✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चिंब भिजलेली मुलगी

ज
जव्हेरगंज यांनी
Fri, 03/27/2020 - 00:19  ·  लेख
लेख
पावसाळी रात्र. आणि एक सिगारेट. मोकळा बसस्टॉप. छत्री. बाकड्यावर पसरलेले ईवलुशे पाण्याचे थेंब. आणि घोंघावता वारा. चिंब भिजलेली मुलगी कुठुणतरी पळत येते. 'माय गॉड' म्हणून म्हणून मान हलवते. तिची छाती धपापून जाते. आणि सिगारेटचं वलंय काढत मी तिथून चालू लागतो. छत्रीसोबत बरसत्या पाण्याच्या धारा घेऊन. खळाळत्या पाण्यातून वाट शोधत. चिंब भिजलेली मुलगी आता बसस्टॉपवर एकटीच अडकली आहे. रात्र पावसाळी आहे. ये जा करणाऱ्या मोटारींचे पुढचे दिवे तिची साथ करत आहेत. पर्समधल्या छोट्याश्या बाटलीतून ती पाणीही पिली आहे. तिच्या कपाळावर थोडा घामही जमा झाला आहे. ती स्वतःला सावरते. उशिरा का होईना पण ती घरी पोहोचते. रस्ता. अरूंद गल्ल्या. वडाचं झाड. पाण्याची डबकी. आणि लगबगीची सकाळ. चिंब भिजलेली मुलगी सकाळी उठते. केरकचरा काढते. आणि सुंदरसा गजरा तिच्या केसात माळते. मग ती धावपळ करत डबा बनवते. आणि ऑफिसला सुटते. चिंब भिजलेली मुलगी दिवसभर कामात गढून जाते. कधी ती डबा खातही नाही. तर कधी उपाशी राहते. एवढी मोठी बॅग घेऊन ती ट्रेनने प्रवास करते. मग ती थकते. आणि पर्समधल्या बाटलीतलं थोडं पाणी पिते. चिंब भिजलेली मुलगी मला रोज दिसते. रिक्षातून उतरताना ती मान खाली घालते. मग घरी येऊन ओक्साबोक्शी रडते. चरफडत राहते. रात्र तिच्या डोळ्यात साठते. उघड्या डोळ्यांनी ती फॅन वाढवून झोपते. रिकामा बसस्टॉप. आणि एक सिगारेट. चिंब भिजलेली मुलगी धावत पळत येते आणि मान खाली घालून निघून जाते. घरी जाऊन ती एकामागोमाग एक दिवे पेटवते. आणि रात्रभर गाणी ऐकत झोपते. सकाळी ती उशिराच उठते. ऑफिसला सुट्टी टाकून टिपटॉप जीन्स घालते. चिंब भिजलेली मुलगी बेकरीतले तिचे आवडते पॅन्ट्री केक खाते. बाल्कनीत बसून ती नवीनच आलेला सिनेमा पाहते. चिंब भिजलेली मुलगी हरवून जाते. आभाळ तिच्या डोळ्यात दाटत राहते. मग ती एखादा एसएमएस पाठवते. पॉश फर्निचर असलेल्या त्या कॅफेटेरीयात चिंब भिजलेली मुलगी समोरच बसलेली आहे. "सॉरी, माझं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे" म्हणत सिगारेटची वलंयं काढत मी तिथून निघून जातो. कॅफेटेरीयातल्या एसीत चिंब भिजलेली मुलगी आता गारठत चालली आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
3948 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

या महिन्यातली गोष्ट?

कंजूस
Fri, 03/27/2020 - 06:18 नवीन
या महिन्यातली गोष्ट?
  • Log in or register to post comments

खास जव्हेरटच

प्रचेतस
Fri, 03/27/2020 - 06:55 नवीन
खास जव्हेरटच
  • Log in or register to post comments

या जव्हेरभाऊ ला एकदा भेटून

विजुभाऊ
Fri, 03/27/2020 - 09:31 नवीन
या जव्हेरभाऊ ला एकदा भेटून विचारायचं आहे असे एकदम भिडणारे लिखाण कुठून आणतोस म्हणून .
  • Log in or register to post comments

खास जव्हेरटच - प्रचेतस +१

बिपीन सुरेश सांगळे
Fri, 03/27/2020 - 14:15 नवीन
खास जव्हेरटच - प्रचेतस +१
  • Log in or register to post comments

पर्समधल्या छोट्याश्या

श्रीरंग
Tue, 03/31/2020 - 11:37 नवीन
पर्समधल्या छोट्याश्या बाटलीतून ती पाणीही पिली आहे. अरेरे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा