मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाङ्मय

रविवार विशेष

सृष्टीलावण्या ·
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

बाबूराव बागुल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनप्रकार
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.

मानिनीस (पूर्ण कविता आठवतेय का?)

लिखाळ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नमस्कार, एक कविता आठवण्याचा प्रयत्न करतोय... बहुधा बा.भ.बोरकरांची आहे. शीर्षक 'मानिनीस' (असेच आहे बहुधा :) आज तुझ्या नयनात मानिनी, शरणागती अनुताप हास्यविनोदांमध्ये तुझ्या अन सलज्ज मूक विलाप व्यथा परि तव आज मानिनी ................... नव्या .... मध्ये अन जूना तुझा अभिमान अशी काही ती कविता आहे. आपल्या पैकी कुणाला ती पूर्ण आठवत असल्यास येथे द्याल का? आभारी, --लिखाळ.

तुका झालासे कळस

धोंडोपंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
|| जय जय रामकृष्णहरी || लोकहो, आज माघ शुद्ध दशमी. आपल्या तुकोबारायांना याच दिवशी गुरूकृपा झाली. त्यादिवशी गुरूवार होता. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासारख्या वारकर्‍यासाठी अत्यंत मोलाचा. त्यासंबंधी लोकांना माहिती व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू श्री निवृत्तीनाथ, एकनाथमहाराजांचे श्री जनार्दनस्वामी तसे आमच्या तुकोबारायांचे गुरू बाबाजी होते. हे बाबाजी कोण होते, काय होते, कुठे होते याचा उल्लेख कुठेही नाही. पण तुकोबारायांनी त्यांच्याच एका अभंगात त्यांचा उल्लेख केलेला आहे. लोक असं समजतात की तुकाराम महाराजांच्या पाठी गुरूपरंपरा नव्हती. पण तसे नाही.

मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक.

अविनाश ओगले ·
लेखनविषय:
मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे सहज कवन होते, जाम पिता फुकाचे पावन करी जीवा त्वा, मद्य हे पूर्ण ब्रह्म समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. -अविनाश ओगले

कादंबरी "शाळा " ...लेखक .. मिलिंद बोकील

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं.... .....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंब

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

पुष्कर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.