बर्याच काळाने आमचा नान्या सक्रिय राजकारणात परत आला, आणि आमचा आनंद बाटलीत मावेनासा झाला. तोबताबड आम्ही आमच्या चौपाटीवरती प्यार्टी आयोजीत केली. सगळी चौपाटी सजली होती, बार टेंडर, कॅप्टन, वेटर सगळे नवीन धुतलेले कपडे घालून सेवेला हजर झाले होते, मात्र नान्याच्या चेहर्यावरती उदास उदास भाव दाटून राहिले होते. गप्प गप्प नान्या काय मला बघवेना. शेवटी गुमसुम मध्ये २ पेग झाल्यावरती मी नान्यावरती सरळ डाफरलोच.
मी :- नान्या, काय मयतीला जौन आला बे ? असा का बसला आहेस ?
नाना :- पर्या काय सांगू तुला ? मला ४ दिवस झाले वेताळाने पकडले आहे.