सिलींडर ४
लग्नघरातून सुटका झाल्यावर,टेम्पोजवळ व-हाडाची वाट पाहात थांबलो.ड्रायव्हर क्लिनर बिड्या ओढत उभे होते.साडेचार वाजतआले होते.हळूहळू एक एक करत किरकोळ व-हाडी,किरकोळ सामानासह टेम्पोकडे येऊ लागले.काही वेळाने,बॅंडचा आवाज येऊ लागला.कपाळी मुंडावळी,हाती मोत्याच्या नारळाची दुरडी घेतलेला,डोक्यावरचे टोपी मुळे जास्तच बावळट दिसणारा नवरदेव,मागे कणकेचे दिवेअसलेले ताम्हण हाती घेतलेली करवली,वरमाय व इतर महत्वाची माणसे वाजत गाजत वरातीने आली.नशीब ,त्या काळी लग्न कायदेशीर ठरण्यासाठी वराती समोर नाचायचा विधी अनिवार्य नव्हता.नाहीतर रात्रीचे बारा इथेच वाजले असते.सामान आणि पॅशींजर टेम्पोत चढवणे,बसवणे मोठे अवघड काम