तुझ्यापाशी जन्मलेली माझी
हट्टी, खोडकर, अल्लड
कविता
तू डोळ्यांत सांभाळून
घेऊन ये....
येता येता वाट चुकली
तर मला जागं कर...पण
मी माझ्याच तंद्रीत असेन
तर
माझ्या कवितेला वाट विचार....
ती आधी मस्करी करेल,
तुला चकवा घालेल,
घनघोर गप्पा मारेल,
निळावंती होऊन,
वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल,
लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल,
मिठीत शिरता शिरता एकदम
वारा होऊन
तुझ्या गळ्यात पडेल,
शेवटी थकून
तुझ्या दुमडलेल्या हातावर
निर्धास्त झोपी जाईल,
तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव....
अशी थकून झोपलेली,
झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी
माझी कविता सांभाळून
घेऊन ये....
मी असेनच कवितेच्या आसपास.
-शिवकन्या
छान...
सुरेख नेहेमीप्रमाणे!!
इच्छामरणावरती आहे का ही कविता
मस्त कविता
कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?.
सोन्या, शब्दानुज
खॅ खॅ खॅ
आवडली.. पण नेहमीप्रमाणे
चांगली आहे, पण काही तरी
In reply to चांगली आहे, पण काही तरी by दुर्गविहारी
आपली इच्छा
In reply to आपली इच्छा by नाखु
कर्ता करविता स्वामि
कर्ता करविता स्वामिहा हा हा !सुरेख
पाणी .......
अगदी modern वाटली