मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काणकोण

(थू)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेर्णा पाभे सरांची तू http://misalpav.com/node/50075

थू -१

तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग तू हसते अशी छाती माझी धडधडे ग गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

(वल्लीदांच्या सहवासात)

ज्ञानोबाचे पैजार ·
कुणाला चांदण्यांच्या सहवासात रमावेसे वाटते तर कुणाला अजून कोणाच्या, आमची एक इच्छा अपूर्ण आहे ती म्हणजे एकदिवस तरी वल्लीदांच्या सहवासात रमण्याची बघू केव्हा पूर्ण होते ती?

(ऐसे(ही) ऐकिले आकाशी)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा http://misalpav.com/node/49655 अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे

ऐसे(ही) ऐकिले आकाशी

(१) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्

(मेरा कुछ सामान... (भावा...(बघ)..अनुवाद.))

ज्ञानोबाचे पैजार ·
सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका... पेरणा, प्राची ताईची ही कविता http://www.misalpav.com/node/49553 प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?) स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून. माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरुन सांगतो हे गाणे असे भारी आहे की दुसऱ्या कोणाlला खरा अर्थ लक्षात येण्याची शक्यताच नाही.

(कळेना मला)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा

(मल-आशय !)

ज्ञानोबाचे पैजार ·
आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले

(मल-आशय !)

मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे. नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे. खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा. मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा! असे मलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती. केवळ चित्र तसे पाहता, नाक दाबूनी दूर धावती. अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो. सोसू कळ थोडी म्हणता, अवचित प्रोग्राम होऊन जातो.

(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे)

पैजारबुवा,

(...मारीला म्यां डोळा ;)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा http://misalpav.com/node/47605 अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा. घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी कडवी. संपतील एकद

(सहजच..)

ज्ञानोबाचे पैजार ·
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच.. सहजच चूक ती मान्य करोनी, तू निमूट माझ्यासमोर यावे, तुला पाहुनी छद्मीहसूनी मी मग उदारातेने माफ करावे. सहजच मग तू लाचार हसूनी, स्पर्ष मला जरा करु पहावा, शहारुन मी झुरळा सारखा झटकून त्याला दूर करावा. सहजच तुझिया नयनी तेव्हा अंगार क्षणभर फुलूनी यावा, संधी साधुनी तेवढीच मग शब्दांचा तूज मार बसावा . सहजच म्हणूनी बाजाराला, आपण दोघांनी पोचावे, रिक्तहस्ते कैसी परतू मी?