मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

मुंबई

यकु ·
मुंबईमुंबई पाहिली मुंबई जीवंत नगरी ती मरती मुंबई जगती मुंबई, खाती मुंबई, पिती मुंबई पळती मुंबई जळती मुंबई हसती मुंबई खेळती मुंबई झुकझुक गाड्या अचाट वेळा ढण ढण भोंगा गाडीत झोपा भजनकिर्तन भिक्षेकरिता निर्लज्ज नर्तन पंचम तारा आलिशान कारा स्पेशल स्यूट अन सर्व पसारा फुका जन्मती मुकाट मरती जगती आणि पुन्हा निपजती इथेच बंगले इथेच कारा ऐंशीच वर्षे किती पसारा लोकल रिक्षा विमान एस्ट्या गुगल फोन अन कडक नोटा बारच नाही बाला सुध्दा पितापिताना उलट्या नुस्त्या जगताजगता मरण धडकते पुरतच नाही जग हे रडते

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १

स्पा ·
लेखनप्रकार
कल्याण स्टेशनातून "देवगिरी एक्स्प्रेस" सुटली, आणि आपण निदान एक आठवडा तरी मुंबईच्या मगरमिठीतून सुटलो , या भावनेने " हुश्श " केले...... कामाची आणि बाकीची सगळी " टेन्शन" सोडून फक्त धमाल करायची असं ठरवलंच होतं. गाडी सकाळी बरोबर ५ ला औरंगाबाद ला पोहोचली अनपेक्षितपणे वादळी गडगडाटासह "वरुण राजा" स्वागताला आला होता. मराठवाड्याच्या उष्णतेने पोळून निघण्याच्या तयारीने आलेल्या आम्हाला हा सुखद धक्काच होता. कडाक्याची थंडी पडली होती .. (बहुतेक रात्रभर पाऊस पडलेला असणार.....) आम्ही कुडकुडत बाहेर पडलो. MTDC बुक केलेलं होतंच, पण त्याआधी नातेवाईकांकडे उतरलो.

पोलीस राइस

स्पा ·
लेखनप्रकार
स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर वेळ : साधारण रात्रीचे ८ अशीच एक स्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ... कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली .. फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत.. गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .

भाषिक संपत्ती

मृत्युन्जय ·
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

एम - २२

मस्तानी ·
लेखनप्रकार
एम २२ हे एका रस्त्याचं नाव आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातला ११६ मैलांचा एक रस्ता. या हेमंत ऋतूमध्ये ज्याचा भाव भलताच वधारतो असा हा एक रस्ता. ऐकून होतो काल-परवा पर्यंत पण आता मात्र प्रत्यक्ष अनुभव घेवून आलोय की या एका रस्त्याबद्दल इतकं का बोललं जात. आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !

सरकारी योजना

पाषाणभेद ·
काव्यरस
सरकारी योजना
माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई शाळा!