आयुष्याचा हिशोब साचा
एक कप तिचा,एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
फ्लेवरंही सारखाच
फक्त चाखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा!
माझा आधी संपेल, तिचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक कप तिचा,एक माझा!
एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..!
तिचं सावधपण माझं अंधळेपण
जगण्यातली वागण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक कप तिचा,एक माझा!
गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या!
कधी गुणाकार.. कधी भागाकार
परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..
एक कप तिचा....
==०==०==०==०==०==०==
अत्रुप्त...
==०==०==०==०==०==०==
अत्रुप्त...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10399
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा....क्या बात है.
(No subject)
In reply to वा वा....क्या बात है. by कॅप्टन जॅक स्पॅरो
रच्याकने ते वा वा आईसक्रिम
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
तांब्या "तिचा"पण असू शकतो की
In reply to वा वा....क्या बात है. by कॅप्टन जॅक स्पॅरो
गुर्जी रमले तर :)
श्श्श्श्श्श्श्श्श!!! डिस्टर्ब
In reply to गुर्जी रमले तर :) by मितान
र्रर्रर्रर्रर्रर्र स्वारी बरं
In reply to श्श्श्श्श्श्श्श्श!!! डिस्टर्ब by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओके
खूपच गोड लिहिलं आहे. आवडलं.
मिपाचे शीघ्रकवी...
छान आहे!
इतक्या छोट्या छोट्या कपांतही
तुम्हाला "तिथे जाउन आल्यावर"
In reply to इतक्या छोट्या छोट्या कपांतही by कंजूस
कविमन लागते हो त्याला.
In reply to तुम्हाला "तिथे जाउन आल्यावर" by टवाळ कार्टा
गुर्जीनी पहिल्यांदा
खत्री दिसत आहे आईस्क्रीम.
मस्तच.
असो. =))