(मागच्या वेळी केलेल नमन आता या वेळी सुद्धा आहे, पण गणपा भाउ, जागुताई अन केशवजीं बरोबर फोटो अन व्हिडिओ साठी आदरणीय बहुगुणी अन आपले सर्वांचे लाडके धमाल मुलगा यांचे जाहिर रित्या आभार!!
तुम्ही मदत केली नसती तर, कुठली अपर्णा, अन, कुठला हा लेख!!)
अरे हो राहिल प्रिय डॉन रावांनी मला अक्षर रंग अन इतर सुविधा देण्याच आश्वासन दिल्या मुळे इथुन पुढे मीही थाटात रंग बदल बदल के लिहिणार आहे!! ठ्यांक्यु ह डॉन साहेब!!
जसे राम फळ, सीता फळ तसे हे लव फळ. हे मोठे झाड होते. ह्याची पाने रुंद मोठी असतात. लव फळ कच्चे असताना हिरवेगार साधारण पोपटी असे असते. मग पिकत गेल की पिवळसर रंग चढतो. आणि पिकले की एकदम गर्द नारंगी कलर (पिकलेल्या पपई सारखा) येतो. ह्याचे साल चरट अगदी पातळ असते. ह्यात गरा पेक्षा बियाच जास्त असतात त्या पांढर्या असतात. चविला हे फळ आंबट गोड असते. ह्याच्या बियांमुळे हे फळ खायच म्हणजे टाइमपास असतो. बराच वेळ बिया तोंडातच काढत खात बसायला लागते. कारण ह्याचा गर सिताफळाप्रमाणेच बीला चिकटलेला असतो. पण अगदी चिवटपणे.
हे झाड माझ्या माहेरी अगदी आमच्या माळ्याच्या जिन्याच्या समोर आहे.
मुंबई मीटर जाम.
जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष:
आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार.
बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना!
बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!!
हैयो! हैयैयो!!
पुणेरी विक्षिप्तपणा
_______________________________________________________
सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.
_______________________________________________________
ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.