मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अद्भुतरस

खरी कविता..

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
त्या खर्‍या कविता..म्हणुनी शब्द कल्पना सांगत नाही. येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?) अश्या कुठे त्या.. थांबत नाही. बोलावुनी वा हाकारुनी त्या ढुंकुन कधिही पहात नाही. आणि घेतले टाळे लावुनी येणे-असता.. रहात नाही. बासरी ,पुंगी..नाद कसाही निश्चित त्यांचे स्वरूप नाही. किंवा स्वये त्या नाद-घेऊनी येतील..त्याचे अप्रुप नाही. वार्‍या समं ते शब्द वाहती कवेत त्यांना घेता..

दे दणादण

निनाद ·
लेखनविषय:
बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण समयसारणी हे निकट हे स्तरण पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण आकाशग मग कुंडल तंतु भारण पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण ग्राभित विदरण का विरुप निःशोण रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

अशांतिचे गाणे... (गीत.)

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
(चाल-​ ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है ) होतोच एकटा मी,राहिन एकटा ही मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि॥धृ॥ तेथून गार वारा,शिडकावतो मनाही निपचीतं शांत निजल्या,बोलावितो तनाही आता कळून चुकले,काहिच शांत नाही॥१॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ शांती कशात आहे?,नक्की कुठे कळे ना! देवात शोधली ती...सुरंहि तिथे जुळे ना! वळले मलाहि तेथे,ती शोधण्यात नाही॥२॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ गेलो तिच्याही पाठी, नक्की कुठे कशी ती? सारी मनुष्य जाती, वेडी तिच्याच साठी कळले ही धावते ती,आमुच्या पुढे..न पाठी॥३॥ मन हे असेच वेडे,सांगेलं गूज गाठी॥धृ॥ सोडून नाद सगळा,ध

रक्तदाब!

अत्रुप्त आत्मा ·
एक अस्तो उच्च रक्तदाब्,आणि एक असतो हुच्च रक्तदाब! उच्च साधा सरळ असतो ,जसा आत..तसाच बाहेर! आणि हुच्च..?? अबबं!!! आम्ही काय बोलावे?... (वरच्या ओळित ,सगळच नै का आलं? ;-) ) उच्च रक्तदाबाला निच्च रक्तदाब पण असतो. पण हुच्च असेल तोच तर तो, फ़क्त हुच्चच असतो! ( ;-) ) उच्च रक्तदाब वाढलेला,चढलेला...कसाही! पण हुच्च मात्र..वाढवलेला,चढवलेला...असाही! उच्चरक्तदाबवाली माणसं..एकदम जातात...सिरियस-वगैरे होत नाहीत.. पण हुच्चवाली..???

<पतंग>

राजेश घासकडवी ·
लेखनविषय:
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
' (चाल - या डोळयांची दोन पाखरे ..) त्या गेंड्याची दोन पावले, फिरतील तुमच्या भवती - पाठलाग ती सदैव करतील, फक्त मताच्यासाठी ..... वर्तन तुमचे, हात असे हो त्या गेंड्याचा थारा सहवासातून हवाच त्याला, नित्यच तुमचा नारा तुमचा परिचय त्यास हो आंदण, बिलकुल मताचसाठी .. भाव देतही असतील काही, पैसा अडक्यातुनी एका मताचसाठी तुमचे धरतील कर दोन्ही आहेत डोळे, क्षणैक प्रीती, ते तर खुर्चीवरती .. .

मी लोकलयात्री

वेल्लाभट ·
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री

AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
काव्यरस
मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो… खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो….

AN ODE TO मिसळपाव ! प्रथम पुष्प

मारवा ·
लेखनविषय:
काव्यरस
मिसळप्रेमींनो !मनोगतींनो ! उपक्रमींनो ! वातानुकुलीत अक्षरींनो ! सर्वसंस्थळसंचारी आंतरजालीय फ़ुलपाखरांनो ! साक्षेपी सात्विक सेन्सॉरी कर्तरीकर्म कुशल संपादकांनो ! किंचीत पक्षपाती आयडीवलयांकीत-स्तिमीत संपादकांनो ! खरया खुरया खोट्या नाट्या भल्या बुरया आयडींनो त्यांच्या डुआयडींनो ! त्यामागील दुर्देवी देवराई निवासींनो ! माहीती जमवुन जमवुन घोळुन रंगवुन माहीतीच्या महामार्गावर माहीतीचा उच्छाद मांडणारया माहीतगारांनो ! स्व-रचित ललित मुग्ध “पुल”कीत गोड गोड लयीत “ललित” लिहत लिहत लेखणी लाल करणारया ललित लेखकांनो!

नवा भिडू..

निखळानंद ·
लेखनविषय:
काव्यरस
मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव.. घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव.. इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव.. सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव.. इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव.. नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव.. मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव.. चुकलो माकलो तर घालू नका घाव.. मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव.. मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव ! - मी इथे नवीन सभासद आहे. इथल्या कोणाशीही मझी ओळख नाही. इथल्या मोजक्याच गोष्टी वाचल्यायत. पण पहाताक्षणी प्रेमात पडतात तसे मी लगेचच इथला सभासद होण्याकडे ओढला गेलोय ! आशा आहे इथला प्रवास रम्यच होइल...