मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

लिव अंधभक्ता लिव

अमरेंद्र बाहुबली ·
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

हांगचौमध्ये आपलं स्वागत!

पराग१२२६३ ·
Team India हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत.

फिटनेस सोपी गोष्ट आहे

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
फिटनेस ५० आणि फिटनेस १०० कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम सर्वांना नमस्कार. सर्व जण पावसाळ्यात येणा-या परिस्थितीमध्ये सुरक्षित असतील अशी आशा करतो. फिट राहणं किती सोपं आणि जमण्यासारखं आहे, ह्याबद्दल माझे अनुभव शेअर करत आहे. अनेक वर्षांपासून सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि योग असे वेगवेगळे व्यायाम करत गेल्यामुळे आणि त्याला जोडून जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे फिटनेसची आवड होत गेली आणि त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. व्यायामासाठी वेळ काढणं किंवा फिट राहणं हे जितकं समजलं जातं तितकं अजिबात अवघड नाही हे लक्षात आलं.

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा - बॉर्डर गावसकर ट्रॉफी

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव ता सार्‍यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. साक्षात विक्रमादित्य सुनील गावसकरनी गायलेलं (हो-"तो" सुनील गावसकर. आम्ही देवाला अहो जाहो करत नाही) शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आज दुपारपासून लूप वर चालू आहे. काय करावं ह्या खेळाचं?

द ब्यूटिफुल गेम

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट बरं का! हे यूरोपियन्स, आफ्रिकन्स आणि दक्षिण अमेरिकन लोकं होते ना - त्यांनी आपली पुराणं वाचली आणि त्यांना किडा आला समुद्रमंथन करण्याचा. म्हणाले आपण अ‍ॅटलान्टिक महासागर ढवळून काढू. झालं! लोकं लागली कामाला. अँडीज कि आल्प्सचा एक पर्वत घेतला, अ‍ॅझटेकांच्या केत्झालकोआत देवाची रस्सी केली आणि लागले की समुद्र घुसळायला. आता पाश्चिमात्यच समुद्र तो! त्यातून पहिली आली ती हिरे माणकं नेली आफ्रिकन्सनी. मग आली वाईन - ती फ्रेंच लोकं घेऊन गेली. मग आलं सांंबा नृत्य - ते नेलं ब्राझिलियन्सनी.

मेरे प्यारे दुश्मन

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ, First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही.