सैल असावी मिठी जराशी...
लेखनविषय:
काव्यरस
सैल असावी मिठी जराशी,
हळूच वळुनी तुला बघाया,
अर्ध्या मिटल्या तव नयनांचे,
ओले हळवे चुंबन घ्याया..
रेशीम काळे केस उडोनी,
कुरळ्या लाटा बाहुंवरती,
मऊ मुलायम आखीव रेखीव,
घटद्वयांना व्यर्थ लपवती...
जरा विसावून सिंहकटीवर,
मधूर मादक श्वास फुलावे,
अधीर कोडे या विश्वाचे,
गहि-या डोही उकलून यावे..
पहाटवारा लगबग करतो,
घेऊन येतो थोडे केशर,
स्वर्णीम करतो शर्मिल गाला,
तलम तृप्तीचे शिंपून अत्तर..
( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)
वाचने
17094
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
सुंदर कविता.
( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)रेखो म्हणजे कोण?
In reply to सुंदर कविता. by प्रचेतस
धन्यवाद!
रेणुका खोत.
In reply to धन्यवाद! रेणुका खोत. by प्राची अश्विनी
रेखो आहेत का मिपावर?
In reply to तलम! by अनुप देशमुख
माहित नाही.
रेशीम काळे केस उडोनी,
कुरळ्या लाटा बाहुंवरती,
मऊ मुलायम आखीव रेखीव,
घटद्वयांना व्यर्थ लपवती...
घटद्वय लपवले जातात ?
म्हणजे कुठले घटद्वय ?
म्हणजे हे स्त्रीचे पुरुषाने केलेले वर्णन आहे की
पुरुषाने स्त्रीचे केलेले वर्णन टीसि?
सिहकटी आणि घटद्वय मुळे कन्फ्युज झालोय
In reply to माफ करा कन्फ्युज झालोय by मारवा
मारवा, मारवा, __/\__.
आता काय बोलू? जे आवडेल ते मानायला हरकत नाही.:)
In reply to माफ करा कन्फ्युज झालोय by मारवा
माझ्यामते, पुरुषाने स्त्रीचे हळवेपणाने केलेले वर्णन असावे..
प्राचीजी, कविता आवडली. सुंदर शृंगारीक कविता..
अवांतर : मागे कुठल्यातरी धाग्यावर 'पुरुष बायकांच्या भावनांना / समस्यांनादेखील पुरुषांच्याच नजरेने पाहतात..' अश्या आशयाची प्रतिक्रीया आणि त्यावर चर्चा वाचली होती. माझ्यामते, ही कविता म्हणजे कवियत्रीने स्त्रीच्या सौंदर्याचे व भावनेचे 'परकाया प्रवेशातून' केलेले वर्णन आहे..
In reply to माझ्यामते.. by चिगो
तसंही म्हणता येईल. स्त्री ने लिहिलेली पण पुरुषाच्या दृष्टीने म्हणूनच मारवा गोंधळले.
पण ही कविता एका सुंदर क्रीडेचं वर्णन आहे की जिचा स्त्री पुरुष दोघांनीही सम आनंदात भोग घेतलाय. त्यामुळे हे त्यानं म्हटलंय की तिनं याला तेव्हढं महत्त्व रहात नाही.
व्हेरिएशन म्हणून "सैल नसावी मिठी जराही" असंही छान वाटेल.
Sandy
In reply to चांगली आहे.. by चांदणे संदीप
सैल नसावी मिठी जराही
वळून दुज्या कुशीवर जाया
आसुसल्या अधीर अधरांचे
न जावे अमृतचुंबन वाया
In reply to . by चांदणे संदीप
सुरेख!
In reply to . by चांदणे संदीप
किंवा
सैल नसावी मिठी जराही
दुज्या कुशीवर वळून जाया
आसुसलेल्या अधीर-धरांचे
अमृतकुंभ न जावे वाया
In reply to चांगली आहे.. by चांदणे संदीप
अनुमोदन!
सैल असावा बेल्ट जरासा,
सोसे ना ताण, तुटे बघाया,
चरबीच्या तव, उदर अवनीचे,
हर्क्युलिसासम खांदी कसे पेलावे..
कवटाळे तो थुलथुलीत ढेरी
प्यांटच्या पुंगळ्या पायांवरती
मऊ मुलायम आखीव रेखीव,
महाकुंभा त्या व्यर्थ लपवती...
दे जरा विसावू गजकटीवर,
तुंदीलतनुते श्वास गुदमरावें,
अधीर कोडे मेदगोळ्याचे,
वजनकाट्यावर उमजुनी यावे..
पहाटे थोडी लगबग करता,
धाप लागते पाच मीटरवर,
मनाविरुद्ध त्याच्या ताणता त्याला,
इलॅस्टिकपेक्षा त्याचे नशीब बत्तर....
( प्रेरणा ॠ. दि. कडून घेतली आहे..)
--बेजारबुवा
In reply to सैल असावा बेल्ट जरासा, by पगला गजोधर
बेजारबुवा :) :) :)
रच्याकने हा/ ह्या / ही / हे ॠ. दि कोण?
पैजारबुवा,
In reply to इडंबन भारी... by ज्ञानोबाचे पैजार
ऋजुता दिवेकर
In reply to सैल असावा बेल्ट जरासा, by पगला गजोधर
;););)
अतिशय सुरेख कविता! अभिनंदन!
वाह! बेजारबुवांची कविताही आवडली.
खरे सांगायचे तर पहिल्या चार ओळीतच इतका गुरफटुन गेलो की पुढे वाचायचे भानच राहिले नाही.
अतिशय सुरेख
पैजारबुवा,
कोणाला lgbt आठवले नाही याबद्दल देवाला नारळ ठेव.
आणि नादमधुर
नितवाचक नाखु
अतिशय सुंदर कविता. सुरेश भटांच्या गझलांची आठवण झाली. 'मालवून टाक दिप' सारखी यालाही चाल लावता येईल का?
प.ग. चे विंडबनही आवडले. तुफान हसलो. ;-))))
अर्थात मला हि समस्या नाही.
एखादं शिल्प किती सुंदर आहे याचं वर्णन काय करणार? तद्वत, हि कविता किती छान आहे हे कसं सांगणार? कविताच परत एकदा वाचून ती किती छान आहे याची अनुभूती घ्यावी! व्वा!
अवांतरः आत्ताच्या पिढीला बरंच काही मिळतंय. पण उघड्या-नागड्या - शाब्दिक आणि दृय्ष्य - वासनेच्या आजच्या या बाजारात त्याना दुर्दैवाने बरंच काही गमावायलाही लागतंय. या अशा कवितेतला नर्म शृंगार, गर्भित अनुरंग, त्यातली धुंदी अनुभवणं दूरकी बात रही, त्याचा रसास्वाद तरी घेता येत असेल का? आणि खेदाची गोष्ट म्हणजे काय हातून निसटलंय हेही त्याना माहिती नाहीये बहुदा. असो. सौंदर्यस्थळं बदलतायत तशी सौंदर्यदृष्टीही बदलत असणार. आपल्याला मिळालेल्या सौंदर्यदृष्टिने वेगळ्या काळातल्या सौंदर्यस्थळांकडे पाहाणं टाळावं म्हणजे झालं! मी आपला परत एकदा कविता वाचतो, ते उत्तम :-)
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
In reply to अहाहा - काय सुरेख कविता आहे ही! by मिसळपाव
धन्यवाद आणि पटलं तुमचं म्हणणं.
सर्वांनी कविता वाचली मुद्दाम वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मुळेच लिहायला हुरूप येतो.__/\__
वाह, क्या बात !!
छान, सुंदर ....... !
अतिशय सुंदर कविता, विडंबनही झकास !!!
सुंदर मनोगती कविता !
बेजारबुवांनीही (हसूनहसून) बेजार केले ! :)
__/\__
भारी आहे !!!!
In reply to भारी आहे !!!! by जव्हेरगंज
ब-याच दिवसांत तुम्ही काही लिहिलं नाहीत?
खुप सुंदर लिहीलय
बेजारबुवांचे विडंबनही मस्त
अत्यन्त सुंदर कविता. खुप आवडली.
बेजारबुवांची रचना पण मस्तच :)
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italianoफार सुंदर कविता. आवडली .असेच लिहित जा ! शुभेच्छा
सुंदर! नेहमीप्रमाणेच!! :-)
वाह !! अतिशय सुंदर कविता.
हे आमचं बरंका!
बैल असावी कुडी जराशी
न वळूनी मला बघाया
अर्ध्या मिटल्या देहनयनांचे
अवघे रक्त चुसून घ्याया
रेशीम काळे केस उडोनी,
कुरळ्या लाटा बाहुंवरती,
मऊ मुलायम निद्रसनी त्या,
छिद्रशय्येस व्यर्थ लपवती...
जरा विसावून सिंहकटीवर,
मधूर मादक घाम फुलावे,
अधीर कोडे या नि:श्वासे,
गहिऱ्या स्तरी उफलून यावे..
बुंगाटवारा लगबग करतो,
भले होईल थोडी पुर्पुर,
शोषण करिते स्वर्णिम शुंडा,
तलम तृप्तीचे शिंपून अत्तर..
-गा.पै.
In reply to रुधिरप्रेमी विडंबन by गामा पैलवान
:):)
सुंदर कविता.