मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनंदन

मिपाकर स्वच्छंदी पाखरू यांचे अभिनंदन...

जाई अस्सल कोल्हापुरी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपले मिपाकर आणि आमचे मित्र स्वच्छंदी पाखरु यांना नुकतेच २० एप्रिल २०११ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.... त्याबद्दल समस्त मिपाकरांकडून शुभेच्छा!... ...जाम गोड आहे पोरगी...! सध्या ते स्वतः स्वगृही... मायदेशी असलेने फोटु टाकु शकत नाहीत. वेळ मिळाला कि टाकतील!.. तरी त्याना शुभेच्छा आणि नविन बाळाला आशिर्वाद...!

पेठकरशेठ यांचे अभिनंदन

सर्वसाक्षी ·
आपले चविष्ट मिपाकर मा. श्री. प्रभाकर पेठकर यांचे कौतुक करणार लेख आज ओमान ट्रिब्युनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पेठकरशेठ यांचे हार्दिक अभिनंदन! लेख येथे वाचा

प्रिय सच्यास

चतुरंग ·
लेखनविषय:
२४ एप्रिल हा सण कधीचाच जगभर साजरा होतोय. भारतात तर शेकडो, हजारो लोक केक कापून त्यांचा स्वतःचा वाढदिवस असल्याच्या थाटात तो साजरा करतात. आम्ही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही...तेही खरं नाही म्हणा तूच आमच्यात आहेस त्यामुळे आम्ही कुठे पोचायचं हा प्रश्नच आहे! तुझं अभिनंदन. लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं.

श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये

प्यारे१ ·
लेखनविषय:
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥ बोलो बजरंगबलि की जय। पवनपुत्र हनुमान की जय।

टारोबाचे डब्बल अभिनंदन !!!

पक्का इडियट ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचे परममित्र हभप (हळूच भलते पहाणारे) परमपूज्य श्री श्री श्री १००००००००००००००००००००००००००० टारोबा महाराज यांचा लेख सामनाच्या फुलोरामधे आलेला आहे. http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA1.HTM त्याचा आम्हाला फार फार आनंद झाला आहे इतकेच काय http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA3.HTM हा लेख सुद्धा त्यानेच लिहिला आहे. फक्त त्यात खाली त्याचे नाव नाही छापले गेले हरकत नाही.. नावात काय आहे.. विचार महत्वाचा.. लेख महत्वाचा... !!! टारोबाचे डब्बल अभिनंदन.. !!

पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'

चिंतामणी ·
लेखनविषय:
पुण्यातील आद्य मिसळ अड्ड्यास १०० वर्षे पुर्ण होत आहेत. रवीवार पेठेतील रेल्वे बुकिंग ऑफीस शेजरी असलेले "वैद्य उपहार गृह" हे ते ठिकाण. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर ९९ पुर्ण करून शतकी वर्षात प्रवेश करीत आहे. या निमीत्त सकाळ मधे एक लेख आला आहे. तो पुढील प्रमाणे पुणेरी मिसळची 'सेंच्युरी' पुण्याची वैशिष्ट्ये अनेक. पुणेरीपण जपणारी. पुणेरी मिसळ त्याच परंपरेतली. पुणेरी मिसळ म्हटले, की हमखास तोंडावर येते वैद्यांची मिसळ.

जय श्रीराम...!!!

प्यारे१ ·
लेखनविषय:
प्रभू रामचंद्र की जय! रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना. श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम।

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

चिंतामणी ·
लेखनविषय:
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा.

(यांना विसरुन कसे चालेल ? )

मृत्युन्जय ·
लेखनविषय:
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

इंटरनेटस्नेही ·
लेखनविषय:
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)