स्पर्श वेडे

लेखनविषय:
काव्यरस
स्पर्श वेडे चांदव्यात रूतलेले खुळ्या अंबरी भाव फुललेले गेले ढळलेल्या टिपूर रानातूनी कवडसे गुंतवीत शुभ्र घाटातूनी शीळ घालीत पवनाच्या दारी सुरांनी विणली नक्षी त्यावरी झाकले आभाळ उधाणलेल्या तिमिरातूनी किलबिल्या रात्री मोकाट फिरूनी डोळ्यांत बिलगणारे ते काजळनाते हसूनिया हे ह्रदयातूनी गाते चांदण्यात उतरूनी आला मुलूख सुटे गुंता नसे चांदणे नसे तिमिर नक्षत्रे सारी फिकी ते तुझे चंद्रमुख

भिजू दे निशा

लेखनविषय:
काव्यरस
अंगणातील जाई हरवली सुगंधात लोटूनी भय ये तू क्षणात पांघरली कुसूमांनी रात्र काजळी शहारतो गारवा राहूनी वल्लरीत कोवळे चांदणे पानापानांत उतरले लहरतो चांदवा पाहूनी जलात चोरपाऊलांच्या मार्गातील धुंद झाली रेती लाजिरे गुलाब हसले मोरपिसात नजरेचे म्रूग लागले दौडू सजे माणिक हिरव्या त्रूणात ये सामोरी कर दूर चलबिचल पायघड्या ठेवूनी उभा मी परसात अधीर डोळ्यांत डुले काजवा भिजू दे निशा दिव्य तुझ्या सहवासात

भिजू दे निशा

लेखनविषय:
काव्यरस
अंगणातील जाई हरवली सुगंधात लोटूनी भय ये तू क्षणात पांघरली कुसूमांनी रात्र काजळी शहारतो गारवा राहूनी वल्लरीत कोवळे चांदणे पानापानांत उतरले लहरतो चांदवा पाहूनी जलात चोरपाऊलांच्या मार्गातील धुंद झाली रेती लाजिरे गुलाब हसले मोरपिसात नजरेचे म्रूग लागले दौडू सजे माणिक हिरव्या त्रूणात ये सामोरी कर दूर चलबिचल पासघड्या ठेवूनी उभा मी परसात अधीर डोळ्यांत डुले काजवा भिजू दे निशा दिव्य तुझ्या सहवासात

ती एक वेडी

ती एक वेडी जुन्या आठवणींचा कोष मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी एक दिवस तिच्याही नकळत हा कोष जाणिवेत आला बघता बघता त्यातनं एक सुंदर फुलपाखरू निघालं तिच्या तळहातावर अलगद बसलं अगदी विश्वासानं ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली त्याची ओळख पटवू पाहू लागली हळूच त्याने पंख मिचकावले तिला वाटलं ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे ओळख पटली ती हसली तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं त्याच्या रूपानं हरखून गेली जुन्या आठवणीत हरवून गेली एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली पुन्हा एकदा नवथर प्रेमाची चाहूल लागली तीच तरुणपणातील धडधड तीच हुरहूर तीच ओढ़ तिचा विश्वास बसेना स्वतःवर पण ती तिच्या भावनांशी प्रामाणि

एका लग्नाची ऐकीव गोष्ट.

लेखनविषय:
काव्यरस
(गद्य,पद्य वेचे.) तू मला पहायला आला होतास सफेद प्यॅन्ट अन सफेद फुल शर्ट काळा सावळा असलास तरी दिसलास स्मार्ट तू नेसली होतीस अंजरी साडी ब्लाऊझवर होती नक्षी वाकडी तिकडी गोरीपान होतीस अन दिसलीस फाकडी मी कांदेपोहे घेऊन आले होते तू मान खाली करून बसला होतास दोन चमचे खाल्यावर वर बघून हसलास उजव्या गालावरच्या खळीमुळे मोहक दि़सलास जाताना मी गेलो पोपटाच्या पिंजर्‍या जवळ तुच पोपटाला विचारत होतीस कोण रे तो? पोपट मला म्हणाला चोर चोर ते ऐकून तू जोरात हसलीस मी मनात म्हणाले होते माझं हृदय चोरणारा तूच तो चोर तुझा चेहरा पाहून माझ्या हसण्यावर माझा मीच घातला चटकन आवर मी रागावलो नसतो अजीबात तुझ्यावर का नाही

प्रीत भेटेल का गं...

लेखनविषय:
काव्यरस
हरवलेले गीत भेटेल का गं प्रथम नेत्रीची प्रीत भेटेल का गं बघ भावनांचा कल्लोळ झाला आज तरी वेळ भेटेल का गं ।। व्यवहारी विचारी पेलून सारी ह्रद्याशी ह्रद्य खेटेल का गं ।। तु ग्रृहलक्ष्मी मी अन्नदाता तु मायाममता मी इःकर्तव्यता मेळ दोघांचा होईल का गं ।। गलित तन झाले मन न झाले आज तरी चांद उगवेल का गं ।। -सुर्यांश

'बघणं' राहूनच गेलं

... शब्दांमागे धावण्यात 'बघणं' राहूनच गेलं रस्त्याकडेचं इवलं रोपटं कुणी न बघताच मेलं शब्दांचा पसारा हवा मोर-पिसारा नको शब्दात उलगडून सांगा 'नुस्तं बघणं' नको 'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात सौंदर्यगंध दरवळतो समजून घेण्याच्या नादात तोच नेमका हरपतो समोर अप्सरा उभी तिचं आधी नाव सांगा वय-जात-उंची-शिक्षण सगळं तपशील्वार सांगा सांदि-कोपर्‍यात डुलणारं फूल- त्यात विशेष क

(मुलिंनी धरु नये अबोला)

आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

घर गळतंय माझं.....

काव्यरस
घर गळतंय माझं तस ते नेहमीच गळत पण पाऊस आला कि उडतात छतावरच्या दोन चार काड्या अन पाऊस येतो आत येतो जोराचा घर गळतंय माझं थेंबाच शहर झालाय पाण्याने तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची छताला भोक आहेच पण जमिनीला करतेय निचरेल ...

एक स्वप्न होत माझं...!

लेखनविषय:
काव्यरस
एक स्वप्न होत माझं तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं तुझ्यासाठी कोणत्याही परिस्थितिला निडरपणे सामोरं जायचं माझ्या सुखात तुला हसवायचं अन् तुझ्या मी रडायचं तुझ्या ओठांवरच्या एका हास्यासाठी काहिहि करायचं एक स्वप्न होत माझं तुझं मन जिंकायच एक स्वप्न होत माझं तुझ्यासोबत तुझ्या घरात राहायचं त्या घराला आपलं घर बनवायचं आपल्या घराला सजवायचं घरातल्या प्रत्येक गोष्टीसोबत आपलं नात जपायचं घर फुलाप्रमाणे फुलवायचं फक्त एक स्वप्न होत माझं तुझी अर्धांगिनी बनुन जगायचं...!
Subscribe to प्रेम कविता