लिव इन आणि समाजाची मानसिकता 

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
12 Jan 2018 - 11:37 pm

"अग ते माझ्या शेजारच्या flatमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं."

"काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात."

"अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. तर विचारल तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या."

'काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?"

दोन मैत्रिणी बागेत आपापल्या मुलांना खेळायला सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. मी नेमकी त्यांच्या बाजूच्याच बाकावर बसले होते त्यामुळे त्यांचा संवाद एकू आला आणि मनात विचार आला.. हे लिव इन नातं इतक का बर अस्वीकारार्ह्य असावं अजूनही? या दोघींची मुलं लहान आहेत म्हणजे या देखील जेमतेम तिशीच्या आतल्या असणार. ती नवीन आलेली शेजारीण देखील साधारण याच वयातली असू शकते. मग तरीही ती अशी लिव इन मध्ये का राहात असावी असा विचार या का नाही करत. थोडे नकारार्थी विचार का आहेत यांचे? 

समजा एक मुलगा आणि एक मुलगी यांनी लग्न न करता रहायचे ठरवले तर त्या बाबतीत समाजाची नकारार्थी भावना का असावी? त्या मुलांच्या पालकांचे मत खूपच महत्वाचे असणार. पण मग तो त्या दोन कुटुंबांचा प्रश्न ठरतो. अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसते. अस का असावं? जर ते जोडपं सभ्यता पूर्वक रहात असेल तर इतरांना त्यात हरकत घेण्यासारखं काय असाव?

माझ्या एका मैत्रिणीने प्रेम केलं आणि वर्षभरातच लग्न केलं. तीन वर्ष झाली असतील-नसतील आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याच पटेनास झालं. अगदीच सतत आणि टोकाची भांडण व्हायला लागली तेव्हा तिने घटस्फोट घेण्याचं ठरवलं. तशी ती चांगल्या कंपनीमध्ये काम करत होती आणि भरपूर पगार देखील होता. पण खुद्द तिच्या आई-वडिलांनी सांगितलं अग अस एकदम घटस्फोट नको घेउस. सुधरेल तो हळूहळू. लग्न केलं आहेस न? मग थोडं सहन करायला शिक. तिच्या निर्णयात तिला फक्त मानसिक बळ हवं होत. पण तिच्या बाजूने तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. आज तिच्या लग्नाला चौदा वर्ष झाली आहेत. दहा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि नवरा एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. मात्र केवळ लग्न केलं आहे म्हणून एका छताखाली रहातात. ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर. 

एक अजून घटना अगदी चांगली माहितीतलीच. दोघ मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात होते. मुलगी अजून शिकत होती त्यामुळे त्यांना तितक्यात लग्न करायचं नव्हत. मात्र कुटुंबाच्या आग्रहामुळे दोघांनी लग्न केल. शिक्षण चालू असेपर्यंत मुलीने पुढे काय करायचं याचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिने एका जाहिरात कंपनीत इंटरव्ह्यू देला आणि तिला खूप चांगली नोकरी मिळाली. तिचा performance इतका चांगला होता की तिला तिच्या कंपनीने वरची पोस्ट दिली. मात्र त्यासाठी तिला दुसऱ्या शहरात जावं लागणार होत. मात्र सासरच्यांनी नाही म्हंटल त्यामुळे तिला ती ऑफर घेता आली नाही. 

अशा काही घटना पहिल्या किंवा ऐकल्या की वाटत की लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेण कितीतरी महत्वाच असत. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करीयर प्लान्स सगळ समजून घेण आवश्यक असत. केवळ 'आवडला/आवडली' म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे. 

अर्थात इतकं प्रक्टीकल असावं का? हा देखील चर्चेचा विषय होऊ शकतो. लिव इन मधील मुला-मुलीच्या पालकांचा याबद्दल विचार/मत देखील महत्वाच आहे. मुख्य म्हणजे लिव इन म्हणजे 'लग्न न करता एकत्र राहाण'. मग जर पुढे पटलं नाही तर मग दुसरा पार्टनर का? आणि अस पटेपर्यंत किती लिव इन नाती? असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. अलीकडे pre-marrage councelling देखील असतच. पण  'अलीकडची पिढी' अस म्हंटल तरी  या मुलांना देखील मन-भावना असतातच न. त्यामुळे जर पालकांनी थोडा विश्वास दाखवला तर ही मुलं सतत धरसोड वृत्तीने नक्कीच वागणार नाहीत. त्यामुळे लिव इन नात्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये अस मला वाटत.

विचार

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2018 - 12:03 am | श्रीगुरुजी

तुमची मुलगी एखाद्या मुलाबरोबर लग्न न करता काही वर्षे एकत्र राहिलेली चालेल का?

समजा अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर मुलाने लग्नास नकार दिलेला चालेल का?

लग्न न करताच तुमच्या मुलीला मूल झालेलं चालेल का?

मूल झाल्यानंतर मुलाने लग्नास नकार देऊन रिलेशनशिप थांबविलेली चालेल का?

अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर मुलीने पहिला मुलगा सोडून दुस-याबरोबर लग्न न करता एकत्र राहिली तर चालेल का?

दशानन's picture

13 Jan 2018 - 9:08 pm | दशानन

Haahaha , on mobile, don't have Marathi typing app. But soon I reply you with details. But I am okay or say I am heathy with this type of relationship because somehow you get exact reason why both not need to stay together.. if long years relationship and have a baby there also not big issue if both are working and earning.
Lot of need to say but this is your view "Indian mentality" type is not good.. live and give change to live all!! Pls.

*My political or other views start out my my family era, some where we need to fix personal era and community era.

** As per human we need to cross lots of milestones.. so we need to focus on that.

लिव्ह इन आणि विवाह पद्धत यांची तुलनाच होऊ शकत नाही, अर्थात विवाह पद्धतीत सुद्धा काही मर्यादा आहेत तश्याच मर्यादा लिव्ह इन ला सुद्धा आहेत, त्या श्रीगुरुजींनी अधोरेखित केल्या आहेत, म्हणून लिव्ह इन हे वाईटच असे काही नाही.
मुळात काही लोक लिव्ह इन आणि लग्न ह्या गोष्टी एकाच तराजूत तोलत असल्यामुळे खूप गोंधळ होत आहेत,

तिमा's picture

13 Jan 2018 - 12:15 am | तिमा

मी जुन्या पिढीचा असलो तरी लिव इन मधे मला काहीच गैर वाटत नाही. फक्त कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी आणि मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून , लिव इन मधे रहात असेपर्यंत मुले होऊ देऊ नयेत. एकदा, आपापसात चांगले पटते असे वाटले तर लग्न करावे आणि मगच मुले होऊ द्यावीत. अशाने घटस्फोटाचे प्रमाण बरेच कमी होईल.
समाजाने आता बदलले पाहिजे.

गामा पैलवान's picture

13 Jan 2018 - 1:25 am | गामा पैलवान

ज्योती आळवणी,

ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर.

यासाठी लिव्हिनाची गरज आहे का? रीतसर विवाह केलेले लोकंही आधीपासनं बरोबर रहात नाहीत. तरीपण लग्नं यशस्वी होतातच ना? तसंच आधीपासून एकत्र न राहणारे लोकंही एकमेकांना नापसंत करतात ना? मग आधीपासून एकत्र राहिल्याने असा काय फरक पडणार आहे?

आ.न.,
-गा.पै.

ज्योति अळवणी's picture

13 Jan 2018 - 9:13 am | ज्योति अळवणी

श्रीगुरुजी,

माझ्या मुलीने जर लिव इन मध्ये राहायचे आहे असे म्हंटले तर मी ते मान्य करीन. अर्थात मूल होऊ देऊ नकोस हे नक्की सांगेन. तुम्ही म्हणता त्या मुलाने सोडले तर. यात पुरुष डोमीनेटिंग विचार वाटतात. जर तिनेच त्याला सोडायचे ठरवले तर? तरीही मी तिच्या पाठीशी उभी राहीन. आयुष्यभर एखाद्या नात्याचं ओझे वागवण्यापेक्षा त्यातून मोकळे झालेले बरे अस मला वाटतं. अर्थात मी लेखात असेही म्हंटले आहे की अलीकडची पिढी भावनाहीन नाही. त्यामुळे अस झटकन नातं तोडून टाकलं अस ते देखील वागत नाहीत. मला देखील 2 मोठ्या मुली आहेत. या पिढीला मी अगदी जवळून बघते आहे.

गा. पै. जी,

अगोदर एकत्र राहिल्याने अनेक सवयी आणि आवडी-निवडी कळतात. अर्थात लिव इन हे एकच उत्तर आहे असा माझा दावा नाही. मात्र एखादा मुलगा आणि मुलगी करियर करत असताना एकमेकांना समजून घ्यायला एकत्र राहिले तर त्यात चुकीचे आणि समाजविरोधी काही आहे असे मला वाटत नाही

तिमा तुमच्याशी अगदी सहमत

वैयक्तिक प्रश्नाला संयमित उत्तर दिलेल आवडल. त्या गॉसिपमंगर बायका आणि हे वैयक्तिक प्रश्नकर्ते दोघांना मी 'mind your own business' म्हणाले असते. दोन कन्सेंटिन्ग प्रौढ एकमेकांसोबत काय करतायत हा काही matter of public interest असू शकत नाही.

आयुष्यभर एखाद्या नात्याचं ओझे वागवण्यापेक्षा त्यातून मोकळे झालेले बरे अस मला वाटतं. >> अगदी अगदी!

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2018 - 12:58 pm | श्रीगुरुजी

जेव्हा एखाद्या पब्लिक फोरमवर काही लिहिलं जातं तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया आणि प्रश्न येणारच. दोन प्रौढ एकमेकांसोबत काय करताहेत हे जेव्हा स्वतःहून सार्वजनिक केलं जातं तेव्हा हा matter of public interest नाही असं म्हणता येणार नाही. अर्थात त्यावरील प्रतिक्रिया आणि प्रश्न याकडे नक्कीच दुर्लक्ष करण्याचा हक्क आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2018 - 12:54 pm | श्रीगुरुजी

मुलाने मुलीला सोडणे यात पुरूष डॉमिनेशनचा प्रश्न नाही. अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत ज्यात काही वर्षे लिव्हइन मध्ये राहिल्यानंतर लग्न न करता मुलाने त्या मुलीला सोडून दिले व दुसर्‍याच मुलीशी लग्न केले. अशा परिस्थितीत त्याच्याबरोबर लिव्हइन मध्ये राहिलेल्या मुलीची न घरका ना घाटका अशी विचित्र अवस्था झालेली आहे.

एकंदरीत माझ्या ५ प्रश्नांपैकी तुम्ही पहिल्या व तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. दुसर्‍या व चौथ्या प्रश्नातील शक्यता तुम्ही गृहितच धरत नाही (हेच घडण्याची शक्यता सर्वाधिक आहे).

अर्थात कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे हे अजिबात बंधनकारक नाही.

ज्योति अळवणी's picture

13 Jan 2018 - 5:43 pm | ज्योति अळवणी

श्रीगुरुजी,

तुमच्या दुसऱ्या प्रश्नात मला तथ्य वाटत नाही. कदाचित अस ही होईल की माझी मुलगी काही वर्षे राहून मग त्या मुलाला नकार देईल.

तुमच्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे. मूल न होऊ देण्याची काळजी तिने घ्यावी हे मात्र मी तिला नक्की सांगेन.

अनेक वर्षे लिव इन मध्ये राहून नकार देणे आणि मग दुसऱ्या व्यक्तीबरोबर रहाणे चालेल का? हा प्रश्न देखील आहेच. पण अशी किती वर्षे असतात या मुलांच्या हातात? थोडा वयाचा उत्साह आणि उत्तम करियरचा माज कदाचित असू शकतो. पण काही काळच! ही मुलं देखील वाढत्या वयाबरोबर समजूतदार होताना मी बघितली आहेत. मुळात आपल्या मुलाच्या/मुलीच्या निवडीवर विश्वास ठेवून तिच्या/त्याच्या पाठीशी उभं राहावं की नाही; हा जास्त मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. मी नक्की उभी राहीन याची मला खात्री आहे. बाकी हा वैयक्तिक प्रश्न ठरतो

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2018 - 10:28 pm | श्रीगुरुजी

माझा दुसरा प्रश्न होता "समजा अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर मुलाने लग्नास नकार दिलेला चालेल का?". यावर तुमचे उत्तर होते "तुमच्या दुसऱ्या प्रश्नात मला तथ्य वाटत नाही."

मराठी वॄत्तपत्रातून "लिव्ह इन मध्ये राहून लग्नाला नकार दिल्याने मुलीची पोलिसांकडे तक्रार" अशी बातमी अनेकदा वाचलेली आहे. त्यामुळे लिव्हइन मध्ये काही काळ राहून (अर्थात लिव्हइनचे सगळे फायदे उपटून) नंतर मुलाने मुलीला लग्नास नकार देऊन तिसर्‍याच मुलीशी लग्न करण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Legal position of live-in relationship in India - http://www.shoneekapoor.com/legal-position-live-in-relationship-india/ या लेखात दिल्लीतील आकडेवारी आहे. दिल्लीतील तत्कालीन पोलिस आयुक्त बी एस बस्सी यांच्या दाव्यानुसार दिल्लीतील २०१५ मधील १६५६ बलात्काराच्या तक्रारीतील २५% तक्रारी लिव्हइन मध्ये राहून नंतर मुलाने लग्नास नकार दिल्यामुळे केलेल्या आहेत. म्हणजे निव्वळ दिल्लीतच २०१५ मध्ये लिव्हइन मधील मुलाने लग्नास नकार दिल्याची ४१४ प्रकरणे आहेत. तक्रार न केलेली सुद्धा प्रकरणे असतील. समाजात लिव्ह इन मध्ये राहण्याचे तुरळक प्रमाण पाहिले तर त्या तुलनेत मुलाने लग्नास नकार दिल्याच्या प्रकरणांची टक्केवारी खूपच जास्त आहे. लिव्ह इन मध्ये काही काळ राहिल्यानंतर मुलाने लग्न करण्यास नकार दिल्याने त्याच्याविरूद्ध बलात्काराची तक्रार केल्याची ही प्रकरणे आहेत. याविरूद्ध कोणीतरी एक सार्वजनिक याचिका सुद्धा तयार केली होती. लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहिलेल्या मुलीला कलम ४९८ अ या कलमाखाली तक्रार दाखल करता येत नाही हा मुलींना अजून एक तोटा आहे.

निष्ठा, विश्वास आणि कमिटमेंट हा लग्नाचा पाया आहे. नेमक्या याच गोष्टींचा लिव्ह इन मध्ये अभाव असतो. लिव्ह इन मध्ये कायदेशीर व इतर कोणत्याही कमिटमेंट नसते. त्यामुळे अशा नात्यातून अगदी सहज बाहेर पडता येते. अनेक वर्षे लिव्ह इन मध्ये राहून नातेसंबंध तुटले तर मुलाच्या तुलनेत मुलीलाच जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर संरक्षण पुरेसे नाही आणि यामुळे मानसिक, भावनिक इ. त्रास होतील ते वेगळेच.

रितसर ठरवून लग्न होऊन सुद्धा घटस्फोट होऊ शकतो. परंतु प्रेमविवाह झालेल्यांचे सुद्धा घटस्फोट होतात. माझ्या दोन मित्रांनी अनेकवर्षे आपल्या मैत्रिणीशी डेटिंग करून नंतर लग्न केले. परंतु नंतर काही वर्षांतच संबंध विकोपाला जाऊन त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांचे संबंध इतके बिघडले आहेत की मुलगा व मुलगी एकमेकांचे तोंड बघायला सुद्धा तयार नाहीत. अर्थात प्रेमविवाह केलेल्या अजून एकदोघांचे संसार उत्तम रितीने सुरू आहेत. लिव्हइन मध्ये राहून एकमेकांचे स्वभाव कळून नंतर लग्न केले तरी ते लग्न यशस्वी होण्याची शक्यता इतर प्रकारे झालेल्या लग्नांच्या यशस्वितेएवढीच आहे. परंतु लिव्ह इन मध्ये राहून लग्न झाले नाही तर त्यातून बर्‍याच समस्या निर्माण होऊन त्यात मुलीलाच जास्त त्रास होण्याची शक्यता आहे.

दुसर्‍या एका लेखात (Don't Live With Your Boyfriend if You Want to Get Married - http://www.huffingtonpost.ca/debra-macleod/living-with-your-partner_b_46...) लिव्ह इन च्या फायदेतोट्यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यातील काही प्रमुख मुद्दे असे आहेत.

- Men and women have very different ideas about what living together means. Women typically see it as an almost inevitable step toward marriage, while men see it as a no-obligation "test drive." Couples who initiate a live-in relationship under the fog of such contradictory assumptions are already in trouble.

- Living together results in regular, no-strings sex for a man, thus removing the sexual motivation that is part of a marriage proposal.

- Because it removes much of a man's motivation to make the formal commitment of marriage within a reasonable time, living together often causes women to feel frustrated and get stuck in a cycle of hope and disappointment.

- Couples who live together are less likely to get married. Why? Well, for the reasons I've mentioned that remove the motivation to marry. Co-habiting couples also tend to have a more lax attitude toward commitment and don't work as hard to stay together. When their relationship goes through a rough spot -- as all relationships do -- it is all too easy to just walk away. The legal and public commitment of marriage motivates couples to work through conflict, strengthen the relationship and stay together.

- couples who live together before marriage divorce at higher rates.

- Living together takes the excitement out of being newlyweds. Being a new bride and moving in with your husband to start a life -- and perhaps a family -- with those shiny new rings on your fingers to show the world your commitment, is a wonderful experience that many women still hope for.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

13 Jan 2018 - 11:06 am | झपाटलेला फिलॉसॉफर

हे लिव इन नातं इतक का बर अस्वीकारार्ह्य असावं अजूनही?

भारतात व विषेशतः हिंदू समाजात असली थेरं सदासर्वदा अस्वीकारार्ह्य च राहणार आणि रहावीत
एकत्र राहिले म्हणजे शरीरसम्बन्ध येणारच ... ते भारतीय नीतिशास्त्र व संस्कॄती याना कदापि मान्य होणार नाहीत
असल्या उच्छॄन्खल प्रथाना उत्तेजन देणार्‍या प्रवॄत्तीन्चा जाहीर निषेध

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2018 - 6:32 pm | टवाळ कार्टा

ghanta

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2018 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

पिक्टोग्राफ ! =))

नाखु's picture

15 Jan 2018 - 10:25 pm | नाखु

योग्य वेळी वाजवून फार उत्तम काम केले आहे!

अखिल मिपा बघता काय, सामील व्हा या स्वच्छ्ता अभियानांतर्गत जन हितार्थ जारी

शित्रेउमेश's picture

18 Jan 2018 - 9:51 am | शित्रेउमेश

हिंदू समाजात असली थेरं सदासर्वदा अस्वीकारार्ह्य च राहणार आणि रहावीत....

पुरोगामी हिंदू समाजात असली थेरं सदासर्वदा अस्वीकारार्ह्य च राहणार आणि रहावीत....

वेल, जगाच्या गाड्याची गती कोणीही फार काळ थोपवून धरू शकत नाहीत. ज्यांना लिव्ह इन मध्ये राहायचंय, ते राहतीलच. तेव्हा समाजाचं काय होईल याची चिंता करत बसण्यापेक्षा आपण आपापलं आयुष्य छान मजेत जगावं हेच उत्तम.

मराठी कथालेखक's picture

15 Jan 2018 - 11:23 am | मराठी कथालेखक

ज्यांना लिव्ह इन मध्ये राहायचंय, ते राहतीलच.

अतिशय सहमत.
बदल हे होतच राहणार, अर्थात हे सगळे प्रयोग धाडसी आहेतच यात शंका नाही आणि ज्यांना हे धाडस करण्याची शक्ती आणि इच्छा आहे त्यांनी ते करावं त्याउलट ज्यांना ते झेपणार नाही त्यांनी वाट्यालाही जावू नये.
तसं म्हंटलं तर कोणताही सामाजिक बदल धाडसीच असतो. अगदी स्त्री शिक्षण असो किंवा इतर काही. [इथे मी या दोन बदलांतील चांगले/वाईटपणाची तुलना करत नसून त्या बदलाला अवलंबण्यास लागणार्‍या धाडसाबद्दल बोलत आहे].
त्यामुळे प्रवाहाविरुद्ध जावून कोणतीही गोष्ट मला जमेल का / झेपेल का याचा विचार आधी केला पाहिजे.
एखाद्या लिव इन मधील जोडप्याने आपण एकेमेकांस अनुरुप नाही असा विचार करत एकमेकांना सोडले तर दोघेही ते समजू शकतात. पण 'घरचे विरोध करत आहेत' म्हणून एकाने कच खाल्ली तर ते जास्त दुर्देवी ठरेल.
सानिया या लेखिकेची एक कादंबरी आहे (शीर्षक बहूधा "वर्तुळ " आहे, आता आठवत नाही) त्यात लिव इनचा बराच वैचारिक उहापोह केला आहे.

गामा पैलवान's picture

13 Jan 2018 - 4:22 pm | गामा पैलवान

ज्योति अळवणी,

मात्र एखादा मुलगा आणि मुलगी करियर करत असताना एकमेकांना समजून घ्यायला एकत्र राहिले तर त्यात चुकीचे आणि समाजविरोधी काही आहे असे मला वाटत नाही

समाजासाठी आज घातक नाही. पण आजून २५ वर्षांनी दुष्परिणाम दिसू लागले की जागं व्हायची वेळ निघून गेली असेल.

समजा लिव्हिनातनं अपत्य झालं म्हणजे? कोण घेणार त्याच्या पितृपदाची जबाबदारी? जोडीदार? नाही घेतली तर अपत्याचं संगोपन एकपालकी होणार. अशी मुलं गुन्हेगारीकडे वळायचा धोका असतो. पाश्चात्य देशांच्या अनुभवातनं भारतीयांनी शहाणं व्हायला हवं ना?

लिव्हिन स्त्रीसाठी मात्र काल, आज आणि उद्या सरळसरळ घातक आहे. लग्न हे स्त्रीसाठी सुरक्षित कवच आहे. लग्न करायचं नसेल तर स्त्रीने एकटं राहायला शिकावं. पण लिव्हिन म्हणजे भलताच धोका पत्करणं आहे.

आ.न.,
-गा.पै.

ज्योति अळवणी's picture

13 Jan 2018 - 5:50 pm | ज्योति अळवणी

गा. पै. जी,

फक्त स्त्रीसाठी धोकादायक? पुरुषांसाठी नाही? म्हणजे पुरुष लिव इन मध्ये असले तर चालतील अस म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि जर पुरुष लिव इन मध्ये असेल तर त्याची जोडीदार स्त्रीच अडणार न?

बर! लग्नाबांधनात असूनही लग्नबाह्य संबंध असतात. त्यामुळे जोडीदाराला त्रास होतो. त्याबद्दल आपलं काय मत आहे? की स्त्रीने एकदा लग्न करून स्वतःला सुरक्षित करावं आणि पुरुषाने हवते करावं असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

गामा पैलवान's picture

13 Jan 2018 - 7:46 pm | गामा पैलवान

ज्योति अळवणी,

पुरुषानं हवं ते करावं असं मी कुठेही म्हंटलं नाही. पण लिव्हिनाचा पुरुषापेक्षा स्त्रीवर जास्त घातक परिणाम होतो म्हणून बायकांची बाजू अधिक ठळकपणे मांडली आहे.

स्त्री आणि पुरुष यांच्यात स्त्रीची बाजू नेहमीच लंगडी असणार आहे. हे निसर्गाने ठरवून दिलंय. त्यावर कोणीच काहीच करू शकंत नाही. म्हणून माणसाने लग्नाची आणि एकपत्नीत्वाची सोय उत्पन्न केली आहे. लग्नाला तिलांजली देणे म्हणजे स्त्रीसाठी स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारणे आहे.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2018 - 7:58 pm | टवाळ कार्टा

स्त्री आणि पुरुष यांच्यात स्त्रीची बाजू नेहमीच लंगडी असणार आहे. हे निसर्गाने ठरवून दिलंय. त्यावर कोणीच काहीच करू शकंत नाही. म्हणून माणसाने लग्नाची आणि एकपत्नीत्वाची सोय उत्पन्न केली आहे.

हे वाक्य

स्त्री आणि पुरुष यांच्यात स्त्रीची बाजू नेहमीच लंगडी असणार आहे. हे निसर्गाने ठरवून दिलंय. त्यावर कोणीच काहीच करू शकंत नाही. म्हणून माणसाने स्त्रीयांनी लग्नाची आणि एकपत्नीत्वाची सोय उत्पन्न केली आहे.

असे असते तर आणखी दारुगोळा भरता आला असता ;)

गामा पैलवान,

ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख करतो तो नीट करतो आहोत कि नाही हे पाहणे अवघड आहे का?

गामा पैलवान's picture

13 Jan 2018 - 8:45 pm | गामा पैलवान

सर टोबी,

ज्योति अलवनि की ज्योती अळवणी असा प्रश्न आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की त्याचं खरं नाव ज्योती अळवणी असून मिपावर सदस्यत्व घेतांना ज्योति अलवनि म्हणून उमटलं. ते बदलता येत नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

ज्योति अळवणी's picture

14 Jan 2018 - 12:47 am | ज्योति अळवणी

गा. पै. जी आणि सर टोबी,

माझे आडनाव अळवणी असेच आहे. गा. पै. म्हणतात त्याप्रमाणे सदस्यत्व घेताना अगदी नवीन असल्याने मराठी typing मध्ये चूक झाली जी तेव्हा दुरुस्त करणे राहून गेले.

डायवर's picture

13 Jan 2018 - 7:19 pm | डायवर

लिव ईन मध्ये पुरूष नंतर लग्नाला नकार देत असेल तर बलात्काराची पोलीस केस करण्याची त्या स्त्रीला सोय आहे पण हीच स्त्री जर लग्नाला नकार देत असेल तर त्या पुरुषाला अशी काहीच सोय नाही.

कवितानागेश's picture

13 Jan 2018 - 8:52 pm | कवितानागेश

लिव्ह इन राजरोस पणे सुरू झाले तर जगात एकही लग्न होणार नाही!
महागडे कपडे, कार्यालय आणि केटरिंग वाल्यांचा व्यवसाय बसेल.
.......... शिवाय लोकसंख्या वाढीला आळा बसेल!

सुबोध खरे's picture

13 Jan 2018 - 9:09 pm | सुबोध खरे

लिव्ह इन मध्ये किती वर्षे राहावे? आणि त्या कालावधीनंतर पटले नाही तर वेगळे झाल्यावर पुढे काय करायचे? परत लिव्ह इन?
असं किती वर्षे?

पृथ्वी वरचा निसर्ग हा सेल्फ सस्टेनिंग इको सिस्टम आहे त्यामुळे बॅलन्स जेव्हा एका बाजूला झुकायला लागतो तेव्हा निसर्गच करेक्टिव्ह ऍक्शन घेतो, जसे डायनोसोर्स नष्ट झाले.

आता मानवाची लोकसंख्या सात अब्जाच्या पल्याड गेल्याने निसर्गाची करेक्टिव्ह ऍक्शन चालू झाली आहे. एलजीबीटींची वाढती संख्या आणि त्यांना मिळणारी मान्यता, डिंक्स कपल्स, संतती न होऊ देणारे लिव्ह-इन वाले, शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार पुरुष मंडळीतील शुक्राणूंची घटती संख्या, वंश सातत्य हे निसर्गाचे अत्युच्य प्राधान्य लक्षात न घेता करियरच्या मागे धावणारे हुच्चभ्रू इत्यादी अशा नानाविध मार्गे लोकसंख्या काबूत ठेवण्याचे निसर्गाचे मार्ग असतील हि.

या उप्पर सुजाण मानव आपल्या परीने लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतोच आहे. आणि जे करत नाहीत त्यांना एकमेकांच्या उरावर बसायची प्रेरणा हि तोच निसर्ग देत असेल?

एकंदरीत नव्या जमान्यातल्या लिव्ह-इन पेक्षा आम्ही जुन्या जमान्यातले लव्ह-इन वाले बरे !

ओरायन's picture

14 Jan 2018 - 11:33 pm | ओरायन

पटत आहे चामुंडराय !

मराठी कथालेखक's picture

14 Jan 2018 - 10:29 pm | मराठी कथालेखक

अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसते

मला नाही वाटत विशेष अडचण येत असावी. घर भाड्याने देताना कुणी लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) मागत नाही अगदी पोलीस पडताळणीकरिताही ते मागितले जात नाही (म्हणजे नसावे, काही वर्षांपुर्वी मी माझा फ्लॅट भाड्याने देत होतो आणि पोलीस पडताळणीही करुन घ्यायचो पण पोलिसांनी भाडेकरुला कधी लग्नाचे प्रमाणपत्र मागितले नाही. )
याउलट समूहाने राहणार्‍या अविवाहित मुलांना वा मुलींना (बॅचलर्स) घर भाड्याने देण्यास सोसायटीचा विरोध असतो असे अनेकदा दिसते. पण या गोष्टीचीही कायदेशीर अर्हता तपासली पाहिजे. निवारा ही मानवाची मुलभूत गरज आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक स्थितीमुळे हा मुलभूत हक्क डावलणे (खासकरुन घरमालक तयार असताना सोसायटीने खोडा घालणे) कायदेशीर आहे का ?

ओरायन's picture

15 Jan 2018 - 12:19 am | ओरायन

लिव ईनचा हेतु हा माझ्या स्वभावाशी मिळताजुळता पार्टनर हवा असा असावा..
आता अशा शक्यतांचा विचार करू..ह्यासाठी प्रोब्याबिलिटी बघावी लागेल. माणसाच्या स्वभावाचे अनेक प्रकार आहेत...किती माहिती नाही...पण आपण ठोबळमानाने फक्त १० वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावाची माणसे आहेत हे गृहितक मानु..आता १० जणांमधील ऐक पुरूष व ऐक स्ञी राहत आहेत..स्वभाव समजण्यासाठी किती वेळ लागतो हे पण तसे समजणे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असेल..तरी असे मानु की ३ महिन्यात स्वभाव अगदी पुर्णपणे समजु लागला आहे.जर पहिले जोडपे ऐकाच स्वभावाचे निघाले तर वेल अन्ड गुड..३ महिन्यात रिझल्ट मिळेल..पण ही शक्यता १।१० ऐवढीच राहिल. जर पहिले जोडपे विसंगत असेल..तर पुढे सुसंगत पार्टनर मिळेपर्यंत हा खेळ चालुच राहिल.
ह्यात एक मोठा मुद्दा निसटत आहे की, प्रत्यक्ष लग्न न झाल्याने, लग्न झाल्यानंतर ऐकञित दोघांवर येणारे प्रसंग नसतीलच..किंवा डमी असतील...तर अशा डमी घटनांवरील दोघांची प्रतिक्रिया , ही लग्न झाल्यावर प्रत्यक्ष घटनेत वेगळी असण्याची शक्यता आहे..जर अशी प्रतिक्रिया वेगळी जर आली, तर वादाची ठिणगी पडू शकते.
दुसरा विचार असा की वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे नवराबायको असतील..पण जर त्यांच्यात दोन्हींबाजुनीं उत्तम जाणीव असेल, प्रगल्भता असेल तर ते ह्या लिव्ह ईन वाल्यांपेक्षा चांगल्याप्रकारे सहजीवन व्यतित करतील.वेगळ्या स्वभावातील फायदे त्यांच्या मुलामुलींना मिळतील..

arunjoshi123's picture

15 Jan 2018 - 12:39 am | arunjoshi123

ज्योतीजी,
विवाह नि लिविन यांच्यात मूलभूत स्ट्रक्चरल फरक काय काय आहेत?
======================================
मला सुचलेले काही विचार देत आहे. वरच्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात ते लागू आहेत काय?
विवाहापूर्वी व्यक्तिने लफडी करावीत काय? ---> शक्य तितकी लफडी करावीत.
विवाहापूर्वी व्यक्तिने सॉफिस्टिकेटेड पद्धतीने लफडी करावीत काय? -----> शक्य झाल्यास, परवडल्यास करावीत.
व्यक्तिने आयुष्यभर नुसती लफडीच करावीत काय? -------> हे शक्यतो टाळावं.
=================================
पारंपारिक प्रकारे तसं लग्नाला पोरी/जोडिदार पाहणं हे पण एक प्रकारचं माइल्ड लिविनच आहे. प्राथमिक चिकित्सा होइपर्यंत आत्मिक गुंतवणूक शून्य असते. एकदा जोडीदार ठरला, लग्न झालं, सेक्स केला, मुले झाली इ इ पायर्‍यानुसार ती वाढत जाते. लिविन काय आहे? कंपॅटीबिलिटीबद्दलचे संभ्रम दूर होइस्तो सग्ळं करून बघायचं? स्वभाव, करियर, उत्पन्न, रुची, सेक्स्यूअ‍ॅलिटी, व्यसने, लाईफस्टाइल, इ कंपॅटीबल आहे का हे चेक करायचं? लिविन केव्हापर्यंत करायचं? कंपॅटीबिलिटि असर्टेन होत नाही तेव्हापर्यंत कि सगळं फायनली सेटल होत तोपर्यंत? लिविन हा परीक्षाकाळ असल्यामुळे तेव्हा चांगुलपणाचा आव आणला जाईल नि खरे गुण नंतर दिसतील असं संभव आहेच ना? (आताच्या माईल्ड लिविनमधे हे जास्तच होतं, ते असो.)
-------------
जोडीदार अपत्याची काळजी कसा/कशी घेतो/घेते हे महत्त्वाचं नाही का? मूल का म्हणे नाही होऊ द्यायचं? ते देखील चेक करून पाहणं इष्ट असेल ना?
--------------------------
१००% व्यवस्थित जोडीदार असला तरी लग्न नावाच्या गोष्टीचीच एक रिस्क आणि लाएबिलिटी असते. त्यात प्रत्यक्षात वर जोडीदार कसला आहे याची रिस्क असते. पारंपारिक पद्धतीने लग्न न करता लिविन करून लग्न (वा नाही केले, जे काय ते) केले तर ही रिस्क किती टक्के कमी होते?
-------------------------
लिविन केल्यावर "मुलीला नोकरी करू देणारे सासरचे" लिविननंतर लग्न केल्यानंतर तीच पॉलिसी मुलीच्या इच्छेखातर चालू ठेवतील अशी शास्वती असते का?
----------------------------------------
टीपीकली लिविन पार्टनरला मना करायची काय कारण असू शकतात? लिविन सर्वमान्य (खडूस शेजारी असो, पण सासर माहेरचे लोक) असते का? वास्तविक त्या काळात मुलाची/मुलीची सगळी मिळते का? कि तो काळ फक्त एकमेकांना ओळखायचा इ इ असतो? एक व्यवस्थित ड्यू डिलिजन्स मेकॅनिझम उपलब्ध करून दिला तर लिविन अनावश्यक ठरेल काय?
-------------------------------------------
मनुष्य आपल्या जोडिदाराबद्दलच्या भावनिक निष्ठा किती फ्रिक्वेसीन्सीने बदलू शकतो? म्हणजे सर्वसाधारणपणे एक वर्षात किती मॅक्सिमम लिविन आवश्यक तितकी भावनिक गुंतवणूक करून करता येतील?
------------------------------------------------
आयुष्यातला (तसा असल्यास) पहिला प्रणय ज्या व्यक्तीची आपण चाचणी करत आहोत, किंवा ज्याला आपण काही कंपॅटिबिलीटीच्या कारणांनी सोडूनही देऊ शकतो अशा व्हक्तिशी करत आहोत अशा भावनेने करावा काय?

गामा पैलवान's picture

15 Jan 2018 - 4:01 am | गामा पैलवान

अरुण जोशी,

आयुष्यातला (तसा असल्यास) पहिला प्रणय ज्या व्यक्तीची आपण चाचणी करत आहोत, किंवा ज्याला आपण काही कंपॅटिबिलीटीच्या कारणांनी सोडूनही देऊ शकतो अशा व्हक्तिशी करत आहोत अशा भावनेने करावा काय?

अधिक सुलभ शब्दांत सांगायचं झालं तर, पहिला प्रणय जनावरासारखा करावा का?

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

15 Jan 2018 - 11:38 am | मराठी कथालेखक

अधिक सुलभ शब्दांत सांगायचं झालं तर, पहिला प्रणय जनावरासारखा करावा का?

काही वर्षापुर्वी पर्यंतच्या कौटुंबिक / सामाजिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास ज्यांचा ठरवून विवाह होई अशा अनेक सर्वसामान्य मुलामुलींना लग्न ठरल्यानंतरही भेटण्याची , बोलण्याची , सोबत फिरण्याची मुभा नसे. त्यामुळे लग्नापर्यंत एकमेकांना समजून घेणे तर दूरच पण एकमेकांचा नीटसा परिचयही झालेला नसे. पण लग्नानंतरचा पहिला प्रणय पहिल्या रात्रीच व्हावा अशी अपेक्षा असे . अर्था तो तसा (म्हणजे पहिल्या रात्री) नेहमीच होत असतो की नाही हा शोधाचा विषय होईल पण किमान ६०-७०% जोडप्यांत तरी तो तसाच होत असला असे मानले तरी अगदी अनोळखी अशा दोन व्यक्तीतला प्रणय म्हणता येईल. काही कुटूंबात सत्यनारायणापर्यंत वा कुलदैवताचे दर्शन घेईपर्यंत संबंध न करण्याचे बंधन असते त्यामु़ळे तिथे काही प्रमाणात हे टळत असेलही पण बहुतांशी जोडप्याकरिता तो अनोळखी व्यक्तीमंधला प्रणय असावा ...

मराठी कथालेखक's picture

15 Jan 2018 - 11:45 am | मराठी कथालेखक

प्रणय जनावरासारखा

असा शब्द प्रयोग करणे कितपत योग्य आहे ?
दोन प्रोढ व्यक्ती परस्पर सामंजस्याने आणि इतर कुणाला काही त्रास न देता एखादी गोष्ट करतात, ती सगळ्यांना पटेलच असे नाही. त्यातल्या त्रुटी दाखवण्याचा, आणि ती गोष्ट फार चुकीची आहे असे वाटल्यास नवीन पिढीने त्या मार्गाने जावू नये म्हणून कठोरपणे टीका करण्याचा तुमचा रास्त अधिकार आहेच. पण तो वापरताना त्या व्यक्तींची अप्रत्यक्षपणे जनावरांशी तुलना करावी का ?

माहितगार's picture

15 Jan 2018 - 12:01 pm | माहितगार

सहमत आहे, अभिव्यक्ती स्वांत्र्यांतर्गत मुक्ततेच्या मानवी संकल्पनेत सुद्धा परस्पर अनुमतीचे बंधन शिल्लक राहते, ते इतर प्राण्यांच्या बाबतीत असतेच असे नाही, आणि अशी तुलना अप्रत्यक्षपणे परस्पर अनुमतीची बंधने झुगारु इच्छित असेल तर स्पृहणीय ठरत नसावी.

बाकी या विषयावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बूज राखावी, अशा संबंधातून निर्मित अपत्यांना संगोपन विषयक कायद्याचे पाठबळ मिळे पर्यंत लिव्ह - इन बद्दलही सुस्प्ष्ट लेखी करार असावेत.

अभिव्यक्ती स्वांतत्र्य म्हणून ठिकच बाकी अजो ंनी उपस्थीत केलेले मुद्देही तरुणांनी विचारात घेण्या जोगे असावेत

arunjoshi123's picture

15 Jan 2018 - 1:47 pm | arunjoshi123

लिविन वाल्यांची ओळख लग्नवाल्यांपेक्षा जास्त असते हा एक भाग आहेच. माझा मुद्दा मानसिक ओरियंटेशनचा होता.
---------------------
विरुद्ध लिंगाचे आपल्या ओळखीचे अनेक असतात. ओळख जास्त म्हणून संबंधांतील सहजता जास्त असा प्रमेय लावता येईल का? लग्नात ओळख कमी असली तरी मानसिकता फार पॉझिटिव असते. सात जन्म, एकरुप होणं, आर्थिक सीमा नसणं, इ इ.
------------------
गामाजींची वाक्यरचना दुर्दैवी आहे. लिविन वाल्यांचा प्रणय नक्कीच जनावर टाईपचा नसतो. अर्थात त्यात हिशेब इतका जास्त असतो कि एखाद्या माणसाला त्या नात्यात इतका हिशेब करणे घाणेरडं वाटू शकतं. पण अंततः त्यांचीही मानसिकता पॉझिटिवच असते.

मराठी कथालेखक's picture

15 Jan 2018 - 4:06 pm | मराठी कथालेखक

अर्थात त्यात हिशेब इतका जास्त असतो कि एखाद्या माणसाला त्या नात्यात इतका हिशेब करणे घाणेरडं वाटू शकतं.

हे सरसकटीकरण आहे, शिवाय ते बर्‍यापैकी कल्पनेवर फक्त आधारलेले असू शकेल असेही मला वाटते.
इथे असलेल्यांपैकी कुणाला लिव इनचा अनुभव आहे का ? वा लिव इनमधील कुणाशी थेट संपर्क / परिचय आहे का ?
लिव इन मध्ये कमिटमेंट नसतेच , 'मी तुला कधीही सोडेन, वा तु मला कधीही सोडशील' अशीच भावना सतत असते का ?खूप हिशेब असतोय असं तुम्ही म्हणताय. पण ते ही खरं आहे का ? मी तर अनेकदा खास -जवळच्या मैत्रीत देखील हिशेब मांडला जात नाही असाच अनुभव घेतला आहे. मग लिव इन मध्ये असा हिशेब सतत असतो का ?
माझी कुणाही लिव इन मध्ये राहणार्‍यांशी थेट ओळख नाही त्यामुळे मी याबद्दल अधिकाराने सांगू शकणार नाही. पण तरी दोन समंजस व्यक्ती निरतिशय प्रेम, विश्वास असल्याशिवाय लिव इनमध्ये राहणार नाहीत असे मला वाटते. लग्न काय किंवा लिव इन काय दोन्हीचा निर्णय समंजसपणे घेणेच योग्य नाहीतर आयुष्य भरकटू शकते.

थेट ओळख कुणाशी नसल्याने लिव इन म्हंटल्यावर मला आशिकी-२ हा चित्रपट आठवतो. नायक नायिकेचे लिव॑ इन , त्यांच्यातले निरतिशय प्रेम, विश्वास, ओढ, एकमेकांचा आदर, त्यागाची भावना ..केवळ अप्रतिम

पण तरी दोन समंजस व्यक्ती निरतिशय प्रेम, विश्वास असल्याशिवाय लिव इनमध्ये राहणार नाहीत असे मला वाटते.

समंजसपणा, निरातिशय, प्रेम, विश्वास इ इ शब्द आले तर लगीन उरकून टाकायचं. दोघांत इतकं आहे म्हटल्यावर अजून चार प्रयोग करणं तद्दन मूर्खपणा आहे.
------------
लिविनमधे असलं काही नसतं. उलट तुटायची संभावना जास्त म्हणून लग्नाऐवजी हा पर्याय असतो. पोटेंशियली प्रेम होइल हि भावना असते पण बाकी सगळं शून्य.

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2018 - 4:20 pm | मराठी कथालेखक

अजून चार प्रयोग करणं तद्दन मूर्खपणा आहे.

लग्न हा देखील कधीकाळी एक प्रयोगच असेल काय ?
मुळात कुणालाही नवीन प्रयोग करायची गरज का वाटावी याचाही विचार व्हायला हवा.

वा लिव इनमधील कुणाशी थेट संपर्क / परिचय आहे का ?

लिविन वालं एक कपल हनिमूनला (वा फिरायला) उत्तराखंडमधे आलं होतं. आमच्या कपल टू कपल १-२ दिवस चिक्कार गप्पा झालेल्या. त्यांना माहित असलेले लिविनवाले तर चिकारच होते. कम्यूनिटी सारखा प्रकार वाटला.
----------
सगळ्यात माझ्यासारख्या प्रतिगाम्याला धक्का देणारी, दुखवणारी बाब म्हणजे - "लग्नाचा नि लिविनचा काय संबंध?" हे विचारा. आपण सगळे हे विवाहाच्या उद्देशानं इ इ बोलताय पण विवाहाचा विचारही करणारी मंडळी त्यांत अत्यल्प आहेत.

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2018 - 4:19 pm | मराठी कथालेखक

काय काय गप्पा झाल्यात हे थोडं विस्तारानं सांगू शकाल काय ...लिव इन म्हणजे मुर्खपणा हा निष्कर्श काहीसा बाजूला ठेवून फक्त काय बोलणं झालं ते सांगितलंत तर फारच छान.

लिव इन म्हणजे मुर्खपणा हा निष्कर्श काहीसा बाजूला ठेवून

मी असा निष्कर्ष काढलाय का? विसरलो.

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2018 - 5:17 pm | मराठी कथालेखक

दोघांत इतकं आहे म्हटल्यावर अजून चार प्रयोग करणं तद्दन मूर्खपणा आहे.

या वाक्याचा अप्रत्यक्ष अर्थ तसा होतो.
असो.. तुम्ही त्या कपलशी झालेल्या गप्पांबद्दल बोलत होतात :)

त्यांनी सांगीतलेली माहीत अनडायल्यूटेड (मंजे माझी मते न घुसवता अशी)
१. लिविन आणि लग्नाचा काही संबंध नाही. ते अल्टरनेटीव आहे, पायरी नाही.
२. त्यात कमिटेड आणि अनकमिटेड असे प्रकार असतात.
३. सांगताना लोकांना (मंजे गावपट लोकांना) नवरा-बायको मंतात, इतरा गीएफबीएफ मंतात.
४. जनरली सेक्स करतातच.
५. काहींदा इतरत्र चाचपणे पार्टनरला मान्य असते.
६. पैशांचा व्यवहार वेगळा ठेवतात.
७. कॉमन खर्च ५०:५० करतात.
८. घरच्यांना रुममेट म्हणून सांगतात.
९. घरमालकाला नवरा बायको म्हणून सांगतात.
१०. भाडे, चांगल्या कॉलनीत भाडे परवडणे, लाईफ स्टँडर्ड परवडणे हे महत्त्वाचं
११. लग्नही कदाचित करायचं मन होऊ शकतं
१२. जोडिदाराला बंधनं घालता येत नाहीत.
१३. एंजॉयमेंट फुल्ल असते.
१४. सर्वसाधारणपणे करियर, गोल्स, नोकर्‍या, शिक्षण, इ इ प्रचंड डायनामिक असतं, वेळखाऊ असतं म्हणून हे परवडतं.
१५. दारु, गांजा, पब, डीस्को, पार्ट्या, सिगारेट, सिनेमे, इ इ प्रकार खूप असतो.
१६. जनरली फार श्रीमंत लोक असतात.
१७. यांची भांडणं प्रचंड होतात. रिलेशनशिप टेशन्स चिकार असतं.
१८ आता लग्न म्हटलं कि भांडणं इ इ वाढतात म्हणून तो विषय निघत नाही. मूळात दोन पैकी एकाला तरी फक्त सेक्सची मज्जा पाहिजे असते.
१९. बदली झाली, इ कि हॉटेल बदल्यासारखं "सगळं" बदलतात.
=================================================
अर्थात हि त्यांनी ६-७ पेगांच्या प्रभावाखाली केलेली नि मी १ पेगाच्या प्रभावाखाली ऐकलेली विधाने आहेत. पण मला जन्विन, सेंटिमेंटल स्टफ वाटला.

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2018 - 8:03 pm | मराठी कथालेखक

१. लिविन आणि लग्नाचा काही संबंध नाही. ते अल्टरनेटीव आहे, पायरी नाही.
२. त्यात कमिटेड आणि अनकमिटेड असे प्रकार असतात.
५. काहींदा इतरत्र चाचपणे पार्टनरला मान्य असते.
१२. जोडिदाराला बंधनं घालता येत नाहीत.
१५. दारु, गांजा, पब, डीस्को, पार्ट्या, सिगारेट, सिनेमे, इ इ प्रकार खूप असतो.
१९. बदली झाली, इ कि हॉटेल बदल्यासारखं "सगळं" बदलतात.

हं.. हे सगळं 'ओपन रिलेशनशिप'च्या जवळ जाणारं किंवा ओपन रिलेशनशिपची पायरी असंही म्हणता येईल.

१७. यांची भांडणं प्रचंड होतात. रिलेशनशिप टेशन्स चिकार असतं.

हे बहूधा कमिटेड वाल्यांचं .. म्हणजे लग्नाच्या जवळ असणार्‍यांच असावं

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2018 - 7:57 pm | मराठी कथालेखक

सगळ्यात माझ्यासारख्या प्रतिगाम्याला धक्का देणारी, दुखवणारी बाब म्हणजे - "लग्नाचा नि लिविनचा काय संबंध?" हे विचारा. आपण सगळे हे विवाहाच्या उद्देशानं इ इ बोलताय पण विवाहाचा विचारही करणारी मंडळी त्यांत अत्यल्प आहेत.

तुमचं म्हणणं बरोबर आहे...बहुतेककरुन लिव इनची तुलना पारंपारिक / रुढ विवाहसंस्थेशी होणार नाही , पण ओपन रिलेशनशिप (मुक्त नातेसंबंध) असलेली जीवनपद्धती स्वीकारायची असल्यास /हवी असल्यास लिव इन हा लग्नापेक्षा अधिक चांगला पर्याय ठरेल. म्हणजे लग्न करुन ओपन रिलेशनशिप /मॅरेज जगणे खूप कठीण होईल त्यापेक्षा लिव इन मध्ये राहणार्‍यांना ओपन रिलेशनशिपमध्ये राहणे तुलनेने बरेच सोपे जाईल,
याच अनुषंगाने ओपन रिलेशनशिपबद्दल पण चर्चा करता येईल.

आदिजोशी's picture

15 Jan 2018 - 4:41 pm | आदिजोशी

कुटुंब संस्कॄती मोडीत काढून समाजाला अस्थीर करायचे डावे अविचारवंत आणि फेमिनाझींचे फार जुने कारस्थान आहे. त्याचाच हा भाग आहे.
साधारणपणे कपल्स खालील स्टेजेस मधून जातात:
१ - ओळख (घरच्यांनी घडवलेली / स्वतःहून झालेली)
२ - माणूस आवडणे
३ - ह्याच माणसासोबत आयुष्य व्यतीत करायचा निर्णय घेणे (अरेंज्ड मॅरेज / लव्ह मॅरेज)
४ - आणि मग लग्न करून एकत्र रहायला लागणे

आता इथे ४ थ्या स्टेजची जागा लिव्हईन ने घेतली असे जमेस धरले तरी कोणतेही कपल लिव्हईन मधे एकत्र रहायला जाताना लग्नापूर्वी करायची सगळी खातरजमा करणारच. उगाच रस्त्याने जाणायेणार्‍याचा हात पकडून 'चल आपण लिव्हईन ट्राय करू' असं तर होणार नाही. माणसाचा स्वभाव, वैचारीक जडणघडण, नोकरी, भविष्याविषयीचे विचार हे सगळंच बघितलं जाणार. मग लग्नच करायला काय हरकत आहे? कारण ह्या स्टेजला येऊन फक्त बेडमधली कंपॅटिबिलिटी बघणंच शिल्लक राहतं. पुढे नाहीच पटलं तर लग्नानंतरही वेगळं होता येतंच.

मुळात लिव्हईन आणी लग्नात मुख्य फरक हा आहे की:
लग्न = आयुष्यभर सुख दु:खात जपायचे नाते
वर्सेस
लिव्हईन = न पटल्यास सोडून द्यायची सोय

आणि इतकं सगळं होऊनही ह्याचे तोटे आहेतच. आता तर लिव्हईन मधे राहणार्‍या बाईला सुद्धा बायकोचे सगळे कायदेशीर अधिकार मिळावे असा फेमिनाझींनी कोर्टात अर्ज केलाय. म्हणजे गोल्ड डिगर्सना अजूनच बरं. दोन वर्ष रहायचं, अर्धी संपत्ती घेऊन सोडून जायचं.

जसे लग्नाचे चांगले वाईट परिणाम आहेत, तसेच किंवा त्याहून कैक पटीने लिव्हईनचे वाईट परिणाम आहेत.

लिव्हईन म्हणजे डाव हरणारच ह्या तयारीने खेळायला उतरणे. असल्या उथळ आणि सवंग मानसिकतेला आमचे समर्थन कधीही असणार नाही.

महत्वाचे - लग्नात होत असलेल्या हुंडा वगैरे प्रथा, मारून मुटकून संसार रेटणे, इत्यादि बोलबच्चन देऊ नये. हे करायची ज्याची मनोवॄत्ती असते तो लग्न असो वा लिव्हईन, हे सगळं करणारच. बंगळुरूमधे एक माणूस नोकरी सोडून लिव्हईन मधल्या मैत्रिणीच्या पगारावर ऐष करत होता. तिने त्याला बाईक वगैरेही घेऊन दिली. कैक महिने ह्याला पोसल्यावर तिला साक्षात्कार झाला आणि तिने पोलिसात जाऊन त्याच्यापासून सुटका करून घेतली. आणि सोडताना, लोन सेटल करून बाईकही देऊन टाकली.

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2018 - 6:17 pm | टवाळ कार्टा

कारण ह्या स्टेजला येऊन फक्त बेडमधली कंपॅटिबिलिटी बघणंच शिल्लक राहतं

यांच्याशी असहमत, बऱ्याचदा लोकांच्या सवयी समजायला वेळ जातो, लिव्ह-इनमुळे एकमेकांच्या सवयी कश्या आहेत आणि मुख्य म्हणजे तो किंवा ती एक माणुसम्हणून कशी आहे ते समजू शकते, काही झाले तरी एखादी व्यक्ती सदासर्वकाळ सद्गुणी असल्याचे नाटक नाही करू शकत
बाकी फसवणूक लग्नानंतर होण्यापेक्षा हे बरे, आणि तसेही एखाद्या पर्यायाचा चांगला वापर करण्यापेक्षा त्यातून आपला फायदा कसा होईल अशीच मानसिकता असेल तर लग्न असो वा लिव्ह-इन, फरक नाही

गामा पैलवान's picture

15 Jan 2018 - 6:56 pm | गामा पैलवान

अरुण जोशी,

गामाजींची वाक्यरचना दुर्दैवी आहे. लिविन वाल्यांचा प्रणय नक्कीच जनावर टाईपचा नसतो.

नाही हो. जनावरं बलात्कार करीत नाहीत. त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार होतोय वगैरे तक्रारींना जनावरी प्रणयांत वाव नाही. पटलं तर खाटलं नाहीतर फुटलं.

======================

माणूस हा जनावरापेक्षा उच्च मानावा का?

======================

मानवी प्रणय हा जनावरी प्रणयापेक्षा उच्च दर्जाचा मानावा का? हो वा नाही हे कशावरून ठरवायचं? काही निकष आहेत का?

आ.न.,
-गा.पै.

जनावर शब्दाचे दोन अर्थ होतात. १. मनुश्येतर जैविक एंटीटी २. नीच मनुष्य.
तुम्हाला दुसरा अभिप्रेत आहे असं समजून मी लिहिलं कि अगदी तसं नसतं. असं दिसतंय कि तुम्हाला पहिला अर्थ अभिप्रेत आहे.

गामा पैलवान's picture

16 Jan 2018 - 7:01 pm | गामा पैलवान

लिव्हिनात राहणारे थोर लोकं असल्याने नीच मनुष्ये हा अर्थ संभवत नाही.
-गा.पै.

लिविनची चिकित्सा करणारांनी बाई ठेवायची प्रथा कशी आली, असते याचा विचार करावा. मॉडेल सेम नसलं तरी सिमिलर आहे.

एमी's picture

17 Jan 2018 - 6:17 pm | एमी

कॉरेक्ट!

४००००+ रुपये महिन्याला देऊन बाई मिळवावी आणि ठेवावी लागण्याइतके हुच्च सेक्स अपील असणाऱ्यांनी आपापला खर्च आपण उचलून एकत्र राहणाऱ्यांची चिकित्सा करावी!

arunjoshi123's picture

18 Jan 2018 - 11:11 am | arunjoshi123

१. कोणी चिकित्सा करावी.
२. चिकित्सेचा खर्च कसा आपसांत वाटून घ्यावा
३. किती रु द्यावेत
४. सेक्स अपिल किती आहे
इ इ गौण आहे.

एमी's picture

18 Jan 2018 - 12:41 pm | एमी

गौण कसे काय?
चिकित्सा करणारे मजबुरी का नाम किंवा अंगूर खट्टे असू शकतात :-P

लिविन वाल्या पोरी चिकण्या असतात नि लग्नावाल्या बायका नसतात, असं काही नसतं ना हो.

मी बायकांच्या नाही मतप्रदर्शन करणाऱ्या पुरुषांच्या सेक्स अपिलबद्दल बोलतेय.
इथे लिव्हिनला नावे ठेवणाऱ्या कितीजणांना खात्री आहे कि आपल्याकडे पैसे नसते तरी आपली बायको आपल्याशी TTMM असलेलं लिव्हिन करायला तयार झाली असती/होईल?
तुम्ही जे उदा दिलंय त्यात किंवा मी जे पाहिलेत त्यात किंवा बाई ठेऊ शकणाऱ्या पुरुषात नक्कीच काहीतरी अपील असेल ना कि त्यांना लग्न न करता बाई मिळाली...

एखादी बाई अगदी फुक्कट मिळेल, एखादी बाई कशानंही मिळणार नाही. तेच पुरुषांचं. त्याचा नि तुमच्या प्रश्नाचा संबंध काय?

पैशासाठी लग्न करणाऱ्यांनी देहविक्रीला नावं ठेवू नयेत; तुम्ही खासगी क्षेत्रात आहात आणि ते सार्वजनिक क्षेत्रात, एवढाच फरक!
-मुगाबे

त्या ज्योतीबाई उत्तरे देत नाहीत का? यनावाला टाईप धागा पेरून जातात? काय राव, हे पुरोगामी लोक रॅशनॅलिस्ट म्हणवले जातात मग यांना संवादाचं वावडं का?
=============
त्या यनावालांनी तर हाईट केली होती. इथे मला उपस्थित केलेले प्रश्न उत्तरायैतकं डोकं मला नाही असं म्हणत पुरोगामी विचार, ते ही लोकांच्या डोक्यांच्या फंक्शनिंगवर टिका करणारे मांडले होते. काय अर्थ आहे असल्या गोष्टींना?

ज्योति अळवणी's picture

18 Jan 2018 - 11:35 am | ज्योति अळवणी

arjunjoshi123,

मी उत्तरे देते. जर आपण सुरवातीचे प्रतिसाद वाचले असाल तर ते आपल्या लक्षात येईल. परंतु त्यानंतर माझ्या लक्षात आले की काही सदस्यांची या धाग्याच्या माध्यमातून आपापसात चर्चा होते आहे. मजणून मी फक्त वाचक ही भूमिका घेतली. माझ्या मते मी काही लिहू शकेन असे अजून मुद्दे नाहीत. मूळ लेखामध्ये आणि नंतर प्रतिसादांमध्ये मी जे लिहिले आहे ते माझे मत आहे. मग परत परत वाद घालण्यात काहीच हशील नाही असे मला वाटले म्हणून मी प्रतिसाद देणे थांबवले.

arunjoshi123's picture

18 Jan 2018 - 11:45 am | arunjoshi123

ओके

परंतु त्यानंतर माझ्या लक्षात आले की काही सदस्यांची या धाग्याच्या माध्यमातून आपापसात चर्चा होते आहे.

मला तर असं काही वाटलं नाही. वेगवेगळे अस्पेक्ट्स मांडलेत विषयाचे लोकांनी.
------------------
नि मी नाव घेऊन तुम्हाला विवाह नि लिविन मधे संरचनात्मक फरक काय आहेत असं विचारलं तेव्हा तिथे काहीतरी लिहिणं अपेक्षित होतं.
----------------
इतरत्र नुस्तं वाचन केलं (वा नाही) तरी चाललं असतं.

ज्योति अळवणी's picture

18 Jan 2018 - 2:57 pm | ज्योति अळवणी

मी माझी मतं मंडली आहेत. परत वेगळ्या शब्दात तेच का लिहावं मी? म्हणून परत तेच लिहीण टाळलं इतकंच.

arunjoshi123's picture

18 Jan 2018 - 3:12 pm | arunjoshi123

ओके.

arunjoshi123's picture

18 Jan 2018 - 11:29 am | arunjoshi123

लिविन का चालू झालं? त्याचे फायचे अनेक आहेत.
१. उशिरा लग्न झाल्या सेक्स करायची इच्छा फार काळ दाबून ठेवणे अवघड झालं. मागची पिढी १४-१८-२० वयात लग्न करे. आत्ता ते २८-३५ असं झालं आहे एका विशीष्ट क्लासमधे.
२. शहरात नोकरी वा शिक्षणासाठी अनेक वर्षे एकटं राहणं अनैसर्गिक आहे. मनुष्य कुटुंबात राहतो. शिक्षण नि नोकर्‍यांमुळे माणसाचं १३ वी ते लग्न (मिलिटरी स्कूल असेल तर अजून पूर्वी) या काळात कुटुंबांचा संबंधच संपला.
३. वेगळे राहण्याचे खर्च वाढतो. एकत्र राहण्याने इकॉनॉमी ओफ स्केल येते.
४. एकत्र राहण्याचे बरेच अन्य फायदे आहेत. आजारी असताना सुश्रुषा.
५. जोडीदार, लग्न हे निर्णय / कामे आयुष्यातली सर्वात शेवटची केलेली आहेत. पण एक नैसर्गिक जोर असतोच. मनुष्य सामान्य असेल तर त्या काळात प्रेम होतं, भावना उत्पन्न होतात, इ इ
६. बोजड कायदे कोणालाही नको असतात. लग्न ही एक कायदेशीर बाब जास्त आणि व्यक्तिगत कमी असं झालं आहे. लिविन त्याची पळवाट आहे.
७. योनिशुचिता इ इ कल्पना मागास मानल्या जात आहेत. मुलाने वा मुलिने प्रेम, राडे, लफडे, चूक, पाय घसर्णी इ इ केले तर समाजाची प्रतिक्रिया सौम्य झाली आहे. त्यामुळे लिविन वा तत्सम संकल्पनांमधला मुख्य अडसर दूर झाला आहे.

हम्म हा प्रतिसाद चांगला आहे.

===
माझ्या ओळखितली ४ लिव्ह इन जोडपी होती २००२ ते २०१० काळात. पण मी कढीसाग वैयक्तिक प्रश्न विचारले नाहीत त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त सांगू शकत नाही.

एमी's picture

18 Jan 2018 - 12:47 pm | एमी

कढीसाग = कधीच

सुबोध खरे's picture

18 Jan 2018 - 7:36 pm | सुबोध खरे

मी पाहिलेल्या गोष्टी --
लिव्ह इन हि बहुतांश वेळेस एक तात्पुरती सोय म्हणून दिसते. सुरुवातीला आपण मुक्त/ आधुनिक आहोत हे लोकांना सांगायला किंवा दाखवायला जोडपी लिव्ह इन मध्ये जातात. काही जण थ्रिल म्हणून पण लिव्ह इन मध्ये जातात.
किंवा करियर मध्ये व्यस्त असल्यामुळे लग्नाच्या जबाबदारीत पडण्याची भीती नको वाटते म्हणूनहि काही लिव्ह इन मध्ये जातात.
बरेच पुरुष आणि काही स्त्रिया बांधिलकी( कमिटमेन्ट) नको म्हणून सुरुवातीला लग्नाला पर्याय म्हणून याकडे पाहतात आणि काही काळाने काही पुरुष आणि बऱ्याचशा स्त्रिया बांधिलकी हवी म्हणून अपेक्षा करू लागतात.
काही वर्षे गेल्यावर एक तर ते विभक्त होतात किंवा लग्न करतात.
ज्यांचे पटत नाही किंवा करियरच्या रेट्यात जमत नाही किंवा दोघांतील एकाला जरी बांधिलकी नको असेल तरी ते विभक्त होतात.
आणि ज्यांना एकमेकांबद्दल ओढ आणि प्रेम वाटतं अशी जोडपी लग्न करतात.
मी आतापर्यंत पाहिलेल्या/ऐकलेल्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यानी मुले होऊ दिलेली नाहीत. किंवा जेंव्हा आता आपण जबाबदारीला तयार झालो अशा जोडप्यांनी लग्न करणे पसंत केले.( काही लोकांचे लिव्ह इन मध्ये राहण्याचे थ्रिल संपले किंवा त्यांना मिळणारा "टी आर पी" कमी झाला असावा किंवा लिव्ह इन मध्ये राहताना येणाऱ्या कायदेशीर अडचणी कटकटीचा वाटू लागल्या असाव्या).
थोडक्यात लिव्ह इन या क्षणाला तरी एक तात्पुरती सोय आहे असेच मला वाटते आणि बहुसंख्य जोडपी आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी/ मुलांच्या भविष्यासाठी लग्नाद्वारे कायद्याचा/समाजाचा आधार घेताना दिसतात.
एकंदर लिव्ह इन चा बाऊ करण्याची गरज नाही किंवा त्याला जास्ती भाव देण्याचीही गरज नाही.

ज्योति अळवणी's picture

23 Jan 2018 - 9:16 am | ज्योति अळवणी

सुबोधजी आपल्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे