श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.
In reply to यनावाला, क्षमा असावी पण माझे स्पष्ट मत लिहितो. by अरविंद कोल्हटकर
In reply to यनावाला, क्षमा असावी पण माझे स्पष्ट मत लिहितो. by अरविंद कोल्हटकर
In reply to सोप उत्तर आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to यनावाला, क्षमा असावी पण माझे स्पष्ट मत लिहितो. by अरविंद कोल्हटकर
In reply to श्री. अरविंद कोल्हटकर यांचे by यनावाला
तुमचे लेखन वाचून मला अनेकदा असे वाटत आले आहे की आपल्या लेखाला सामुग्री मिळावी म्हणून तुम्ही (वेड घेऊन पेडगावला गेल्यासारखे करून) कुशंकांची भुते उभी करता आणि नंतर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा बहाणा बनवता जिथे खड्डयाची मुळातच गरज नव्हती तेथे एक खड्डा खणून नंतर तो बुजवायला तुम्ही बाहेर पडता. हे थोडेसे tilting at the windmills सारखे वाटते.
याबाबत तुमचे अमुल्य मत काय आहे ? मलाही तुमचे मत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. :)
In reply to श्रद्धा आणि चिकित्सा by गामा पैलवान
In reply to श्रद्धा आणि चिकित्सा by गामा पैलवान
In reply to श्रद्धा by राही
श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र...तांत्रिक दृष्ट्या विश्वास आणि श्रद्धा यात अंशतः फरक आहे, सहसा विश्वास ही श्रद्धेची पहिली पायरी असावी, एखाद्या गोष्टीवर / व्यक्तीवर मी विश्वास ठेवतो म्हणजे श्रद्धे पर्यंत पोहोचलो आहे असे निश्चित सांगता येत नाही. श्रद्धेच्या पायरीला पोहोचलो नसेन तर परिस्थितीनुरुप विश्वास बदलू शकतात, श्रद्धा परिस्थितीनुरूप बदलणे अशक्य नाही पण अवघड असते. विश्वास शब्दाचे श्रद्धेत परिवर्तन होणासाठी निष्ष्ठा, कर्तव्य , भक्तीभाव या तीन पैकी एखादा तरी अॅट्रीब्यूट कमी अधीक प्रमाणात जरूर असावी. कर्तव्य भाव निष्ठा अथवा श्रद्धा न बदलताही बदलता येऊ शकत असावा. पण मला वाटते निष्ठा सुद्धा परिस्थिती आणि स्वभावानुरुप बदलू शकतात, पण निष्ठा बदलल्या शिवाय श्रद्धा बदलणे कठीण असावे त्यामुळे प्रबोधनकारंनी श्रद्धे विरुद्ध जोर लावण्यावर लक्ष केंद्रीत करण्या पेक्षा बदललेल्या परिस्थितीनुरुप विश्वास आणि कर्तव्य बदलांवर लक्ष केंद्रीत केल्यास त्यांच्या शक्ती आणि वेळेचा अपव्यय कमी व्हावा असे वाटते. असो.
In reply to अनुषंगिक by माहितगार
In reply to अनुषंगिक by माहितगार
In reply to विश्वास आणि कर्तव्यबदल by राही
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते.इथे मुलतः म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणावयाचे आहे का ? धागा लेखक म्हणतात तसे बाय डिफॉल्ट माणूस तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) असता तर आता पर्यंत मनुष्य प्राणी कुठल्या कुठे पोहोचला असता नाही का ? तर्कसुसंगत असतातच असे नव्हे, पण तरीही श्रद्धावंतही तर्कशास्त्राचा पुरेपूर वापर करताना दिसतात
श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते.श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही.मला वाटते श्रद्धावंतांकडे यासाठी माझ्यापेक्षा चांगली उत्तरे असावित ती त्यांनीच द्यावीत , इथे मी फक्त निर्देश करत आहे.
जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात, "एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे."आपला तर्क स्विकारला जात नाही म्हणून एखाद्या व्यक्तीस अथवा समुहास आजारी ठरवणे, हा समुहलक्ष्य तर्कदोष आहे ? आस्तिकही नास्तिकांना आजारी ठरवू शकतात ? किंबहूना त्यांना सैतानग्रस्त ठरवले जातेच, आस्तिकांना त्यांच्याच अर्ग्यूमेंटने हरवण्याचा प्रयत्न , अर्ग्यूमेंट जिंकत नाही केवळ परस्पर न संपणारा संघर्ष चालू ठेवतो
...त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे.श्रद्धा आणि परंपरांच्या जे चांगल्या बाजू पहातात त्यांना त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित दिसत असेल तर आश्चर्य नाही ना ?
In reply to ५ by माहितगार
In reply to श्रद्धा=अंधश्रद्धा फरक फक्त by प्रकाश घाटपांडे
In reply to हे यनावालांनी एका लेखात by प्रकाश घाटपांडे
श्रद्धा=अंधश्रद्धा फरक फक्त एकच पहिला दोन अक्शरी आहे व दुसरा चार अक्षरी आहेहेच लॉजिक यनावाला आणि अंधयनावाला या दोन शब्दांना लागू पडतं का? का?
In reply to श्रद्धा=अंधश्रद्धा फरक फक्त by प्रकाश घाटपांडे
....धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते. सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. ....जसे श्रद्धेच्या काही सकारात्मक बाजू आहेत, तसे काही मर्यादा असू शकतात . शंकेचे चिमूटभर मीठ आरोग्यकारक असते . आपापल्या श्रद्धा वेळोवेळी तपासून पाहण्यात आणि अयोग्य भाग दूर ठेवण्यात साशंकता आणि सतर्कता साहाय्यक ठरतात . अयोग्य भाग दूर केल्याने श्रद्धेस बळकटी प्राप्त होण्यास मदत होते म्हणून नास्तिकांना दंडित करण्या पेक्षा ते माझ्या शेजारी असतात ते बरे वाटते म्हणून मी तरी इतर विविध विचारांप्रमाणे यनावालां आणि यनावाला भक्तांचे विचार हि वाचत असतो.
In reply to "श्रीभगवानुवाच " हेतुतः by यनावाला
गीतेत "श्रीकृष्ण उवाच " असे न लिहिता "श्रीभगवानुवाच " असे हेतुत: लिहिले आहे. " हे शब्द प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेत. अत एव ते सत्यच आहेत. चिकित्सेची आवश्यकताच नाही." बाकी श्रध्दाळु भाविकानी भगवद्गीता स्वतः पहावी , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य ही पहावे. बरेचसे साहित्य अॅनड्रॉईड अॅप्प्स वर उपलब्ध्द आहे ! स्वःहुन अभ्यास केल्यास कोणाचाही लक्शात येईल की खुद्द अर्जुनानेच कित्येक वेळा चिकित्सा करणारे प्रश्न विचारले आहेत गीतेत. आचार्यांनी , लोकमान्यांनी चिकित्सा केलेली आहे , किंबहुना दोघेही जवळपास विरिध अर्थी निष्कर्शांप्रत पोहचले आहेत ! आचार्यांनंतरच्या इतर चार प्रमुख आचार्यांनी गीतेवर अन्वयार्थ करणारी भाष्ये लिहिली आहेत ! चिकित्सा हवीच ! मग कोणतेही क्शेत्र असो ! जशी विज्ञानात चिकित्सा अहे तशीच अध्यात्मातही आहे ! दासबोधातही कैकवेळा कल्याणास्वामींनी चिकित्सा करणारे प्रश्न विचारले आहेत ! अध्यात्मात तीन प्रकारच्या प्रचीते सांगितल्या अहेत : ग्रंथ प्रचिती , गुरु प्रचीती आणि आत्मप्रचीती ! जे ग्रंथात सांगितले आहे तेच गुरु सांगत आहेत का , आणि तेच स्वतःला नुभवता येत आहे का ही चिकित्सा केलेच पाहिजे ! त्रिविधा प्रचीतीने झालेले ज्ञानच खर्या अर्थाने झाले असे म्हणता येईल ! यनावालाचे धागे वंध्यामत्सरासारखे आहेत ! स्वतःला समजत नाही म्हणुन इतरांनाही समजले नाही असा खोलवर गाढ समज घेवुन ते जगत आहेत, त्यांनी स्वतः संपुरण गीता वाचली आहे का नाही ह्या विशयीच शंका अहे ! ज्या प्रमाणे वंध्या स्त्री पुत्रवती स्त्रीचा मत्सर करते तसेच काहीसे ! असो. केवळ एकांगी टिप्पण्णी करणारे , तेही अर्धवट वाचनातुन आलेले लेखन , तेही एका विशिष्ठ समुहाला बावळट ठरवणारे, संपादित होत नाही हे पाहुन हा सारा काही तरी अजेंड्याच्या भाग वाटतो .... म्हणुन इकडे न फिरकलेलेच बरे !! भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥ भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥ होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥ तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥ || पांडुरंग | पांडुरंग ||
In reply to अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजस by प्रसाद गोडबोले
भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥ भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥ होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥ तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥यनावालांच्या मांडणी पद्धतीत उणीवा असतील -त्या जरूर निर्दर्शनास आणाव्यात- , पण मूळ उद्देश चांगला आहे त्यामुळे खलत्वाची बाधा असल्याचा आक्षेप अवाजवी वाटतो आणि म्हणून त्यांना अगदीच दुर्जनांच्या पंगतीत बसवणे श्रेयस्कर वाटत नाही.
केवळ एकांगी टिप्पण्णी करणारे , तेही अर्धवट वाचनातुन आलेले लेखन , तेही एका विशिष्ठ समुहाला बावळट ठरवणारे, संपादित होत नाही हे पाहुन हा सारा काही तरी अजेंड्याच्या भाग वाटतो .... म्हणुन इकडे न फिरकलेलेच बरे !!अजेंडा असेल अथवा नसेल , त्यांच्या लेखनात उणीवा असतात पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि मिपा धोरणांच्या कक्षे बाहेर जात नाहीत तो पर्यंत त्यांचे लेखन संपादीत करण्याची अपेक्षा रास्त नसावी. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा सभ्यता बाळगून कठोर टिका करण्याचे स्वातंत्र्य आणि प्रतिवाद इतर अनेक जण करतच आहेत . आपल्या उपरोक्त विचारातून केवळ यनावालांच्या लेखना बद्दल साशंकता व्यक्त होत नाही , इतर सश्रद्ध जे त्यांचा मुद्देसूद प्रतिवाद करताहेत तो यशस्वी होत असल्या बद्दल आपण अविश्वास दाखवल्या सारखे होते किंवा कसे.
तुच आहेस रे ...! तु .... तसं बोललस .....तुलाआपली अध्यात्मावर श्रद्धा असेल आणि आपल्या मनाचा समतोल बिघडत असेल तर त्याने आपण प्राप्त अध्यात्म शिक्षणास अपुरे पणा येतो आणि अध्यात्मा चे अप्रत्यक्ष अपयश सिद्ध होते. त्यामुळे आदरार्थी बहुवचनांचा वापर टाळून एकेरीवर येणे आणि पुढे प्रतिसाद संपादित होतो का पाहू म्हणणे हे अहंकारा कडे नेणारे नाही ना ?
In reply to भुंकती ती द्यावी भुंको । आपण by माहितगार
पण मूळ उद्देश चांगला आहेदुसरे महायुद्ध करण्यात, ज्यू मारण्यात हिटलरचा मूळ उद्देश चांगलाच होता. बिचार्याने पलंगावर लोळत, जनानखाने भरत, चेस खेळत अवधच्या नवाबांसारखे जीवन कुठे जगला? ---------------- मूर्ख लोकांना आपले उद्देश चांगलेच वाटतात. असे असले तरी त्यांना जगाच्या भाषेत त्यांची लायकी सांगणे आवश्यक असते. -------------- मागच्या ३-४ धाग्यांवर या माणसाला मी अतिशय प्रेमळ* शब्दांत साधे प्रश्न विचारलेले. याला साधी द्रखल घ्यावीशी वाटली नाही. -------------------- मी स्वतः श्रद्धावान आहे, माझी बायको आहे, आई वडील आहेत, अनेक मित्र नि स्नेही आहेत. या माणसाने कोणताही अपवाद न ठेवता सरसकट सर्व श्रद्धावान निर्बुद्ध, डोके नसले, डोके सडलेले, नॉन्सेन्स, इ इ असतात असे म्हटले. --------------------------- आत्ता इथे जे संवादाची मर्यादा लोकांना शिकवत आहेत, त्यांनी तिथे अगोदर त्या विशेषणांवर आपत्ती घ्यायला पाहिजे होती. असा अचानक एका बाजूचा पुळका टिपिकल पुरोगामी दांभिकता आहे. -------------------------------- एकेरी बोलणं हे "तुझा मेंदू निष्क्रिय आहे" यापेक्षा फार सन्मान्य आहे. यनावाला अर्धेरी वा पावेरी बोलायच्या पात्रतेचे आहेत का प्रश्न आहे. ----------------- मी सध्याला सर्वसाधारणपणे उजव्या बाजूचा विचार करतो. इथे अनेक लोक कडवट डावे आहेत. पण शेवटी ते संवाद करतात. बाजू मांडतात. दखल घेतात. यनावाला हा एकमेव आयडि अत्यंत विक्षिप्त वागतो. अर्थात तो हे सगळं संस्थळाच्या मर्यादांतच करतो, पण संस्थळाच्या मर्यादा हेच सगळं का? स्वतःच्याही काही मर्यादा हव्यात ना?आणि कोल्हटकर बोलले मंजे मला आलेली चीड एवढी अस्थानी नाही. आमच्या जालीय लहानपणापासूनचा अनुभव आहे कि ते विपरित भूमिका आरामात ऐकून घेतात. इथे त्यांनी हेत्वारोप केला आहे हे लक्षणीय आहे. ----------- आणि हाईट मंजे यनावालांनी त्यांना पण मुद्द्याचं काही उत्तर दिलेलं नाही. =================== * पहिल्या २-३ मधे तरी
In reply to पण मूळ उद्देश चांगला आहे by arunjoshi123
.....असा अचानक एका बाजूचा पुळका .... ????आपण माझे सगळे प्रतिसाद नक्की वाचले आहेत का ? मी तर माझी सुरवात यनावालांच्या मांडणीच्या मर्यादा दाखवतच केली आहे आणि त्यांच्या विशेषण वापरावर आधी त्यांचे लक्ष वेधले आहे. आणि नंतर सश्रद्धांना त्यांच्या अध्यात्माची आठवण दिली आहे. त्यामुळे माझ्या लेखनात एकाच बाजूचा पुळका असल्या बद्दल आपल्या साशंकते बाबत आश्चर्य वाटते. एवढेच नाही माझे काही धागे श्रद्धावंतांच्या बाजूने काही पुरोगाम्यांची बाजू समजून घेणारे असतात. त्यामुळे कोणत्याही एका बाजूने एका बाजूचा पुळका असा आक्षेप विस्मयाचा वाटतो !
In reply to ???? विस्मयचकीत ! by माहितगार
In reply to तुम्हाला उद्देशून नाहीत सर्व by arunjoshi123
In reply to पुळका लॉबी by राही
शिवाय इथे फारच थोडे जण त्यांच्या बाजूने लिहित असतात.मागच्या ३-४ धाग्यांवर एकदम विपरित अनुभव आहे. त्यांचं इतकं मोराल बुस्टिंग झालंय कि आता ते कितीही धागे पाडू शकतात. या धाग्यावर सीन पलटला आहे हे मान्य.
एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते. पण 'तुम्ही लिहीत राहा' असे मीच मागील एका लेखात लिहिले होते. तेव्हा रोख माझ्याकडे आहे असे रास्तरीत्या समजून प्रतिसाद दिला आहे.रोख तुमच्यावर तर आहेच पण मूलतः अनेक अन्य मान्यवर आहेत त्यांच्यावर जास्त आहे. लिहित रहा म्हणणं वेगळं, पण "यांना इग्नोरुन" आपला रथ दौडावत राहा असं सुस्पष्ट म्हणणारे माझं खरं लक्ष्य आहे. त्यात गोची अशी आहे कि उत्तरे द्याच असं मी म्हणू शकत नाही, मला उत्तरे द्याच असं म्हणू शकत नाही. त्यामुळे यनावाला फार शहाणे आणि आम्ही अदखलपात्र मूर्ख असा सीन झाला होता. म्हटलं आपण खरोखरच मूर्ख असू, वा आपले मुद्दे अस्थानी असतील, वा त्यांच्या क्षेत्रातले नसतील वा आपली भाषा फार उसकावणारी असेल, तेव्हा जे संयमित/ सयंत भाषेत प्रतिवाद इ करताहेत त्यांना लिहा म्हटलं, तर ते ही नाही. असं १-२ धाग्यावर झाल्यावर मला असं जाणवलं कि पुळका लॉबीचा समाचार घेणं आवश्यक आहे. =================== त्यांनी कितीही रॅडिकल विचार मांडावेत, कितिही टिका करावी. मात्र माझ्यासारख्या निष्पाप, निरागस, सच्च्या, इ इ "श्रद्धावंत लोकांचा" थेट अपमान करू नये. केला तर किमान आमची लायकी तीच कशी होती हे नीट समजावून सांगावे. बुद्धाप्रमाणे गप्प बसू नये.
एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते.तुमचं ओरियंटेशन काही का असेना, तुम्ही जब्बाबदार सदस्य म्हणून इच्छा नसताना देखील मला लिहिलंत. तेच यनावालांनी करावं.
In reply to राही, by arunjoshi123
In reply to भुंकती ती द्यावी भुंको । आपण by माहितगार
पण मूळ उद्देश चांगला आहेचांगला उद्देश ? आर यु किडिंग मी ? यनाच्या लेखांचा एकमेव उद्देश म्हणजे इतरंवर टीका करणे बस्स !! ते ही स्वतःच्या अर्धवट अभ्यासातुन आलेल्या अर्धवट समजाच्या आधारावर !! यना अभ्यासपुर्वक चिकित्सा करत असते तर भारीच वाटले असते ! पण मुळ उद्देशच इतरांवर टीका करणे हा असल्याने अभ्यास नसला तरी चालते , नुसत हेका पुरेसा असतो ! हे आधीही कैकवेळा लक्शात आल्याने त्यांच्या लेखनावर बोलणेच बंद केले आहे ! इथेहे बोलणार नव्हतो पण आधी संपादकांनी वैयक्तिक टीका म्हणुन माझे प्रतिसाद संपादित केले होते , आज खुद्द महामहीम यना च च इतरांना असंजस असमजुतदार अन काय काय अशी विशेशणे वापरत असल्याने प्रतिसाद द्याय्चहा मोह आवरला नाही ! यना ला म्हणावं उगाचच अर्धवट संदर्भ देण्या आधी गीता नीट वाचुन ये , तुझे मुद्दे नीट संदर्भासकट मांड , मग पुढे बोलु !
अभिव्यक्ती स्वातंत्र्यपरत तेच ते ! हा मुद्दा आधी कैकवेळा चर्चिला गेला अहे , यना ला कोणी सक्ती केली आहे का सश्रध्द होण्याची ? व्हायचे असल्यास हो , नसेल व्हायचे नको होवु ! आम्हाल काय फरक पडतो ! आता अम्ही कैकदा मंदिरात जातो तेव्हा आमचे नास्तिक मित्र बाहेर उभे नास्तिक, राहु दे बापडे , आम्ही त्यांना अग्रहाने ओढुन मंदिरात नेणार नाही , आणि मंदिरात जातो म्हणुन ते आम्हाल हिणवत नाहीत ! ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात ! उगाचच मंदिरात जातो म्हणुन ते हिणवायला लागले तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाहीत त्याल आतातायी पणा म्हणतात ! आम्ही मटणभाकरी फॅन आहोत , पण आम्चहे मित्र शुध्द शाकाहारी आहेत ! आम्ही त्यांना हिणवत नाही अन ते आम्हाल हिणव्त नाहीत ! ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात ! एकदा जोरदार वाद विवाद झाल्यावर ते शाकाहारी मित्र म्हणाले की असेलही शरीराला प्रोटीनची गरज पण मी नॉनव्हेज खाणार नाही म्हणजे नाहीच ! त्यानंतर त्यांना कोणी परत नॉनव्हेज चे महत्व पटवुन द्यायचा प्रयत्नही केलेला आठवत नाही. ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्रय म्हणतात !
आदरार्थी बहुवचनआदर नसेलच तर खोटा आदर का दाखवावा ?
पुढे प्रतिसाद संपादित होतो का पाहू म्हणणे हे अहंकारा कडे नेणारे नाही ना ?प्रतिसाद संपादित होत नाहीये हे पाहुन आश्चर्यच वाटले ! अजुनही वाटतच आहे ! मधे तर सगळा सावळा गोंधळच चालु होता , यना ने यावे टपली मारुन जावे असे चालले होते , अन यना ला टपली मारली की प्रतिसाद संपादित ! ह्या असल्या वन साईडेड गेम ला काय अर्थय ? ! मिपा पुर्वपदावर आले असेल तर परत अॅक्टीव्ह व्हायला हवे :) असो. सोडा ! यना वर वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही ! ह्या निमित्ताने आठवले काही अभंग टाईप करतो आणि ईथुन काढता पाय घेतो ! आपण आपला अभ्यास करु ! उध्दरेत आत्मना आत्मानम ! बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥ आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे | आपणासि डोळे दृष्टी नाही || रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न | तोंडासी कारण चवी नाही | तुका म्हणे शुध्द नाही जो आपण | तया त्रिभुवन अवघे खोटे || छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥ तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥
In reply to नमस्कार माहीतगार ! by प्रसाद गोडबोले
आदर नसेलच तर खोटा आदर का दाखवावा ?आपला हा दृष्टिकोन प्रथम दर्शनी पटतो. पण पब्लिक डिस्कोर्स मध्ये काही अडचणी येतात. पहिले व्यक्ती/ समूह आणि विचार किंवा वागणे या दोनची गल्लत होता राहाते . आदर व्यक्तीस दाखवायचा असतो विचार किंवा कृतीला नव्हे . युद्धात अर्जुन भीष्म किंवा द्रोणाचार्यास नमस्कार करतो नंतर युद्धही करतो . समोरच्या व्यक्तीनेही गल्लत केली असेल तर तसेच प्रत्युत्तर देण्याचा मोह होतो - इथे दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात समोरचा घसरला म्हणून आपणही घसरण्यात शहाणपण नसते (-हे सांगणे सोपे तेवढे मलाही वळणे अवघड हे मान्यच- पण मुख्य मुद्दा एकूण चर्चा रुळावरून घसरल्याने प्रतिपक्षाचा मूळ मुद्दा खोडण्याचे राहून जाते. ) उलटपक्षी आपण ना घसरता समोरचा घसरला हे दाखवून देण्याने पॉइंट अधिक व्यवस्थित स्कोअर होतो. दुसरे एकेरी उल्लेखाने आपल्याही नकळत एका पाठोपाठ अपशब्दांचा लांबण वाढण्याची शक्यता असते ती आदरार्थी बहुवचनाने टळते . प्रतिपक्षातील व्यक्तीत आपल्याला अद्याप माहीत नसलेले काही चांगले गूण असू शकतात असा विचार केला कि आदरार्थी बहू वचन वापरण्यात आपले मन अडथळा आणत नाही. ज्या गोष्टी पटल्या नाही त्यावर टीका करण्यास आपण मुक्त असतोच . यनांच्या सर्व चुका मान्य केल्या तरी त्यांना (दुर्जनतेची व्याख्या सब्जेक्टिव्ह आहे हे मान्य करूनही ) दुर्जनांच्या पंक्तीत कितपत बसवता येते या बद्दल साशंकता अद्यापही वाटते . मांडणी पद्धती आणि दुराग्रह वर आधीच्या धाग्यातील प्रतिसादातून मीही वेळोवेळी टीका केली आहेच नाही असे नाही . पण समाजातील अहितकारक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात प्रबोधन व्हावे या मूळ हेतुत काही गैर नाही . म्हणून मूळ उद्देश चांगला आहे असे म्हटले आहे. प्रतिपक्षां च्या स्ट्रेंथ आपण आपल्याकडे करून घेतल्या कि प्रति पक्षाचे एडव्हान्टेज कमी होते हे इथे लक्षात घ्यावे . यना ने यावे टपली मारुन जावे असे चालले होते असे काही होत नाही, त्यांच्या लेखनाने असुरक्षित वाटण्यासारखे काही नसावे . मिपावर आणि मिपा बाहेर बहुमत श्रद्धावंतांचे आहे. सोशल एडव्होकसी आणि सोशल मार्केटिंग मधला फरक मी या धागा चर्चेत इतरत्र दिला आहे . यना सोशल एडव्होकसी वाले आहेत, सोशल एडव्होकसीवाल्यांचा गाजावाजा असतो तेवढा प्रभाव पडत नसतो. यनांनी किती हातपाय मारले तरी आणि नजीकाच्य काळात काय मोठा फरक ते पाडू शकणार नाहीत श्रद्धासोबत माणसाच्या निष्ठा जोडलेल्या असतात आणि निष्ठा बदलून घेणे हातचा खेळ नसतो, सर्वसाधारणपणे निष्ठा बदलण्या पूर्वी लोक फार गोष्टी तपासतात त्यामुळेच यनांच्या लेखावर सगळे मिळून एवढा किस पाडतात. संत तुकारामांच्या बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे | आपणासि डोळे दृष्टी नाही || रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न | तोंडासी कारण चवी नाही | तुका म्हणे शुध्द नाही जो आपण | तया त्रिभुवन अवघे खोटे || या ओळी आवडल्या अर्थात नेमके काय लटिकें आहे हा केस टू केस अभ्यासाचा विषय आहे. छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ हे ठीक आहे -पण छळ असेल तरच सर्वच टीका छळ असतात असेही म्हणता येत नाही. कुणाच्या मतीला भ्रष्ट म्हणण्यासही अभ्यासूनी तेवढी हरकत नसावी . संत महोदयाबद्दल आदर करूनही “नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥” हे मात्र पटले नाही. एखाद्या वक्तीस हरिकथा न आवडण्याचे खापर त्याच्या मातेच्या सेक्स्च्युअल चॉईस वर का फोडावे ? स्त्री पुरुषांच्या सेक्स्च्युअल चॉईस वरुन तसेही का हिणवावे ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयक आपल्या मतां बद्दल अगदीच छिद्रान्वेषण केल्यास अंशतः: काही वेगळे मत देता येऊ शकेल पण हा धागा मुळात त्या बद्दल नाही, तरीही छिद्रान्वेषण सोडल्यास बहुतांशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दलच्या आपल्या मताचा आदर वाटला. मनमोकळ्या चर्चेसाठी आभार
In reply to अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजस by प्रसाद गोडबोले
In reply to आवडला नाही. by राही
In reply to अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजस by प्रसाद गोडबोले
तु इतरंना तसं बोललस कि चालत पण इतरंनी तुला तसं म्हणलं की व्यक्तिगत टीका म्हणुन त्याचे प्रतिसाद संपादित केले जातात !!एकतर सर्वच एकेरी संबोधने असावीत वा सर्वच सन्मानजनक असावीत. फक्त काही सदस्यांना एकेरी संबोधू नये असं का? निर्बुद्धपणे पुरोगामी भूमिका मांडली तर माणूस सन्मान्य थोडाच होतो? ======================= लक्षात घ्या, कि अनुभवाने मी या धाग्यावर विषयावर काही बोलतच नाहीये. कारण त्याचा काही फायदाच नाही. कोल्हटकरांनी विषयाला धरून प्रश्न केलेले आहेत, अर्थ काढलेत, प्रतिसाद दिला, मुद्दे काढले. उत्तर काय - मी म्हणतो ते बरोबर आहे. अरे, याला काही अर्थ? ============================ पुरोगामी लोकांना बुद्धिमंत मानायची प्रथा असली तरी ते बर्यापैकी बिनडोक असतात असा माझा अनुभव आहे. अर्थातच हा बिनडोकपणा ९९% वेळेस हार्मलेस असतो, शुद्ध भावनेने असतो आणि काही काही लोकांना तो क्यूटपणे* शोभतो. पण यांच्या केसमधे हार्मलेस शब्द लागू नाही कारण हे श्रद्धावान लोकांचा अपमान करत असतात. वास्तविक यांनी प्रबोधन करून आम्हाला अश्रद्ध बनवले तर हरकत नाही. पण आज आम्ही ज्या प्रकारचे लोक त्यांचा आज अपमान करणे मंजे आमचाच अपमान आहे. ------------------------- * काही व्यक्ति रागावल्यावर अधिक चांगल्या दिसतात, इ तसे.
In reply to "श्रीभगवानुवाच " हेतुतः by यनावाला
चिकित्सेची आवश्यकताच नाही." असे भाविकांच्या मनावर बिंबविणे हा हेतू आहे.हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही त्या लेखकाच्या मनात काय होतं हे इतकं खात्रीपूर्वक कसं सांगू शकता? ======================== आता आम्ही जेव्हा फेसबूक, व्हॉट्सअॅप, पुस्तके, पेपर, इंटरनेट, इ इ वाचतो तेव्हा अनेक ठिकाणी आम्हाला असे आईन्स्टाईनने सांगीतले आहे म्हणून काही भंकस आणि भिकार वाक्ये सांगीतली जातात. https://www.brainyquote.com/authors/albert_einstein यातली अनेक अत्यंत मेडिऑकर आणि भिकारचोट आहेतच, पण सांगणारास आईंस्टाननं सांगीतलंय, चिकित्सा करू नका असं अभिप्रेत होतं हे मला तुमच्यासारख्या खात्रीनं म्हणता येणार नाही. ========================= तुमच्या वाक्यांची आम्ही इतकी चिकित्सा करतो तेव्हा तुम्ही आमची चिकित्सा हेतुपुरस्सर आहे इ इ मानता. अर्थात यानं तुमचा चष्मा (शब्दसौजन्य - अंतरा आनंद) कसला आहे हे स्पष्ट कळतं. ============================= आपण स्वतः चिकित्सेच्या पलिकडचे आहात असा अनुभव आहे. पण आपल्यासारखे विचार "थेट" कोणी आपणावू नयेत म्हणून हा विरोधाचा शब्दप्रपंच.
In reply to "श्रीभगवानुवाच " हेतुतः by यनावाला
( इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .)कुणालाही अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे ठरवण्याची घाई का असावी ( तसे गा. पै . नी नुसता प्रश्न केला नाही त्यांना पटणारा तर्क त्यांनी दिला आहे त्याचे खंडन करण्याची जबाबदारी यनावालाजी आपली बनते.) त्या एवजी आपण अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे या शेलक्या विशेषणांचा आधार घेऊन आपण व्यक्तीलक्ष्य तर्कदोषाचा आधार घेत आहात. याच तर्क दोषांचा आधार घेऊन सश्रद्ध नास्तिकांना अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे अशीच शेलकी विशेषणे वापरत असतातच . त्यांच्यात आणि तुमच्यात मग फरक तो काय राहीला ?
In reply to आस्तीक - नास्तिक सारखीच विशेषणे by माहितगार
इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .छे छे! हा प्रश्न मी विचारला तो भगवान या शब्दाची चिकित्सा तुम्ही केलीये का हे विचारण्याच्या हेतूने. तुम्ही ती केलेली दिसंत नाही. पण काही हरकत नाही. पूर्वी काही जणांनी केलीये. विष्णुपुराणानुमते भगवान म्हणजे यश + श्री + ऐश्वर्य + वीर्य +ज्ञान + वैराग्य या सहांचा संगम. आ.न., -गा.पै.
In reply to यनावालांचा मार्ग शाम मानव by प्रचेतस
"श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र दिलेला दिसला."नेहमीच्या बोलण्यात आपण विश्वास-श्रद्धा-निष्ठा हे तीन शब्द सर्वसाधारणपणे समानार्थी वापरतो. पण या तीन शब्दांचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. एखाद्या विषयावर चर्चा करताना प्रत्येक शब्द त्याच्या विशिष्ट् अर्थाने वापरणे आवश्यक असते. जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे, हे बुद्धीला कळते पण भावनेला ती सोडवत नाही. अशी गोष्ट भावनेच्या प्रभावामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही ती गोष्ट पूर्वग्रहांमुळे,शब्दप्रामाण्यामुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय. "देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. विश्वासाचा संबंध बुद्धीशी आहे. तर श्रद्धेचा संबंध मनोभावनेशी आहे.
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे.त्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी जे बिंदू, रेषा नि प्रतले वापरली जातात ती असत्य, श्रद्धेच्या क्षेत्रातली, वास्तवात नसलेली, खोटारडी, केवळ संकल्पनात्मक, निसर्गात नसलेली, इ इ आहेत. असे असतानाही तुम्हाला का बरे हा प्रमेय बुद्धिगम्य वाटतो?
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
..."देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ?बेसिकली श्रद्धेच्या काही अयोग्य प्रयोजनांमुळे यनावाला श्रद्धेच्य प्रयोजनाबद्दल साशंक झाले आहेत. श्रद्धेची काही प्रयोजने अयोग्य ठरणे म्हणजे सर्व प्रयोजने अयोग्य असा सरसकट निर्ण यास येताना यनावाला दिसतात आणि इतरांनीही आपल्या सरसकट करणात सहभागी व्हावे असा त्यांचा अत्याग्रह स्पष्ट होत राहातो. देवावरच्या श्रद्धेचे प्रयोजना बद्दल इतर सश्रद्ध लोक उत्तरे देतील . मी माझे लक्ष श्रद्धेच्य इतर प्रयोजनां बद्दल अधिक अभ्यास करून लिहिण्याची आवश्यकता असावी पण तरीही मी तिकडे लक्ष केंद्रित करतो. केवळ भक्ती हा श्रद्धेचा एकमेव कॉम्पोनंट नाही निष्ठा आणि कर्तव्य हि दोन कॉम्पोनंट सोबतीस असतात आणि त्यांना आपले स्वतंत्र प्रयोजन असते जे श्रद्धावंत अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना दिसतात म्हणून श्रद्धेस वेगळे प्रयोजन प्राप्त होते. राजस्थानातील काळवीट एका समूहांच्य श्रद्धेचा म्हणून निष्ठेचा म्हणून त्याची हत्या करू नये हे एक कर्तव्य झाले . समजा हि श्रद्धा नसलेले चार सिने कलाकार विशिष्ट काळवीट प्राणी दुर्मिळतेमुळे संरक्षित आहे संरक्षित प्राण्यांची हत्या करू नये कायदा मोडू नये या वर विश्वास आहे तरीही संवेदना हरवलेल्या मौजेच्य क्षणी काळवीट मारतात तेच श्रद्धा असलेले लोक काळवीट मारणे टाळतात एवढेच नाही श्रद्धा नसलेले लोक पैसे घेऊन कोर्टात खोटी साक्ष देण्याची शक्यता अधिक असू शकेल पण श्रद्धा असलेले पैसे घेऊन कोर्टात खोटी साक्ष देण्याची शक्यता नसेलच असे नाही पण अशी शक्यता कमी असेल असे मानण्यास जागा उरते . आणि म्हणून श्राद्धेच्य प्रयोजनाचे हे एक उदाहरण झाले. भारतात काही वनांचे संरक्षण देवराईच्य स्वरूपात आपसूकच झालेले दिसते ते केवळ स्थानिकांचा श्रद्धा मुळे . श्रद्धांची विविध प्रयोजनांबद्दल अधिक अभ्यास करून लिहिणे रोचक ठरू शकेल असे वाटते.
In reply to श्रद्धांची विविध प्रयोजने by माहितगार
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
In reply to असो by माहितगार
In reply to निष्ठा by राही
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे,का? सत्यतेचा नि त्याज्यतेचा संबंध काय? ब्रह्मांडात जे जे काय असत्य आहे ते ते सर्व केवळ सजीवांच्या चेतासंस्थेत आहे. सजीवांच्या चेतासंस्था वगळून विश्वाची कल्पना केली तर त्यात सर्व काही विशुद्ध सत्य आहे. मग म्हणून काय सर्व सजीवांनी आपली डोकी त्यागली पाहिजेत का? --------------------- अर्थव्यवस्थेत एखाद्या गोष्टीला (उदा. एक किलो आंबे) मूल्य असते, ते मोजता येते, त्याला अंकांत मांडता येते, त्याची अन्य गोष्टीशी (उदा. पेरु) तुलना करता येते, हे नसलेले पण मानलेले मूल्य दुसर्या नसलेल्याही आणि न मानलेल्याही गोष्टीने (उदा. पैसे) हस्तांतरित करता येते, इ इ ही सगळी असत्ये नाहीत तर काय? यनावाला आंब्याच्या पोटात हात घालून त्याचे मूल्य वा किंमत आम्हाला दाखवू शकतात का? इतक्या सगळ्या प्रकारच्या खोटारडेपणांचे एकमेकांवर मुकुट असताना आपण अर्थव्यवस्था मानतो ना? यनावाला पगार घेतातच ना? ------------------------ यनावाला, मनुष्यांनी मानायच्या गोष्टी सोडून (उदा. माझं नाव अरुण आहे.) जगात एकही केवल सत्य सिद्ध झालेलं नाही. प्रत्यक्ष केवल सत्य असोच, जगात केवल सत्य सिद्ध करायची फ्रेमवर्क देखील अजून प्रस्थापित झालेलं नाही. ------------------- तुम्ही कोणतेही शब्द उचलता नि लोकांना मूर्ख मानायला चालू करता.
In reply to एक नम्र आवाहन by सर्वसाक्षी
In reply to एक नम्र आवाहन by सर्वसाक्षी
ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही.ग्रह सूर्याभोवती फिरतात ही एक श्रद्धाच आहे. काय कसे (वा कशाभोवती) फिरत आहे हे कळायला पाहणाराने ब्रह्मांडातल्या एका स्थिर जागी बसून फिरणार्या गोष्टींकडे पाहिले पाहिजे. अब्सॉल्यूट स्पेसमधल्या कोणत्याही एका बिंदूला पुन्हा कसं जायचं याचं गणित अजून सुटायचं आहे.
In reply to ग्रह सूर्याभोवती फिरतात हे by arunjoshi123
"इंग्लिशमध्ये फेथ, बिलीफ, ट्रस्ट असे भिन्न (अर्थ) छटा असणारे थोडेफार समानार्थी शब्द आहेत.हो. त्यांतील फेथ म्हणजे श्रद्धा तर बिलीफ म्हणजे विश्वास असे अर्थ ग्राह्य आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन निरीश्वरवादी सॅम हॅरीस लिखित : End of faith (एण्ड ऑफ् फेथ ) हे गाजलेले पुस्तक आहे. २/ तुम्ही दुसर्या एका प्रतिसादात निष्ठा शब्दाविषयी लिहिले आहे. श्रद्धेचा संबंध व्यक्तीच्या मनोभावनांशी आहे. विश्वास शब्दाचा बौद्धिक विचारांशी तर निष्ठेचा संबंथ आचरणाशी आहे. "अ" ची जर योगासनांवर निष्ठा असेल तर "अ" ने नियमितपणे योगासने केली पाहिजेत. "निष्ठा आचरणे कळे ।" असे म्हटले आहे.
In reply to फेथ=श्रद्धा, बिलीफ =विश्वास by यनावाला
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
In reply to मनोरंजक by पिगी
On a global scale, पुरोगामी लोकांच्या अशा फटकळ ॲटीट्यूडमुळेच extreme right विचारसरणी जोमात आहे.सहमत आहे. कथित पुरोगामी लोकांचा (extreme right सारखाच असलेला) एकांगी हेकेखोरपणाची जोड, ज्यांना बदलण्याची इच्छा आहे त्यांच्याशी संवाद नाकारणे, extreme right विचारसरणीस साहाय्यकारी होते.
In reply to मनोरंजक by पिगी
यनावालासाहेब यांचे लेख व जोशीसाहेब यांचे प्रतिसाद वाचनीय असतात. खरे सांगायचे तर मनोरंजक असतात.वास्तविक मिसळपाववर बरेच लेखक अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण, तार्किक, सयंत, शुद्ध भाषेतील, तसेच संतुलित इ इ लिहित असतात. यातलं एकही विशेषण मला लागू होत नाही. मी फक्त टाईमपास म्हणून लिहित असतो. जालावर लिहिताना तुम्ही कुठेही मधेच तुमचा प्रतिसाद खुपसू शकता हे अशा फोरमचं अडव्हांटेज आहे. हेच प्रत्यक्ष बोलणं चाललं असतं तर मी बावरून साईडला उभा राहिलो असतो. आपल्यासारख्या तटस्थाचं मनोरंजन व्हावं असाच उद्देश ठेवून मी लिहित असतो.
यनावाला, क्षमा असावी पण माझे स्पष्ट मत लिहितो.