मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....

बाजीगर ·
लेखनविषय:
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pune-rajgad-fort-darshana-pawar-murder-case-how-a-driver-daughter-became-an-mpsc-topper/articleshow/101127207.cms हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं.... कशी पडलीस आकर्षणा गं ? गाजवून एमपीएससी चमत्कारा ग, आली पुण्यात स्विकारा सत्कारा ग जरी जाहलीस वनाधिकारी ग, नाही जाणले श्वापद विकारी ग सावध हरिणी सावध ग, करील कुणीतरी पारध ग तुझी बुद्धी गेली वाया ग, गेली कूजून सुंदर काया ग राहीली महाराष्ट्र सेवा ग ! राहीली महाराष्ट्र सेवा ग ।।

सखये,बाई ग.....

कर्नलतपस्वी ·
सख्या रे... प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला. काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.

सख्या रे..

प्राची अश्विनी ·
काव्यरस
न्हाऊ कशी सख्या रे तनु चंद्र जाहलेली काया अजून आहे स्पर्शात माखलेली.. न्हाऊ कशी सख्या रे आताच फूल झाली, कळी काल मोग-याची केसांत माळलेली. न्हाऊ कशी सख्या रे अंगांग पेटलेले, ते तेवतात अजुनी तू दीप लावलेले. न्हाऊ कशी सख्या रे मृद्गंध आसपास, जो कोसळून गेला पाऊस काल खास. न्हाऊ कशी सख्या रे देही चितारलेले, जे शब्द जाफरानी ओठी तुझ्या न आले..

चक्रीवादळ

बाजीगर ·
लेखनविषय:
'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष आमे तैयार छे, गुजरात दक्ष पाकीस्तानातून भारतात, बेकायदेशीर! नाही विजा, आहे ना सोबत गडगडाट, तेजाळ लखलखाट विजा!! कडेकडेनेच निघून जा, हा विनंती अर्ज पीकपाणी नुकसान नको फिटलं नाही कर्ज. करु नको विस्थापीत, नको उडवू घराचे पत्रे, हवामान महासंचालक, कशी वाचवावी लक्तरे?

जिल्हे-ईलाही

बाजीगर ·
लेखनविषय:
बोलाचा भात बोलाची कढी पोरीला दिली कल्पनेतली गढी खात्यात पैसे नसता दिला blank cheque भरा पोट खाऊन फोटोतला केक तू घे पंजाब, महाराष्ट्र हरीयाणा आणि युवा साडेतीन जिल्हे-ईलाही !! खेळतोय कसा जूवा ।

बस्स! फक्त एवढंच कर...

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
दिवस कसाबसा निघून जाईल कातरवेळ मात्र अंगावर येईल तू फक्त माझी सय काढू नको "ती" आली तशी संपून ही जाईल मग काही अबोल-अनाथ स्वप्ने वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील त्यांना अजिबात थारा देऊ नकोस डोळे अगदी घट्ट मिटून घे हात बाहेर न काढता आतूनच निग्रहाने "ती" खिडकी बंद कर मग मऊ केस झटकून जरासे कुरळ्या बटांना मोकळं कर सुकलेले ओठ घट्ट करून पाठीला उशी लावून स्वस्थ बस पुर दाटून आलाचं पापण्यांमध्ये तर त्याला तिथेचं थोपवून ठेव अन् माझा चेहरा आठवलाचं तर चुकूनसुद्धा झरू नकोस मी "हरवून" गेलोय कधींचं मला पुन्हा शोधत बसू नकोस तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला

आजोळ

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
आज पहाटे पहाटे ओलांडून स्थळकाळ साकारले माझ्यापुढे बालपणीचे आजोळ मामा मावशी प्रेमळ हात आजीचा सढळ आजोबांच्या भूपाळीत उगवतीचे आभाळ पेरू फणसाच्या मधे कृष्णकमळीचा वेल पायरहाटाच्या मागे धरे सावली पोफळ कधी पारावर गप्पा कधी बालिश भांडणे रात्री चांदण्या मोजत अंगणातले झोपणे कधी नदीत डुंबणे कधी नांगर धरणे करवंदे तोडताना काटे बोथटून जाणे तान्ह्या पाडसांची शिंगे चाचपडून बघणे आठवडी बाजारात निरुद्देश भटकणे पारंब्यांचे उंच झोके खो-खो लगोरीचा खेळ चटपटीत अवीट खास पंचरंगी भेळ वाढे वैशाखी उन्हाळा नदीपात्र नाला होई आणि बघता बघता सुट्टी संपूनच जाई पडवीतला झोपाळा झुलायचा गाण्यांवर गाणी तीच म्हणताना आज स्वर

ना कर नाटक !

बाजीगर ·
लेखनविषय:
नफरत चा बाजारबंद, म्हणाला तो सोनियानंद, मोहबत की दुकाने खुली नाही चालला बजरंगबली अदानीची मोठी ताकद, तर गरीबांची छोटा कद, मोदी-शाह यांची जादू स्वस्त, फूकट्यांचा बांबू गरीबांना नको तो विकास गॅससिलींडरने केला नाश केरल स्टोरीचा ना असर भाजप तू विजय विसर

कोर्टाचे नरो वा कुंजरोवा (अर्थात डबल ढोलकी)

बाजीगर ·
लेखनविषय:
काव्यरस
खोकेबाज धोकेबाज । इतरा म्हणत गद्दार! स्वत: दिला पदभार। सोडोनिया ।। ठाकरेंनी जरी घातले, सर्वोच्च कोर्टा साकडे, पाऊल पडले वाकडे, भलतेची।। अननूभवी कुणी बनला । निवडणूकीस न उभारता। मालमत्ता अर्ज न भरता। मुख्यमंत्री।। शाह- नानाने मात दिली। भाज्यपाल जरी चूकले। महाविकासआघाडी झूकली। यामुळेचि।। आत्मविश्वास अभाव? अल्पमताची चाहूल? कि अल्पमतीची हूल। राजीनामा!! बंडखोरांची ती सहल। हाॅटेल डोंगर ती हिरवळ। 16अपात्र म्हणे झिरवळ। योग्य होते?! हेटाळले तुम्ही ज्यांना। अलीबाबा,चाळीस चोर। ठरले काळीज शिरजोर। शिंदेशाही।। आपण लाचारपणे। केला असंगासी संग। व सोडला भगवा रंग। खुर्चीसाठी।। नाव गेले,चिन्ह गेले। संपली र

चाललोय....

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट, वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे मुरवत चाललोय.... हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं निरखत चाललोय.... देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय.... क्षण तुझ्या दरवळत्या अस्तित्वाचे कण तुझ्या विरघळत्या भासांचे दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना जगणं कसलं ???