"मे आय कम इन सर?"
"येस, प्लीज"
"थँक यू!"
"आकाश देशमुख! बरोबर?"
"हो सर."
"आपण बोललो होतो फोनवर"
"हो"
"ते मिस्टर दातार ज्यांच्या रेफरन्सने तुम्ही आलायंत ते तुमचे कोण?"
"ते बाबांच्या अॉफिसात आहेत."
"अच्छा!"
"बरं! तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मधे काय केलंयत?"
"मी BE केलंय सर Electronics ब्रँचमधून"
"अरे बापरे! इलेक्ट्रॉनिक्स?"
"हो सर.का? काय झालं?"
"अरे यार ! जरा मेक,इलेक्ट्रिकल,केमिकल असलं काहीतरी घ्यायचं ना!"
"पण आता पूर्ण केलंय सर इलेक्ट्रॉनिक्स तर...."
"अोके आकाश.मुद्द्यावर येऊया.तुमच्या ब्रँचशी रिलेटेड असं फारसं काम इथे नाहीये.आपली कंपनी मेकॅनिकलच्या फिल्डमधे काम करते.त्यामुळे इथं जो काही इलेक्ट्रॉनिक्सचा मेंटेनन्स लागेल तो देऊ शकाल का? अर्थात मेंटेनन्स काय म्हणा? कधी गेलं तर आतलं कार्ड किंवा बसवता येणारा एखाद-दुसरा कॉम्पोनन्ट गेला तरंच.कराल हे?"
"हो चालेल सर!"
"ठिक.मग उद्यापासूनच या.महिना ६ हजार रु.देऊ तुम्हाला"
"६?"
"खराब सर्किट बोर्ड बदलणे,किरकोळ सोल्डरिंग,किरकोळ टेस्टींग याचे किती द्यायला हवेत तुम्हाला?"
"पण ६ म्हणजे?"
"अहो SMD कॉम्पोनन्ट बसवलेले असतात PCB वर.त्यातले किरकोळ खराब कॉम्पोनन्ट काढून बसवणं ठिक आहे पण जास्त असतील तर सरळ बोर्डच बदलतो आम्ही.स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी आहे सरळ सरळ!"
"दुसरं एखादं डिपार्टमेंट नाही का? जिथे बर्यापैकी काम असेल?"
"आहेत की.पण तिथं इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांचं काम नाही.आमच्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्सच्या हेडनी तर सरळ सांगितलंय.इलेक्ट्रिकल वाला असेल तरंच इंटरव्ह्यूला पाठवा म्हणून!"
"बाकीची कामं सगळी मेकची.तिथंही तुमचा उपयोग नाही."
"ठिकै सर! मी अजून एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिलाय.तिथून अजून काही कळलं नाहीये.उद्या कळवतील बहुधा."
"हाहाहा!"
"काय झालं सर? हसलात का?"
"मिस्टर आकाश बसा दोन मिनिटं! बसा बसा!"
"हे केस उन्हात नै पांढरे झाले.मी ६ हजार महिना म्हणालो म्हणून इथून कल्टी मारताय हे कळलं नाही असं वाटलं का तुम्हाला?"
"सॉरी सर!"
"इट्स अोके.समजू शकतो मी" बसा जरा माहिती देतो तुम्हाला.उपयोगी पडेल."
"पण ही फॅक्ट आहे.इलेक्ट्रॉनिक्सला नोकरी,व्यवसायाच्या दृष्टीने भारतात फारसा स्कोप नाहीये."
"साध्या मोबाईल फोनपासून ते लाखो रुपयांच्या टिव्हीपर्यंत सगळं चीन किंवा कोरियातून येतं.जास्तकरुन चीनमधूनंच.पूर्ण वस्तू तरी येते किंवा स्पेअर पार्ट आणून इथं असेंब्लीतरी होते.भारतात १०० कोटीच्या आसपास मोबाईल हँडसेटस असतील.त्यातले पूर्णपणे भारतात किती बनतात? अगदी थोडे."
"रिपेअरीचं म्हणालं तर इलेक्ट्रॉनिक्समधे फेल्युअरचं प्रमाण आताशा कमी झालंय."
"आणि असेंब्ली म्हणाल तर तिथं आयटीआयवाले घेेतात किंवा क्वचित डिप्लोमावाले.बीईवाला असेंब्लीला घेणं ही कोणत्याही कंपनीसाठी रिस्कंच असते.त्यांना जास्त पगाराची अपेक्षा असते.त्याऐवजी कमी पगारात आयटीआयवाला अनेक वर्षं सेवा देतो.सोडून जात नाही."
"आणि आता तर अॉटोमेशन वाढेल तसं मॅन्युअल वर्क अजून कमी होत जाईल.अॉटोमेशनमधेही इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना इन्स्टॉलेशन हेच जरा बरं काम आहे"
"सर! मेकॅट्रॉनिक्समधे काही स्कोप असेलंच की!"
"रोबोटिक्ससुध्दा फक्त मोठ्या कंपन्यांनाच परवडणारं आहे.आणि रोज उठून काही रोबोटीक अार्म्समधे बिघाड होत नाही.झाला तरी परत त्यातंलं तंत्रज्ञान इतकं किचकट असतं की तुमच्यासारख्या फक्त बीई झालेल्याच्या हातात देतील असं नाही वाटंत"
"म्हणजे मला एखाद्या आयटी कंपनीतच जॉब बघायला हवा."
"नीट माहिती करुन मगच जा तिथे! अन्यथा इलेक्ट्रॉनिक्समधे डाळ शिजत नाही म्हणून तिथं जात असाल तर नका जाऊ!"
"तसंही आयटीत आता इथून पुढे किती काळ टिकता येईल हा प्रश्नंच आहे.तिथंही हल्ली बुडावर लाथ बसण्याचं प्रमाण वाढलंय.अचानक काढलं जाण्याला विरोध म्हणून आयटीवाल्यांनी बंगळूरात कसलीशी संघटनाही बांधल्याचं वाचलं होतं पेपरात."
"मग काय करावं? तुम्हीच सांगा"
"एक सुचवू? बघा पटतंय का?"
"बोला सर"
"कोणतीही कंपनी इंजिनिअरिंगच्या कुठल्याही शाखेत का काम करेना त्यांचा सगळा डोलारा उभा असतो तो सेल्स आणि मार्केटिंगवर.एकतर MBA करा किंवा ते शक्य नसेल तर निदान एखाद्या खाजगी संस्थेतून सेल्स,मार्केटिंग चा छोटा कोर्स करा.पण MBA झालं तरंच सेल्स जमतो हा भ्रम काढून टाका. चांगल्या मार्कांनी MBA करुनसुध्दा प्रत्यक्षात सेल्समधे माती खाल्लेले लोक आहेत."
"तुम्ही फारसे बोलके किंवा गो गेटर वाटत नाही आहात पण करियर घडवायचं असेल तर हा बदल करा.सेल्समधे हाच जास्त लागतो.बोलणी खावी लागतात.म्हणूनंच बरेचजण तयार नसतात सेल्समधे जायला.जरा निगरगट्ट व्हा."
"पण सेल्समधे पैसेही बर्यापैकी मिळतात.हे सुध्दा विसरु नका.बनवणार्या कंपन्या भरपूर आहेत.बनवलेलं विकणारा मात्र दुर्मिळ आहे"
"हो सर.तुम्ही सांगितलंत त्यावर नक्की विचार करतो"
" विचार नको आता अॅक्शन घ्या."
"हो"
"अजून एक करा"
"काय?"
"कोणी जात असेल इलेक्ट्रॉनिक्सला तर मी जसं तुमचं बौध्दिक घेतलं तसंच त्याचंही घ्या.एखादा धारेला न लागता वाचला तर वाचू देत बिचारा!"
"हो.अगदी नक्की!"
"थँक्स सर!"
वाचने
21615
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजेदार अनुभवावर आधारीत कथा
धन्यवाद!
चुकून
अगदी खरे आहे.
सहज सुंदर लिहले आहे.
विशुमित
In reply to सहज सुंदर लिहले आहे. by विशुमित
छान लिहिले आहे
भयानक वास्तव
Embedded सिस्टिम्स आणि IOT
sagarpdy
In reply to Embedded सिस्टिम्स आणि IOT by sagarpdy
१. आकडेवारीत माहिती विचाराल
In reply to sagarpdy by उपयोजक
माहितीबद्दल
In reply to १. आकडेवारीत माहिती विचाराल by sagarpdy
Embedded सिस्टिम्स मधील
In reply to Embedded सिस्टिम्स आणि IOT by sagarpdy
सीओईपी मध्ये फार्फार
थत्तेकाका
In reply to सीओईपी मध्ये फार्फार by नितिन थत्ते
हे E&TC बद्दल
हे पहा!
ईलेक्ट्रॉनिक्सचे मार्केट खाली येतेय?
प्रोसेस ओटोमेशन
एवढं
धागा आणि त्या अनुषंगे येणारे
इलेक्ट्रॉनिक्स
मस्त दिल खोल के बजाया है . मित्रा .
मेकला स्कोप ?
शब्दानुज,
In reply to मेकला स्कोप ? by शब्दानुज
.
In reply to शब्दानुज, by उपयोजक
शब्दानुज
In reply to . by शब्दानुज
मी काय म्हणतो!
च्यामारी वांडोबा,
In reply to मी काय म्हणतो! by जेम्स वांड
आपला काय विंजीनेर लोकांवर डूख नाय कलाकार!
In reply to च्यामारी वांडोबा, by अभ्या..
वांडसाहेब,
In reply to मी काय म्हणतो! by जेम्स वांड
हा खरा विषय हाये काय?
In reply to वांडसाहेब, by उपयोजक
वांड सायेब विषय त्यो न्हाई
In reply to हा खरा विषय हाये काय? by जेम्स वांड
एक तो घोडा बोल या तो चतुर बोल
In reply to वांड सायेब विषय त्यो न्हाई by उपयोजक
कोणासाठी
In reply to एक तो घोडा बोल या तो चतुर बोल by जेम्स वांड
बरच काही लिहावं वाटत होतं पण...
आणि हो
In reply to बरच काही लिहावं वाटत होतं पण... by महेश हतोळकर
यंत्रोपवित
शब्दानुज
>
विस्तार न पावणा-या कंपन्या'
अरेरे
In reply to विस्तार न पावणा-या कंपन्या' by अभ्या..
जेम्स भाऊ पेटवा पेटवा पोरांना
In reply to अरेरे by जेम्स वांड
विशु पाटील
In reply to जेम्स भाऊ पेटवा पेटवा पोरांना by विशुमित
नफा कमवणे आणि काही
In reply to विस्तार न पावणा-या कंपन्या' by अभ्या..
सिव्हील सोडल्यास बाकीच्या
माझे काही मुद्दे:
समजून नाही घेणार तो मिपाकर कसला...
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
जबरदस्त!
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
ए...जिगर भावा.
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
धन्यवाद
In reply to ए...जिगर भावा. by अभ्या..
प्रतिसात खूप आवडला.
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
बी ई झाल्या झाल्या माझ्या मते
विश्वास पानिपतवर गेला!
In reply to बी ई झाल्या झाल्या माझ्या मते by जयंत कुलकर्णी
वाचतो आहे. खेडूतकाकांच्या
शब्दानुज यांनी
शब्दानुज यांनी
कॉप्यूटरचे मित्र सुरवात २-३ लाखच्या
फुकट काम!
In reply to कॉप्यूटरचे मित्र सुरवात २-३ लाखच्या by कपिलमुनी
Doctors, lawyers, MBAs in the
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Ventures - Wipeout live in Japan 1966आयटीत जॉब आहेत असं वाटणार्यांसाठी
जे वरील लेखकाच्या मित्रयादीत नसतील त्यांच्यासाठी