राजगड संवर्धन मोहीम २०१२
- Read more about राजगड संवर्धन मोहीम २०१२
- 38 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रामराम मंडळी,
राजगड! श्री शिवछत्रपतिंची प्रथम राजधानी! नावाप्रमाणेच असलेल्या ह्या राजगडाची आज अवस्था मोठी वाईट आहे. पडझड, रानगवत, पर्यटकांनी केलेला कचरा अशा निरनिराळ्या अडचणींनी हा गड आपलं मुळचं वैभव हरवून बसला आहे. गडाची देखभाल तसेच दुरुस्ती करुन हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
काही दुर्गप्रेमी..खरेतर गड-किल्लेवेड्या मित्रांनी एकत्र येऊन अशाच निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, लेण्यांची गुहांची दुरवस्था न पहावून ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे संगोपनाचे शक्य तितके वैयक्तिक प्रयत्न सुरु केले.