लिव इन आणि समाजाची मानसिकता
In reply to तुमची मुलगी एखाद्या मुलाबरोबर by श्रीगुरुजी
In reply to तुमची मुलगी एखाद्या मुलाबरोबर by श्रीगुरुजी
ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर.यासाठी लिव्हिनाची गरज आहे का? रीतसर विवाह केलेले लोकंही आधीपासनं बरोबर रहात नाहीत. तरीपण लग्नं यशस्वी होतातच ना? तसंच आधीपासून एकत्र न राहणारे लोकंही एकमेकांना नापसंत करतात ना? मग आधीपासून एकत्र राहिल्याने असा काय फरक पडणार आहे? आ.न., -गा.पै.
In reply to श्रीगुरुजी, by ज्योति अळवणी
In reply to वैयक्तिक प्रश्नाला संयमित by एमी
In reply to श्रीगुरुजी, by ज्योति अळवणी
In reply to मुलाने मुलीला सोडणे यात पुरूष by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, by ज्योति अळवणी
हे लिव इन नातं इतक का बर अस्वीकारार्ह्य असावं अजूनही?भारतात व विषेशतः हिंदू समाजात असली थेरं सदासर्वदा अस्वीकारार्ह्य च राहणार आणि रहावीत एकत्र राहिले म्हणजे शरीरसम्बन्ध येणारच ... ते भारतीय नीतिशास्त्र व संस्कॄती याना कदापि मान्य होणार नाहीत असल्या उच्छॄन्खल प्रथाना उत्तेजन देणार्या प्रवॄत्तीन्चा जाहीर निषेध
In reply to हे लिव इन नातं इतक का बर by झपाटलेला फिलॉसॉफर
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to पिक्टोग्राफ ! =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे लिव इन नातं इतक का बर by झपाटलेला फिलॉसॉफर
In reply to हे अगदि खरय.. by शित्रेउमेश
In reply to वेल, जगाच्या गाड्याची गती by एस
ज्यांना लिव्ह इन मध्ये राहायचंय, ते राहतीलच.अतिशय सहमत. बदल हे होतच राहणार, अर्थात हे सगळे प्रयोग धाडसी आहेतच यात शंका नाही आणि ज्यांना हे धाडस करण्याची शक्ती आणि इच्छा आहे त्यांनी ते करावं त्याउलट ज्यांना ते झेपणार नाही त्यांनी वाट्यालाही जावू नये. तसं म्हंटलं तर कोणताही सामाजिक बदल धाडसीच असतो. अगदी स्त्री शिक्षण असो किंवा इतर काही. [इथे मी या दोन बदलांतील चांगले/वाईटपणाची तुलना करत नसून त्या बदलाला अवलंबण्यास लागणार्या धाडसाबद्दल बोलत आहे]. त्यामुळे प्रवाहाविरुद्ध जावून कोणतीही गोष्ट मला जमेल का / झेपेल का याचा विचार आधी केला पाहिजे. एखाद्या लिव इन मधील जोडप्याने आपण एकेमेकांस अनुरुप नाही असा विचार करत एकमेकांना सोडले तर दोघेही ते समजू शकतात. पण 'घरचे विरोध करत आहेत' म्हणून एकाने कच खाल्ली तर ते जास्त दुर्देवी ठरेल. सानिया या लेखिकेची एक कादंबरी आहे (शीर्षक बहूधा "वर्तुळ " आहे, आता आठवत नाही) त्यात लिव इनचा बराच वैचारिक उहापोह केला आहे.
मात्र एखादा मुलगा आणि मुलगी करियर करत असताना एकमेकांना समजून घ्यायला एकत्र राहिले तर त्यात चुकीचे आणि समाजविरोधी काही आहे असे मला वाटत नाहीसमाजासाठी आज घातक नाही. पण आजून २५ वर्षांनी दुष्परिणाम दिसू लागले की जागं व्हायची वेळ निघून गेली असेल. समजा लिव्हिनातनं अपत्य झालं म्हणजे? कोण घेणार त्याच्या पितृपदाची जबाबदारी? जोडीदार? नाही घेतली तर अपत्याचं संगोपन एकपालकी होणार. अशी मुलं गुन्हेगारीकडे वळायचा धोका असतो. पाश्चात्य देशांच्या अनुभवातनं भारतीयांनी शहाणं व्हायला हवं ना? लिव्हिन स्त्रीसाठी मात्र काल, आज आणि उद्या सरळसरळ घातक आहे. लग्न हे स्त्रीसाठी सुरक्षित कवच आहे. लग्न करायचं नसेल तर स्त्रीने एकटं राहायला शिकावं. पण लिव्हिन म्हणजे भलताच धोका पत्करणं आहे. आ.न., -गा.पै.
In reply to लिव्हिन आणि स्त्री by गामा पैलवान
In reply to गा. पै. जी, by ज्योति अळवणी
In reply to पुरुषानं हवं ते करावं का. by गामा पैलवान
In reply to लिव्हिन आणि स्त्री by गामा पैलवान
In reply to ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख करतो by सर टोबी
In reply to ज्योति अलवनि आणि ज्योती अळवणी by गामा पैलवान
In reply to नुसतेच लिव्ह-इन पेक्षा लव्ह-इन असेल तर बरे ! by चामुंडराय
अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसतेमला नाही वाटत विशेष अडचण येत असावी. घर भाड्याने देताना कुणी लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) मागत नाही अगदी पोलीस पडताळणीकरिताही ते मागितले जात नाही (म्हणजे नसावे, काही वर्षांपुर्वी मी माझा फ्लॅट भाड्याने देत होतो आणि पोलीस पडताळणीही करुन घ्यायचो पण पोलिसांनी भाडेकरुला कधी लग्नाचे प्रमाणपत्र मागितले नाही. ) याउलट समूहाने राहणार्या अविवाहित मुलांना वा मुलींना (बॅचलर्स) घर भाड्याने देण्यास सोसायटीचा विरोध असतो असे अनेकदा दिसते. पण या गोष्टीचीही कायदेशीर अर्हता तपासली पाहिजे. निवारा ही मानवाची मुलभूत गरज आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक स्थितीमुळे हा मुलभूत हक्क डावलणे (खासकरुन घरमालक तयार असताना सोसायटीने खोडा घालणे) कायदेशीर आहे का ?
आयुष्यातला (तसा असल्यास) पहिला प्रणय ज्या व्यक्तीची आपण चाचणी करत आहोत, किंवा ज्याला आपण काही कंपॅटिबिलीटीच्या कारणांनी सोडूनही देऊ शकतो अशा व्हक्तिशी करत आहोत अशा भावनेने करावा काय?अधिक सुलभ शब्दांत सांगायचं झालं तर, पहिला प्रणय जनावरासारखा करावा का? आ.न., -गा.पै.
In reply to पहिला प्रणय by गामा पैलवान
अधिक सुलभ शब्दांत सांगायचं झालं तर, पहिला प्रणय जनावरासारखा करावा का?काही वर्षापुर्वी पर्यंतच्या कौटुंबिक / सामाजिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास ज्यांचा ठरवून विवाह होई अशा अनेक सर्वसामान्य मुलामुलींना लग्न ठरल्यानंतरही भेटण्याची , बोलण्याची , सोबत फिरण्याची मुभा नसे. त्यामुळे लग्नापर्यंत एकमेकांना समजून घेणे तर दूरच पण एकमेकांचा नीटसा परिचयही झालेला नसे. पण लग्नानंतरचा पहिला प्रणय पहिल्या रात्रीच व्हावा अशी अपेक्षा असे . अर्था तो तसा (म्हणजे पहिल्या रात्री) नेहमीच होत असतो की नाही हा शोधाचा विषय होईल पण किमान ६०-७०% जोडप्यांत तरी तो तसाच होत असला असे मानले तरी अगदी अनोळखी अशा दोन व्यक्तीतला प्रणय म्हणता येईल. काही कुटूंबात सत्यनारायणापर्यंत वा कुलदैवताचे दर्शन घेईपर्यंत संबंध न करण्याचे बंधन असते त्यामु़ळे तिथे काही प्रमाणात हे टळत असेलही पण बहुतांशी जोडप्याकरिता तो अनोळखी व्यक्तीमंधला प्रणय असावा ...
In reply to !!! by मराठी कथालेखक
प्रणय जनावरासारखाअसा शब्द प्रयोग करणे कितपत योग्य आहे ? दोन प्रोढ व्यक्ती परस्पर सामंजस्याने आणि इतर कुणाला काही त्रास न देता एखादी गोष्ट करतात, ती सगळ्यांना पटेलच असे नाही. त्यातल्या त्रुटी दाखवण्याचा, आणि ती गोष्ट फार चुकीची आहे असे वाटल्यास नवीन पिढीने त्या मार्गाने जावू नये म्हणून कठोरपणे टीका करण्याचा तुमचा रास्त अधिकार आहेच. पण तो वापरताना त्या व्यक्तींची अप्रत्यक्षपणे जनावरांशी तुलना करावी का ?
In reply to जाता जाता by मराठी कथालेखक
In reply to !!! by मराठी कथालेखक
In reply to लिविन वाल्यांची ओळख by arunjoshi123
अर्थात त्यात हिशेब इतका जास्त असतो कि एखाद्या माणसाला त्या नात्यात इतका हिशेब करणे घाणेरडं वाटू शकतं.हे सरसकटीकरण आहे, शिवाय ते बर्यापैकी कल्पनेवर फक्त आधारलेले असू शकेल असेही मला वाटते. इथे असलेल्यांपैकी कुणाला लिव इनचा अनुभव आहे का ? वा लिव इनमधील कुणाशी थेट संपर्क / परिचय आहे का ? लिव इन मध्ये कमिटमेंट नसतेच , 'मी तुला कधीही सोडेन, वा तु मला कधीही सोडशील' अशीच भावना सतत असते का ?खूप हिशेब असतोय असं तुम्ही म्हणताय. पण ते ही खरं आहे का ? मी तर अनेकदा खास -जवळच्या मैत्रीत देखील हिशेब मांडला जात नाही असाच अनुभव घेतला आहे. मग लिव इन मध्ये असा हिशेब सतत असतो का ? माझी कुणाही लिव इन मध्ये राहणार्यांशी थेट ओळख नाही त्यामुळे मी याबद्दल अधिकाराने सांगू शकणार नाही. पण तरी दोन समंजस व्यक्ती निरतिशय प्रेम, विश्वास असल्याशिवाय लिव इनमध्ये राहणार नाहीत असे मला वाटते. लग्न काय किंवा लिव इन काय दोन्हीचा निर्णय समंजसपणे घेणेच योग्य नाहीतर आयुष्य भरकटू शकते. थेट ओळख कुणाशी नसल्याने लिव इन म्हंटल्यावर मला आशिकी-२ हा चित्रपट आठवतो. नायक नायिकेचे लिव॑ इन , त्यांच्यातले निरतिशय प्रेम, विश्वास, ओढ, एकमेकांचा आदर, त्यागाची भावना ..केवळ अप्रतिम
In reply to अर्थात त्यात हिशेब इतका जास्त by मराठी कथालेखक
पण तरी दोन समंजस व्यक्ती निरतिशय प्रेम, विश्वास असल्याशिवाय लिव इनमध्ये राहणार नाहीत असे मला वाटते.समंजसपणा, निरातिशय, प्रेम, विश्वास इ इ शब्द आले तर लगीन उरकून टाकायचं. दोघांत इतकं आहे म्हटल्यावर अजून चार प्रयोग करणं तद्दन मूर्खपणा आहे. ------------ लिविनमधे असलं काही नसतं. उलट तुटायची संभावना जास्त म्हणून लग्नाऐवजी हा पर्याय असतो. पोटेंशियली प्रेम होइल हि भावना असते पण बाकी सगळं शून्य.
In reply to पण तरी दोन समंजस व्यक्ती by arunjoshi123
अजून चार प्रयोग करणं तद्दन मूर्खपणा आहे.लग्न हा देखील कधीकाळी एक प्रयोगच असेल काय ? मुळात कुणालाही नवीन प्रयोग करायची गरज का वाटावी याचाही विचार व्हायला हवा.
In reply to अर्थात त्यात हिशेब इतका जास्त by मराठी कथालेखक
वा लिव इनमधील कुणाशी थेट संपर्क / परिचय आहे का ?लिविन वालं एक कपल हनिमूनला (वा फिरायला) उत्तराखंडमधे आलं होतं. आमच्या कपल टू कपल १-२ दिवस चिक्कार गप्पा झालेल्या. त्यांना माहित असलेले लिविनवाले तर चिकारच होते. कम्यूनिटी सारखा प्रकार वाटला. ---------- सगळ्यात माझ्यासारख्या प्रतिगाम्याला धक्का देणारी, दुखवणारी बाब म्हणजे - "लग्नाचा नि लिविनचा काय संबंध?" हे विचारा. आपण सगळे हे विवाहाच्या उद्देशानं इ इ बोलताय पण विवाहाचा विचारही करणारी मंडळी त्यांत अत्यल्प आहेत.
In reply to वा लिव इनमधील कुणाशी थेट by arunjoshi123
In reply to काय काय गप्पा झाल्यात हे थोडं by मराठी कथालेखक
लिव इन म्हणजे मुर्खपणा हा निष्कर्श काहीसा बाजूला ठेवूनमी असा निष्कर्ष काढलाय का? विसरलो.
In reply to लिव इन म्हणजे मुर्खपणा हा by arunjoshi123
दोघांत इतकं आहे म्हटल्यावर अजून चार प्रयोग करणं तद्दन मूर्खपणा आहे.या वाक्याचा अप्रत्यक्ष अर्थ तसा होतो. असो.. तुम्ही त्या कपलशी झालेल्या गप्पांबद्दल बोलत होतात :)
In reply to काय काय गप्पा झाल्यात हे थोडं by मराठी कथालेखक
In reply to त्यांनी सांगीतलेली माहीत by arunjoshi123
१. लिविन आणि लग्नाचा काही संबंध नाही. ते अल्टरनेटीव आहे, पायरी नाही. २. त्यात कमिटेड आणि अनकमिटेड असे प्रकार असतात. ५. काहींदा इतरत्र चाचपणे पार्टनरला मान्य असते. १२. जोडिदाराला बंधनं घालता येत नाहीत. १५. दारु, गांजा, पब, डीस्को, पार्ट्या, सिगारेट, सिनेमे, इ इ प्रकार खूप असतो. १९. बदली झाली, इ कि हॉटेल बदल्यासारखं "सगळं" बदलतात.हं.. हे सगळं 'ओपन रिलेशनशिप'च्या जवळ जाणारं किंवा ओपन रिलेशनशिपची पायरी असंही म्हणता येईल.
१७. यांची भांडणं प्रचंड होतात. रिलेशनशिप टेशन्स चिकार असतं.हे बहूधा कमिटेड वाल्यांचं .. म्हणजे लग्नाच्या जवळ असणार्यांच असावं
In reply to वा लिव इनमधील कुणाशी थेट by arunjoshi123
सगळ्यात माझ्यासारख्या प्रतिगाम्याला धक्का देणारी, दुखवणारी बाब म्हणजे - "लग्नाचा नि लिविनचा काय संबंध?" हे विचारा. आपण सगळे हे विवाहाच्या उद्देशानं इ इ बोलताय पण विवाहाचा विचारही करणारी मंडळी त्यांत अत्यल्प आहेत.तुमचं म्हणणं बरोबर आहे...बहुतेककरुन लिव इनची तुलना पारंपारिक / रुढ विवाहसंस्थेशी होणार नाही , पण ओपन रिलेशनशिप (मुक्त नातेसंबंध) असलेली जीवनपद्धती स्वीकारायची असल्यास /हवी असल्यास लिव इन हा लग्नापेक्षा अधिक चांगला पर्याय ठरेल. म्हणजे लग्न करुन ओपन रिलेशनशिप /मॅरेज जगणे खूप कठीण होईल त्यापेक्षा लिव इन मध्ये राहणार्यांना ओपन रिलेशनशिपमध्ये राहणे तुलनेने बरेच सोपे जाईल, याच अनुषंगाने ओपन रिलेशनशिपबद्दल पण चर्चा करता येईल.
In reply to लिव्हईन हा मूर्खपणा आहे by आदिजोशी
कारण ह्या स्टेजला येऊन फक्त बेडमधली कंपॅटिबिलिटी बघणंच शिल्लक राहतंयांच्याशी असहमत, बऱ्याचदा लोकांच्या सवयी समजायला वेळ जातो, लिव्ह-इनमुळे एकमेकांच्या सवयी कश्या आहेत आणि मुख्य म्हणजे तो किंवा ती एक माणुसम्हणून कशी आहे ते समजू शकते, काही झाले तरी एखादी व्यक्ती सदासर्वकाळ सद्गुणी असल्याचे नाटक नाही करू शकत बाकी फसवणूक लग्नानंतर होण्यापेक्षा हे बरे, आणि तसेही एखाद्या पर्यायाचा चांगला वापर करण्यापेक्षा त्यातून आपला फायदा कसा होईल अशीच मानसिकता असेल तर लग्न असो वा लिव्ह-इन, फरक नाही
गामाजींची वाक्यरचना दुर्दैवी आहे. लिविन वाल्यांचा प्रणय नक्कीच जनावर टाईपचा नसतो.नाही हो. जनावरं बलात्कार करीत नाहीत. त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार होतोय वगैरे तक्रारींना जनावरी प्रणयांत वाव नाही. पटलं तर खाटलं नाहीतर फुटलं. ====================== माणूस हा जनावरापेक्षा उच्च मानावा का? ====================== मानवी प्रणय हा जनावरी प्रणयापेक्षा उच्च दर्जाचा मानावा का? हो वा नाही हे कशावरून ठरवायचं? काही निकष आहेत का? आ.न., -गा.पै.
In reply to जनावरी प्रणय व मानवी प्रणय by गामा पैलवान
In reply to जनावर शब्दाचे दोन अर्थ होतात. by arunjoshi123
In reply to लिविनची चिकित्सा करणारांनी by arunjoshi123
In reply to कॉरेक्ट! by एमी
In reply to १. कोणी चिकित्सा करावी. by arunjoshi123
In reply to गौण कसे काय? by एमी
In reply to लिविन वाल्या पोरी चिकण्या by arunjoshi123
In reply to मी बायकांच्या नाही मतप्रदर्शन by एमी
In reply to कॉरेक्ट! by एमी
In reply to त्या ज्योतीबाई उत्तरे देत by arunjoshi123
In reply to arjunjoshi123, by ज्योति अळवणी
परंतु त्यानंतर माझ्या लक्षात आले की काही सदस्यांची या धाग्याच्या माध्यमातून आपापसात चर्चा होते आहे.मला तर असं काही वाटलं नाही. वेगवेगळे अस्पेक्ट्स मांडलेत विषयाचे लोकांनी. ------------------ नि मी नाव घेऊन तुम्हाला विवाह नि लिविन मधे संरचनात्मक फरक काय आहेत असं विचारलं तेव्हा तिथे काहीतरी लिहिणं अपेक्षित होतं. ---------------- इतरत्र नुस्तं वाचन केलं (वा नाही) तरी चाललं असतं.
In reply to ओके by arunjoshi123
In reply to मी माझी मतं मंडली आहेत. परत by ज्योति अळवणी
In reply to प्रथा कशा चालू होतात? by arunjoshi123
In reply to हम्म हा प्रतिसाद चांगला आहे. by एमी
तुमची मुलगी एखाद्या मुलाबरोबर