लाभांश मिळवा.....मिळवतच राहा.

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
1 Sep 2013 - 2:56 pm

सध्या शेअर मार्केट निपचित पडले आहे. पण जे dividand साठी शेअर घेत असतात त्यांना त्याचा फारसा परिणाम होत नाही. उलट आताच्या पडलेल्या मार्केटमध्येच हे शेअर खरेदी करण्याची उत्तम वेळ म्हणावी लागेल.

पण मी इथे एक वेगळ्या कारणाने अश्या कंपन्यांची लिस्ट देत आहे जिचा लाभांश घोषित झालेला आहे आणि दोन चार दिवसात त्याची रेकॉर्ड डेट आहे. जर रेकॉर्ड डेटच्या दोन दिवस आधी हे शेअर घेतले (मी फक्त १ शेर घेतो रोज.)आणि जे वाढले ते विकले नाहीतर पडून राहिले दरवर्षी त्याच महिन्यात पुन्हा लाभांश देतातच आणि वर्षभरात वाढले तर विकून टाकले ह्या पद्धतीने शेअर आणि लाभांश जमा करत राहणे म्हणजे थोडे ससा कासव पद्धतीने चालणे आहे. पण नुकसान अतिशय किरकोळ आणि टाळता येण्यासारखे असते तसेच सुरुवात केल्यापासून १५-२० दिवसातच रोज बँकेत रु.१ ते रु. ५० पर्यंत पैसे पडताना बघण्याचा आनंद वेगळाच. ह्यात अमाप पैसे येत नसला तरी थेंबे थेंबे येतातच.

जाणकार ह्याबाबतीत अधिक माहिती देऊ शकतीलच.

पण मग ह्या रेकॉर्ड डेट तसेच मिळणाऱ्या लाभांशाचा दर एकत्रित पाहावयाचा असेल तर इथे क्लिक करा.

  • दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी घेतलेला शेअर हि लाभांशास पात्र असतो.
  • दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी घेतलेला शेअर लाभांशास पात्र नसतो.परंतु आदल्या दिवशी विकत घेऊन दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी विकल्यास लाभांशास पत्र असतो.
  • दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या ६-७ दिवस आधी घेतलेला शेअर लाभांशास पात्र असतोच पण लाभांश तारीख जवळ असल्याने त्याच्या किमतीतहि वाढ होत जाते असे सामान्यतः पाहण्यात आले आहे.

एक एक शेअर घेतल्याने माझे दिवसाला २५००/- गुंततात आणि ज्यांचा भाव जसा वाढेल तसे मी ते विकत जातो तसेच आलेला लाभांश परत गुंतवत जातो.....बरे चालले आहे....अजूनतरी.

(शेवटी अनुभव, इच्छा, जबाबदारी ज्याची त्याची....)

शिफारसअर्थव्यवहारगुंतवणूक

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Sep 2013 - 3:05 pm | मुक्त विहारि

ते शेयरचे आणि आमचे काही जुळत नाही....

उद्दाम's picture

1 Sep 2013 - 6:47 pm | उद्दाम

लिस्ट कुठे आहे?

ज्ञानव's picture

4 Sep 2013 - 10:26 am | ज्ञानव

लिस्टसाठीचा दुवा क्लिक केल्यावर एक जाहिरात येते त्या जाहिरातीच्या किंवा स्क्रीनच्या उजव्या हाताला वर कोपर्यात skip ad असे बटण आहे ते क्लिक करा लिस्ट मिळेल.
धन्यवाद

ज्ञानव's picture

4 Sep 2013 - 12:28 pm | ज्ञानव

तसे असल्यास सर्व हक्क अर्धांगिनीला सुपूर्द आहेत. माझ्या आयला (इन्कम हो...आय )तिचे "कर" लागले कि तो केवा आयकर होतो कळत नाही आणि मी काही सुधारत नाही.....असो.
धन्यवाद

तिलोत्तमा's picture

4 Sep 2013 - 11:56 am | तिलोत्तमा

@ आदूबाळ- आपण सी ए / सी ए फायनल चे विद्यार्थि आहात काय??

आदूबाळ's picture

5 Sep 2013 - 9:21 am | आदूबाळ

हो :)

(म्हणजे किंमत डिविडंड धरुन असते) आणि एक्स-डिविडंड प्राईस एकदम खाली येते. निव्वळ डिवीडंड मिळवण्यासाठी ही मेथड अयोग्य आहे. कारण खरेदि आणि विक्रीच्या किंमतीत फार फरक पडला तर तोटा होतो. तुमच्या नशीबानं विक्रीला किंमत जास्त मिळतेय. जपून राहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2013 - 5:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१.

सांभाळून रहा ! शेअर मार्केटमध्ये ही गोष्ट काही नविन अथवा लपून राहिलेली नाही. कोणालाही फार काळ / मोठा फायदा होणे शक्य नाही.

ज्ञानव's picture

4 Sep 2013 - 6:05 pm | ज्ञानव

६ /९/ २०१३ ला भेल एक्स-डिविडंड होतोय. कारण ती त्याची रेकॉर्ड डेट आहे. मी दिनांक ३०/०८/२०१३ ला १ शेर घेतला होता रु.११९ ला घेतला आज दिनांक ४/०९/२०१३ ला १२८ पर्यंत भाव गेला आहे. ३.२९ पैसे प्रत्येक शेर मागे लाभांश आहे म्हणजे परवा तो ३.२९ पैसे तसेच माझ्यासारखे संधिसाधूनि केलेला विक्रीचा मारा लक्ष्यात घेता तो आणखी खाली येणार तर ३.२९ पैसे लाभांश तसेच जो भाव सकाळी असेल तिथे मी विकणार अथवा ठेऊन देणार (जे मी आधीच सांगितले आहे.) पण ह्या प्रकारात तोटा नाही असा माझा दावा नाही. सरावाने ह्या मेथडवर काम केल्यास तुमचा जो पोर्ट फ़ोलिओ तयार होतो त्यात हि कॅपीटल अप्रिसिअशन होतेच हा माझा आजवरचा अनुभव आहे.
जाणकारांनी जुने लाभांशच्या रेकॉर्ड डेटच्या आधी आणि नंतर तसेच रेकॉर्ड डेटच्या दिवशी असलेले भावाचे निरीक्षण केले तर त्यांना माझे म्हणणे कदाचित पटेल.
हे गुंतवणूक आणि केवळ गुंतवणूकतेची मानसिकता असणार्यांसाठी आहे.
बाकी मी संजय क्षीरसागर आणि इस्पिकचा एक्का ह्यांच्या हि मताशी पूर्ण सहमत आहे.

हा आहे. आणि धोधो पैसा मिळण्याचं कारण नशीब आहे. तिसरी शक्यता नाही.

पैसा अशी गोष्ट आहे की तो नक्की कुठल्या सिग्नलला मिळेल हे भिकारी सुद्धा ठरवूनच उभा राहातो.

शेअरबाजार हा निव्वळ जुगार आहे कारण खेळणार्‍यांकडून काहीही वॅल्यू अ‍ॅडिशन होत नसते. शेअर प्राईस हा फक्त जुगार खेळायचा एक पॅरामिटर आहे. एका वेळी मार्केटमधे जितके फायदा मिळवतात तितकाच तोटा झालेले दुसरे असतात असा सरळ हिशेब आहे.

भेलचा शेअर सध्या तुम्ही घेतलेल्या किंमतीच्या वर आहे हा केवळ तुमच्या नशीबाचा भाग आहे.

थोडक्यात "लाभांश मिळवा.....मिळवतच राहा." असे नेहमी होणे नाही.

+१ ० ०
उष्मागतीकीच्या(THERMODYNAMICS) सिद्धांताप्रमाणे उर्जा निर्माण करता येत नाही आणी नष्ट करता येत नाही ती फक्त स्वरूप बदलते
तसेच अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे पैसा हा निर्माण करता येत नाही किंवा पैसा नष्ट करता येत नाही तो फक्त कोणाच्या हातात आहे ते बदलता येते. पैसा हा फक्त शेतीत/ खाणीत निर्माण होतो. बाकी सर्व मूल्यवर्धन असते.
आपण जर एक समभाग विकला तर तो कोणीतरी खरेदी केलेला असतोच म्हणजेच आपल्याला झालेला नफा हा कोणाला तरी झालेला तोटा असतो. याला एक अपवाद म्हणजे जेंव्हा ती कंपनी लाभांश देते हा जर कंपनीला झालेला नफा ते जेंव्हा वितरीत करतात तेंव्हा आपल्याला मिळतो. जर आपली अर्थव्यवस्था सहा किंवा आठ टक्क्याने वाढत असेल तर आपल्याला शेअर बाजारात साधारण सरासरी चौदा ते पंधरा टक्के (करमुक्त) दर साल परतावा मिळू शकतो आणी ते सुद्धा जर आपण तेथे आठ ते दहा वर्षे पैसे टाकून बसलात तर.
मी अर्थतज्ञ नाही पण गेली सहा वर्षे मी शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहे. सध्याच्या पडत्या बाजारात मी एकूण नक्त तोट्यात आहे तरीही माझे एक मत असे आहे कि आपण गुंतवणूकदार(INVESTOR) व्हा सौदागर(TRADER) होऊ नका.( अर्थात आपल्याकडे खेळण्यासाठी भरपूर पैसा असेल तर गोष्ट वेगळी आहे.)
लोकांच्या किंवा आर्थिक सल्लागारांच्या "टिप्स"वर बिलकुल गुंतवणूक करू नका. शंभर टक्के आर्थिक सल्लागारांची भाकिते चुकीची ठरलेली मी पाहत आलो आहे. स्वतः अभ्यास करा आणी आपला अमुल्य पैसा गुंतवणुकीत टाका.
मला टिप्स देणाऱ्या सर्व लोकांना मी एकाच सांगत आलो आहे कि मी डॉक्टरकी करण्यासाठी बारावी नंतर दहा वर्षे खर्च केलेली आहेत आणी त्या नंतर इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मला त्यात थोडेसे समजू लागले आहे (असे माझ्या रुग्णांना वाटते) आपण टीप देण्या अगोदर शेअर बाजारात किती अभ्यास आणी अनुभव घेतला आहे?
आपले मित्र आपल्याला बर्याच वेळेस प्रामाणिक आणी सद्भावाने सल्ला देतात तरीही आपण त्या सल्ल्याचा स्वतः अभ्यास केल्याशिवाय पैसे गुंतवू नयेत असे माझे मत आहे.
याच न्यायाने मी ज्ञानाव साहेबांचा प्रामाणिक सल्ला सुद्धा स्वतः अभ्यास केल्याशिवाय वापरू नये.
(ज्ञानाव साहेब यात आपल्या प्रामाणिक हेतू बद्दल कोणतीही शंका नाही आणी आपण सल्ले देत रहा. फक्त लोकांनी आपली बुद्धी वापरून कोणताही सल्ला स्वीकारावा असे माझे मत आहे. आपल्याला यातून कोणताही त्रास झाला असल्यास मी अत्यंत दिलगिरीने माफी मागतो.)
मी शेअर बाजारात सहा वर्षे झाल्यावरही कोणालाही कोणताही सल्ला देत नाही.(सबब मागू नये मिळणार नाही)

सुधीर's picture

5 Sep 2013 - 10:15 am | सुधीर

"पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं"
संक्षींच्या या वाक्याशी शतशः सहमत. पैसा कमवणं आणि कष्टाने कमविलेल्या पैशाची देखभाल घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शेअर बाजारातली "गुंतवणूक" ही दुसर्‍या गोष्टीची एक बाजू आहे.

त्यामुळे शेअर बाजार निव्वळ जुगार आहे याशी असहमत. ऑप्शन्समध्ये (करन्सी वा इक्विटी वा कमोडीटी) स्पेक्युलेटीव्ह ट्रेडींग (सट्टा) हा निव्वळ जुगार होऊ शकतो. पण इनव्हेस्टमेंट वा गुंतवणूक म्हणून जेव्हा शेअर बाजाराकडे पाहिल्यास तो जुगार ठरत नाही ते कंपन्या आणि गुंतवणूकदार दोहोंच्याही फायद्याच असतं. एखाद्याला फायदा होतो तेव्हा दुसर्‍याला तोटा होतो हे ऑप्शन्स ट्रेडींग मध्ये होतं पण इक्विटी मध्ये तसं नसतं. (तेही केवळ सट्टा लावत असतील तरच, आधीच असलेली जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने लावलेली ऑप्शन्स मधली बोली हा केवळ सट्टा नसतो) शेअर विकत घेणार्‍या व्यक्तीच्या गुंतवणूकीचा कालावधी सुरु होत असतो तर विकणार्‍याचा संपत असतो. पारंपारीक जमीन आणि सोन्याप्रमाणे शेअर पण शेवटी एक अ‍ॅसेट आहे त्याची किंमत कंपनीच्या भूतकाळातल्या आणि भविष्यकाळातल्या कामगीरीवर खाली-वर होत असते. गरज असते ती गुंतवणूक करताना गुंतवणूकीचा कालावधी, गुंतवणूकीतली जोखीम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुंतवणूकीचं उद्दिष्ठं माहीत असण्याची.

तो जुगार ठरत नाही

सुधीरश्री, शेअरमधल्या गुंतवणूकीला दोनंच परिमाणं आहेत : लाभांश आणि अ‍ॅप्रिसिएशन.

डिवीडंड पेइंग कंपन्यांच्या शेअरचं बाजारमूल्य इतकं अवाजवी असतं की दर्शनी किंमतीवर मिळणारा लाभांश हा % रिटर्न म्हणून नगण्य ठरतो.

डायरेक्ट ग्रोथचा एकमेव आनंद बोनस शेअर देतात पण तो नशिबाचा भाग आहे.

बाकी दीर्घकालीन गुंतवणूक करून प्राईस डिफरंशीयल मिळवण्यासाठी ती इंडस्ट्री, उद्योजकांची नितीमत्ता, देशाचं औद्योगिक धोरण, डिमांड-सप्लाय फॅक्टर्स, बोर्ड ऑफ डिरेक्टरर्सची बांधिलकी असे अनंत पॅरामिटर्स आहेत. आणि अशाप्रकारे गुंतवणूक करून यशस्वी झालेले दुर्लभ. कारण देशाच्या विकासाची दिशा, इथल्या उद्योजकांची नितीमत्ता, राजकीय भ्रष्टाचार यामुळे इतक्या दूरगामी विचारांना दोन-पाच लाख गुंतवणारा `समंजस निर्णय घेतल्यानं यशस्वी झाला' म्हणणं मजेशिर होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Sep 2013 - 7:36 pm | प्रकाश घाटपांडे

+१

सोत्रि's picture

8 Sep 2013 - 9:08 am | सोत्रि

आणि धोधो पैसा मिळण्याचं कारण नशीब आहे

देव नाही असे ठाम मत व्यक्त करणार्‍यानेच हे म्हणावे हे कॉन्ट्राडिक्शनचे उदाहरण म्हणावे का? :)

- (देव मानणारा नशिबावान) सोकाजी

देव ही कल्पना आहे याचा त्या अनिश्चिततेशी काही संबंध नाही.

कदाचित तुमच्या अनुभवाने तुम्हाला हा अनुभव दिला असेल पण मी शेर मार्केटला स्ट्रोन्गली कन्विन्सड आहे. आणि नशिबापेक्षा प्रयत्नाला मानतो. आणि यशस्वीपणे गुंतवणूक करत हळू हळू पुढे सरकत आलोय तेव्हा ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्यातला फरक चांगला समजतो.

पैसा अशी गोष्ट आहे की तो नक्की कुठल्या सिग्नलला मिळेल हे भिकारी सुद्धा ठरवूनच उभा राहातो.....अगदी सहमत आणि आपले प्रत्येकाचे सिंग्नाल्स शोधण्याचे प्रयत्न चुकले तर नशिबाला दोष देणे हि मानवाची मूळ भावना उफाळून येते. आणि जर सिग्नल जमला तर माझे प्रयत्नच सुयोग्य होते म्हणून आपण दिन्ग्या मारायला मोकळे होतो.

थोडक्यात शोधणे संपले तर नशीब देते ते स्वीकारावे लागते.....असो मी पामर तेवढा अनुभवी नाही.

नाही. ती वास्तविकता आहे.

तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा ठेवून सांगतो, एखादा नुसतं बेसिक लॉजिक बघून विषय समजू शकतो, त्याला अनुभवाच्या सायासातनं जावं लागत नाही.

मी माझे विचार मांडलेत. पैशाच्या बाबतीत कुणीकुणाला जुमानत नाही हे पण तितकंच खरं!

ज्ञानव साहेब
वर सर्व लिहिले असूनही मी अजून शेअर बाजारात व्यवस्थित पाय रोवून आहे आणी माझ्या मुलांना मी त्याचे बाळकडू सुद्धा देत आहे. तरीही आपण म्हणाल त्यावेळेस आपला पूर्ण पैसा आपल्याला परत मिळेलच याची शंभर टक्के शाश्वती देता येत नाही म्हणून आपला चरितार्थाचा विषय आणी गुंतवणुकीचा विषय वेगळा ठेवावा. या सिग्नल शोधण्याच्या प्रयत्नात दिवाळे काढून शेअर बाजारातून बाहेर गेलेले शेकडो लोक मी पाहिले आहेत आणी पाहतो आहे.

ज्ञानव's picture

4 Sep 2013 - 8:32 pm | ज्ञानव

डॉक्टर साहेब, धन्यवाद,
आपल्याला माझा मुद्दा लक्षात आला असावा असे एकूण वाचनातून जाणवले आणि त्रास होण्याचा मुळी प्रश्नच नाही कारण आपण जे लिहिले आहे तेच मी हि म्हणतो आहे कि ट्रेडिंग करू नका गुंतवणूक करा पण त्यातही वाजली तर पुंगी नाहीतर मोडून खाल्ली ह्या अर्थाने मी माझा मूळ मुद्दा वर मांडला होता. सल्ल्याचे म्हणाल तर मी हि तो देत नाही आणि घेत नाही. स्व-अभ्यास हाच उपाय सर्व क्षेत्रात लागू आहे. मी १९९४ पासून ह्या आणि फक्त ह्या एकाच क्षेत्रात आहे आणि पैसा कमी आणि अनुभावाची शाळाच जास्त शिकलो आहे. आणि आज माझा १४ वर्षाचा मुलगासुद्धा हेच शिक्षण (बाळकडू) घेतो आहे. सल्ला म्हणून नव्हे तर एक निरीक्षण म्हणून मी जे नोंदवले त्याचा जर आपणास अभ्यास करावयाचा असेल तर आपला इमेल आयडी मला व्य. नि. करा मी एक एक्सेल शीट तुम्हाला पाठवतो ज्यात वर्षभर फक्त एक शेर मी घेत आलोय आणि ३% वर गेल्यावर विकत आलोय. ह्या व्यतिरिक्त अनेक strategi आहेत नियम तोच कि हे माझे निरीक्षण आहे माझा सल्ला नाहीच.

वाटाड्या...'s picture

5 Sep 2013 - 12:21 am | वाटाड्या...

असलं काहीही करायच्या भानगडीतच पडत नाही..मार्केट वोलाटालिटी इतकी आहे की मी कुठल्याही पोसिशनवर लाँग रहात नाही...त्यामुळे आजतागायत कधीही तोटा झालेला नाही. मागच्या वर्षी ४५% आणि ह्या वर्षी ८३% आतापर्यंत झालेला फायदा यातचं सगळं आलं.

बाकी चालुद्या..

- (मजानी लाइफवाला) वाट्या...

अशोक पतिल's picture

5 Sep 2013 - 10:51 am | अशोक पतिल

गेल्या काही वर्षापासुन शेअर मार्केट हे म्यानुपुलेतेड झालेले आहे. या मध्ये मागणी तितका पुरवठा हे तत्व लागु होत नाही.काही अन्यलिसीस मध्ये (चार्ट / टेक्निकल ) जे काही बेसिक्स आहेत,,त्याच्या विपरीत मार्केट्/शेअर वल्यु होते.
मला सुबोध सरांचे की पैसा हा फक्त शेतीत/ खाणीत ( धंद्यात ) निर्माण होतो, हे पुर्णपणे पटले आहे .

ज्ञानव's picture

5 Sep 2013 - 1:05 pm | ज्ञानव

रोजची भाजी मासे ताजे आहेत का हे पाहण्यची जशी रित आहे तसेच सदनिका खरेदी सोने खरेदी किंवा थोडक्यात कुठल्याही व्यवहाराची एक रित असते जर ती रीतच माहित नसेल तर आणि केवळ कर्णोपकर्णी ऐकून केलेले व्यवहार अथवा अज्ञानाने केलेली कुठलीही कृती हा जुगारच आहे. वारेन बफे, जॉर्ज सोरोस, लिंच, हि सगळी माणसे केवळ जुगार अथवा नशिबाने मोठी झाली असे म्हणणे म्हणजे त्यांचा घोर अपमानच आहे.

तसेच अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्ञान आणि वय दोन्ही गुंतवणुकीसाठी खूप मोठा रोल प्ले करतात. शेर बाजारातली गुंतवणूक हि अत्यंत धीम्या गतीने भांडवल वृद्धी देत असते ती गती चक्रवाढ पद्धतीने वाढवणे सहज शक्य असते जर तुम्ही शाळेत असल्यापासून सुरवात कराल आणि तुम्हाला एक योग्य मार्गदर्शक मिळाला तर (हा नशिबाचा भाग आहे नक्कीच.)अन्यथा तुम्ही स्वतः शिक्षण घेणे आणि पुढे सरकणे हा एकच उपाय आहे जिथे सामान्यतः कुणी वळत नाही कारण विषय रुक्ष आहे. झटपट पैसा मिळतो हा मोठा गैरसमज आहे जो प्रत्यक्ष शेर मार्केटशी संबंध आल्यावर दूर होतो आणि निराशा तोटा पदरी पडून बाजाराने बुडवले असे आपण म्हणतो........वेळेवर फलाटावर जायला आपण चुकलो तरी गाडी चुकली असेच आपण म्हणतो.....त्यातलाच प्रकार.

पण चालू द्या कारण त्या निमित्ताने माझ्या लाडक्या व्यवसायाबद्दलची मते मला वाचायला गम्मत वाटते आहे.

(भेल आज १३२ झाला उद्याचे काय ????? उद्या काय १२५ असेल तर विकणार नाहीतर पडून राहो बापडा...)

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2013 - 3:02 pm | संजय क्षीरसागर

तो कंपनी टेकोवर करतो. ही बिकम्स अ स्टेकहोल्डर इन द कंपनी अँड कंट्रोल्स द बोर्ड. त्याचा लाँगटर्म म्हणजे कंपनीच्या भविष्याचा दिशादर्शक असतो. त्याची तत्त्वं त्या स्टेकला काम करतात. कम-डिविडंड शेअर घेऊन एक्स-डिविडंड विकणार्‍यांसाठी त्याची तत्त्व कामाची नाहीत.

पंचविसशे रुपयाचा एक शेअर घेतल्यावर रोज सकाळी ऊठून तो फक्त वरखाली होतोयं हे पाहण्यापलिकडे आपल्या हातात काही नसतं.

चौकटराजा's picture

5 Sep 2013 - 4:13 pm | चौकटराजा

शेअर मार्केट मधे मी आजपर्यंत प्लस मधे आहे की मायनस मधे ? बहुतेक प्लस मधे आहे. पण ते संक्षी नी म्हटल्याप्रमाणे नशीबानेच. अभ्यासाने वगैरे काही नाही. माझा एक ओळखीतला माझ्या पेक्षा पैशाने फार पुढे गेला शेअर मार्केट मुळे.पण तो शेअरचा जुगार खेळून नव्ह्वे तर दलाल होऊन . तो म्हणतो माझ्या कडे येणार्‍या लोकांच्या मनाच्या
चढउताराची गंमत मी शांतपणे पहात बसतो. मला एक दोन टक्के मिळाले तरी त्यात मी प्रचंड समाधानी असतो. रूपये पन्नास हजार भरून पुणे स्टॉक एक्स्चेंजची मेंबरशीप घेतली हीच काय ती एकमेव खेळी तो खेळलेला आहे.
मी एक नंबरच्या लॉटरीत मात्र प्लस मधे राहिलेला आहे . त्यात माझी कमाई शंभर सवाशे रुपयाची असेल. ती बॅकेतील
व्याजापेक्षा जास्त ठरत असे. पण मी एक वेळीच शिकलो ते असे की एक नंबरची ( भूतान फेम ) लॉटरी हा चिडीचा डाव
असायचा. म्हणजे असे की येणारा आकडा ठरवून त्या आकड्याची मोजकीच तिकिटे बाजारात वितरीत करणे. मी दोन दोन वर्षाची रेकॉर्डस तपासून काल्पनिक पणे खेळ खेळून पाहिले . दहा आकड्यांमधील प्रॉबेबिलेटीची वेगवेगळ्या योजना वापरून पाहिल्या.पण शेवटी या निर्णयास आलो की कोणतीही एकच योजना धरून चाललो तर हमखास हरायला होते. व आयुष्यातून उठण्याची परिस्थीती निर्माण होउ शकते. माणूस एखाद्या योजनेने यश मिळाले की तीच योजना कायम वापरून पाहील तर जुगारच काय कोणत्याही क्ष्रेत्रात अपयश येउ शकते ( अपवाद मुलभूत वैज्ञानिक योजना ) . कारण अर्थ शास्त्र हे एक भंपक शास्त्र आहे. त्यातील बरेचसे काही नुसते कागदावर घडते. नो इकॉनॉमिक पॉलिसी इज आयडीयल फॉर एव्हर !

ज्ञानव's picture

6 Sep 2013 - 9:47 am | ज्ञानव

दिनांक ३०/०८/२०१३ खरेदी १ शेअर ११९
दिनांक ०६/०९/२०१३ खरेदी १ शेअर १३६
-------------------------------------
नफा १७
अपेक्षित लाभांश ३.२९
--------------------------------------------
२०.२९

वरील घटनेकडे एक उदाहरण म्हणून पाहावे आणि इम्प्रोवाइज करावे.
आज मी १ अबन घेतला २१९ ला......
बघू यात पैसे देतो कि पाहुणा म्हणून येतोय लाभांश रेकॉर्ड डेट ११-०९-२०१३ आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2013 - 12:30 pm | प्रकाश घाटपांडे

हे गतकाळातील अथवा पश्वातबुद्धी ने केलेले विश्लेषण झाले. जर ३० तारखेला भेल घेतला असता व आज विकला असता तर नफा १७ व लाभांश ३.२९ मिळाला असता. त्यात ही ब्रोकरेज वजा करावे लागेल.माझ्या मते शेअरमार्केट मधे स्थिर बुद्धीने गुंतवणुक करता येत नाही. तुमचा मेंदु सतत वाढला का कमी झाला या अस्थिरतेतच गुंतुन पडतो.

अग्निकोल्हा's picture

6 Sep 2013 - 7:31 pm | अग्निकोल्हा

तुमचा मेंदु सतत वाढला का कमी झाला या अस्थिरतेतच गुंतुन पडतो.

होय वाढला तरी समाधान नाही अन कमि झाला तर वतागच निर्माण होतो. पण नुसते निर्णय घेउन पैशाने पैसा लाटायचे एक वेगळच थ्रिल आहे, आणि त्याचा आनंद अधुन मधुन द्विगुणित होणे म्हणजे एक सुरेख भावना असते. मजा येते. वाइटही वाटते.

ज्ञानव's picture

6 Sep 2013 - 1:54 pm | ज्ञानव

मी तीस तारखेला भेल घेतला आहे. कारण त्याची रेकॉर्ड देत आज होती. आज तो विकून अबन घेतल्याचेहि नोंदवले आहे. हि पश्चात बुद्धी नक्कीच नाही.
तुमचा मेंदु सतत वाढला का कमी झाला या अस्थिरतेतच गुंतुन पडतो. बुद्धिहीन गुंतवणूक किंवा कुठलीही कृती अगदी प्रतिसाद देण्या अगोदर मुळ धागा ना वाचणारे जेव्हा आपली प्रतिक्रिया देतात तेव्हाही ती बुद्धी "स्थिर" कुठे असते?

प्रकाश घाटपांडे's picture

7 Sep 2013 - 7:13 pm | प्रकाश घाटपांडे

.

ज्ञानव's picture

11 Sep 2013 - 10:03 am | ज्ञानव

६/०९/२०१३ ला घेतलेला अबान रु. २१९
११/०९/२०१३ ला विकलेला अबन रु. २२६
-------------------------------------
नफा रु. ७.००
लाभांश रु. ३.६०
--------------------------------------
रु. १०.६०/-

भेल आणि अबान हि दोन यशस्वी उदाहरणे आहेत. तशीच काही अयशस्वी उदाहरणेहि आहेत जी मला ६-७ महिने सांभाळून मग विकण्याची संधी मिळाली नफ्यात तोटा झाला थोडा पण नक्त तोटा कधीच नाही ह्याला कारण फक्त एक शेअर असल्याने आणि वर्षाला ३६% भांडवलावर वृद्धी अपेक्षित असल्याने हे सोपे जाते. १० पैकी किती नफ्यात आणि किती तोट्यात हे न पाहता एकूण भांडवलावर ३६% वृद्धी झाल्यास मी बाहेर पडतो....हे सर्व देण्यामागचे कारण काही प्रतिसाद माझ्या शेअर मार्केटला नाव ठेवणारे होते जे मला त्रासदायक होतात कारण रस्त्यावरचा पानवाला जेव्हा मनमोहन सिंग किंवा चिदंबरम चुकीचे वागतात म्हणतो तेव्हा त्याची स्वतःची घरची आर्थिक परिस्थिती कशी ओढाताणीची आहे हे त्याला दिसत नसते कारण तो स्वतःच्या घर पुराताही अर्थतज्ञ नसतो पण भारताच्या आर्थिक स्तराबद्दल आणि हे दोन दिग्गज कसे चुकताहेत हे सांगण्यात धन्यता मानत असतो. तसेच काही शिकलेली मंडळी जेव्हा कुठल्याही विषयावर मत मांडतात तेव्हा त्याचा किती सखोल अभ्यास करतात ह्याबद्दल शंका येते कारण मी दलाली, ट्रेडिंग,गुंतवणूक ह्या विषयात गेली अनेक वर्ष अनेकांशी संपर्कात आहे पण आम्ही मराठी शेअर मार्केटला एक जुगार (!!!!!) म्हणून का बघतो ते कळत नाही.
सरकार जेव्हा मार्केट पडते तेव्हाही ज्याला १०० वर्षाहून अधिक काळ झाला त्याच शेअर मार्केटमध्ये, एल आय सी ला पैसे ओतायला सांगते (ते हि जुगारात !!!!!)????
हा दैव दुर्विलास नव्हे का कि नाटक सिनेमा,क्रिकेट, अध्यात्म आणि अनेक विषयाचे ज्ञान असलेले आपण बघू तरी साल मार्केट मार्केट म्हणतात ते काय असते असे म्हणून त्याचे सखोल ज्ञान जे फुक्कट मिळू शकते तेही मिळवत नाही आणि तो जुगार आहे हे भाष्य आपण बिनदिक्कत करतो.
असो..कदाचित मी वाहवत जातोय SORRY

पण वाईट काही नसतेच तो माझ्या नजरेचा दोषच असतो.
अधिकाधिक मराठी लोकांनी निदान मार्केटला जाणून घ्यावे हिच एक प्रामाणिक इच्छा

खाली बघा. सर्व सरकारी कंपन्या किंवा बँका आहेत. त्यामुळे धोका कमी. सध्या चे लाभांश उत्पन्न चांगले आहे.

Stock CMP Dividend Yield
Bank of Baroda 535 4.02%
BHEL 140 3.86%
Canara Bank 230 5.65%
Dena Bank 52 9.04%
IDBI Bank 61 5.74%
IFCI 22 4.55%
Indian Bank 72 9.17%
PNB 510 5.29%
SJVN 20 4.60%
Syndicate Bank 74 9.05%
Corporation Bank275 6.91%
REC 196 4.21%
NMDC 125 5.60%

उद्दाम's picture

21 Sep 2013 - 12:18 pm | उद्दाम

in cash market? or F & O ?

update your trades here regularly.

ज्ञानव's picture

16 Sep 2013 - 8:28 pm | ज्ञानव

छानच "प्रसाद" दिलात गणपतीत.
धन्यवाद