डिजीटल डिजीटल
काव्यरस
जी माणसे कुठल्याच
डिजीटल प्रोफाईल मध्ये
नसतात,
त्यांचे जगणे कसे असेल,
हा प्रश्न मला
छळू लागला,
आणि मला माझ्या डिजीटल
विचारांची भिती वाटू लागली...
जी माणसे ऑफलाईन असतात
त्यांचे लाईफ कसे असेल
या प्रश्नाने मला परेशान केले
आणि मला माझ्या
डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली...
मग, या डिजीटल तुरुंगातून
सुटका होण्याची वाट पाहताना
मी विंडोजमध्ये डोकावून पाहते...
तर,
खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून
डिजीटल तुरुंगात येणारे
लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला
वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत
24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात...
मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून
हादरून जाते,
आणि परत विंडोजमधून आत येऊन
माझ्या डिजीटल प्रोफाईलमध्ये
सुखीआनंदीसुंदर होऊन
खऱ्या जगाचा डिजीटल विचार करू लागते...
-शिवकन्या
वाचने
6989
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
नेहमीप्रमाणेच, अप्रतिम
In reply to नेहमीप्रमाणेच, अप्रतिम by अभ्या..
अभ्या
निव्वळ अप्रतीम
खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात...एक नंमस्त!!
छान कविता आहे ...
कविता आवडली.
खूपच छान ! पटण्यासारखी कविता
वाचकांचे आभार.
मस्त भारीच
Very nice kavita. I like it