मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अद्भुतरस

ड्रीमकॅचर

चित्रा ·
लेखनविषय:
काव्यरस
काळपट ओट्यावरून पाण्याचा हात फिरवून झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात तिने पाहिले खिडकीबाहेर ते स्वप्न खुणावत अजून उभेच होते - ** पलंगावर टाकून आपले श्रांत क्लांत अंग भिंतींवरून सरकणार्‍या गाड्यांच्या सोबतीने झोपण्याआधी तिच्या लक्षात आले स्वप्न आत येऊ पाहत होते लगबगीने ** उठून तिने स्वप्नांची काढली गाळणी ठेवणीतली लटकावून दिली बेडरूममधील खिडकीवर. कुशीवर मग वळून तिला झोप कधी लागली कळलेच नाही.

( मावळे बुडाले कामी )

अर्धवट ·
शरदीनितैंच्या कविता आम्हाला नेहेमीच आवडतात, त्यातल्याच लेटेष्ट बावळे बुडाले धामी यावरून प्रेरणा घेउन.. मावळे बुडाले कामी //एक // धडक उरावर तप्त पर्वणी नर्मपणिचे उन्नत चरणी मिकामुकातील संथ चुंबनी मंतरले सावंतासदनी //दोन// अल्प त्यावरी भर्जर त्राता राहुलभजनी विचित्रवस्त्रा भर्कन शोधा मोडीत मूढा त्रिकोणमग्रूर तुरंतखोला //तीन// भंगअपेक्षा नाकफेंदरी स्वयंवराची हावहावरी बंधननक्षी उभयापक्षी प्रसिद्धीकिडा चावलवक्षी धाडीशिकंजी प्रयासखोटा वसकन उघडा मिरवीसर्वा मिपास्थळावर कशास बोधा कविताकर्मी फुटला माथा.

गात येथे तू उगा का थांबलेला

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
गात येथे तू उगा का थांबलेला वाहवा तो करुन मारा पेंगलेला ! जाउ दे त्याला किती उंचावरीही - दोर आम्ही नीट त्याचा कापलेला तोंड भरुनी मानलेला जो सलोखा पाठ फिरताना गळा का दाबलेला ?

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

चित्रगुप्त ·
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..

मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून (रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचा स्वैर अनुवाद)

स्वप्ना_तुषार ·
लेखनविषय:
काव्यरस
I touch God in my song as the hill touches the far-away sea with its waterfall. The butterfly counts not months but moments, and has time enough. Let my love, like sunlight, surround you and yet give you illumined freedom. Love remains a secret even when spoken, for only a lover truly knows that he is loved. Emancipation from the bondage of the soil is no freedom for thee. In love I pay my endless debt to thee for what thou art. दूरवर असलेल्या सागराला टेकडी तिच्या धबधब्यातून स्पर्श करते जशी अगदी तसाच मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून फ़ुलपाखरे क्षण मोजतात महिने नाही म्

गाढवदादा गाढवदादा -

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
गाढवदादा गाढवदादा - माणूस म्हणू का ? माणूस म्हणताच चिडून लाथा झाडाल का ? |१| मासेभाऊ मासेभाऊ - नापास झाला का हो ? रडून रडून सगळा टँक भरला की हो ! |२| पोपटराव पोपटराव - शीळ छान घालता राव ! मैनाताईला वाटतं का हो एकदा तरी वळून बघाव ? |३| कासवपंत कासवपंत - लढायला किती हळू जाता ? ढाल पाठीवरती घेता तलवार कुठे विसरता ? |४| भोलानाथ भोलानाथ - गुब्बू गुब्बू गुब्बू पैशाचं मी पेरलं झाड पैसे येतिल का रे ढब्बू ? |५|

भास..

राघव ·
लेखनविषय:
गंधासवे श्वास पुलकीत होती.. उरी मोगर्‍याचे उसासे.. नव्याने! "आषाढ येईल लवकर तसाही.." निवळत्या धरेला दिलासे नव्याने! नको तेच पुन्हा-पुन्हा का दिसावे? (कशाला जुने दु:ख सलते नव्याने?) जाणिव नाही कशी जाणिवेला.. अवचित पुन्हा भास होती नव्याने! पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! अरे..कल्पनांचे खुजे विश्व माझे.. शब्दांस स्वरसाज चढती नव्याने राघव

(रेडा म्हणे वडाला)

सूड ·
लेखनविषय:
आमची प्रेरणा रेडा म्हणे वडाला "भलताच जाच आहे दोरे बरे अरे हा यमराज त्रास आहे. ने-आण मी करावी, यमभार मी वहावा तरी मजसी तो म्हणे की, "तू बावळाच आहे!" ना इंक्रिमेंट काही, ना सुट्टी घे कधी जो ऐसा गुलाम त्याला नेहमी हवाच आहे. जातो आता निघोनि धाडून मेल त्याला कैसे हरेल प्राण ? मग कोण भार वाहे ? वैविध्य वाहनाचे त्या पाहूदेच आता सांगेन जॉब माझा हा सातवाच आहे." बघा जमलंय का ते !! अवांतरः त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही, ते समस्यापूर्ती साठी दिल्यासारखं वाटतं. ;)

.टिंब.

विजुभाऊ ·
लेखनविषय:
रोज रोज संध्याकाळी ; टिंब रंगते एक होळी आडरानी पंक्चरणार्‍या टायराची रांगोळी मर्तीकेची गर्दभे येती चढवुनी कैफ गोळी येती सारी येकजात देता एक साधी हाळी चिवडा आणि अंडी उकडली ; फेकूनी द्या ती भाजी पोळी संपवुनी चखणा आणि चोखुनी नळी गडी पहुडले तर्र झोकुनी ; हाती घेवूनी रात्र काजळी उजेड फुटतो भल्या सकाळी आड भिंतीपलीकडे ओकलेली पित्तनळी उभे रहाता पाउले पकडती दिशा वेगवेगळी ओघळे ढेरी खेळती डोळे कोशिंबीर आंधळी बंद पाकीटाला ओढ एक तारखेची आगळी दुर्दम्य घायाळ आशावाद; जात नाही कधी काळी स्पर्श पहिल्या धारेचा ;चमके मुद्रा बावळी घेताना नांदते ओठावरी नवनवी लाखावळी जीवनात रंग भरे सृजनतेची

कल्लोळ

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
(सकाळी दूधाला जातांना दारात प्राजक्ताचा बहर पडलेला दिसला आणि...... मे महिन्याचा भर उन्हाळा, पावसाळा लवकर येणार म्हणून किंवा वळवाची चाहूल म्हणून आभाळ भरून आलेलं, वसंताच्या लाटांवर कोकीळा अजून बागडताहेत; अशा वेळी ऋतुमानाप्रमाणे मोगरा-निशिगंध ठीक आहेत पण चक्क श्रावणातला प्राजक्त आज कसा काय फुलला ????..... एखाद्याच्या जीवनवणव्यात जर असा प्राजक्त बहरला तर हुरहूर आणि कल्लोळच येईल वाट्याला ......) मेघाआडुन घुमे कोकिळा विधिवत संसारी क्षितिजावरचे माप लवंडे वसंत दरबारी कसाच फुलला असा अवेळी पारिजात दारी घाट आठवे दाट वनातिल वैशाखविहारी ऋतुमानाचे का उल्लंघन कशास भुलली स्वारी