाय कविता म्हणजे चीजशिवाय पावभाजी.

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2017 - 5:32 pm | अत्रुप्त आत्मा

सर्वांसी धन्यवादम्. :)

थोडक्यात ककाय बुवाची प्रतिभा तुंबली आहे, पाटणकर काढा घ्या

अवांतर : कविता अवडली

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 9:12 pm | सतिश गावडे

पावभाजीत चीज पडलं हो
या कवितेचं सार्थक घडलं हो