पलायमान (हतबुद्धी)
झंप्या:- उरकलं की नाही रे?
गंप्या:- झालं, पण काहीतरी राह्यल्यासारखं वाटतंय!!
झंप्या:- अस्सं? मग उरक लवकर!!
गंप्या:- तेच!
झंप्या:- तेच काय? उरक म्हटलं ना तुला?
गंप्या:- थांब की जरा!
झंप्या:- अजून? जातोच मी आता?
गंप्या:- आलो म्हटलं ना तुला!!
झंप्या:- तंतरली ?
गंप्या:- ............
झंप्या:- बोल ना तंतरली?
गंप्या:- खिक्क!!
झंप्या:- दात काय काढतोस! कोणीतरी येईल आता. निघ की लवकर!!
गंप्या:- राजें, जरा मान उंचावून वर बघा!!
झंप्या:-अच्छा? तुला नाही दिसत? तूच बघ नि सांग!!
गंप्या:-पलिकडल्या खाचरातून तुझी आवडती व्यक्ती येत्ये!!
झंप्या:- कोण? ती आपली मधल्या आळीतली मधू?
गंप्या:- आपली? नानाची टांग तुझ्या!! पांडू येतोय दांडू घेऊन, पाह्यलंन आंबे पळवताना!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खी: खी:
खिक् !
=))
दादा कोंडके यांचे पंखे दिसत
मस्त आहे विडंबन!!!
मस्त
लेखनविषय..खिखिखि..