लिव इन आणि समाजाची मानसिकता
लेखनप्रकार
"अग ते माझ्या शेजारच्या flatमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं."
"काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात."
"अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. तर विचारल तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या."
'काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?"
दोन मैत्रिणी बागेत आपापल्या मुलांना खेळायला सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. मी नेमकी त्यांच्या बाजूच्याच बाकावर बसले होते त्यामुळे त्यांचा संवाद एकू आला आणि मनात विचार आला.. हे लिव इन नातं इतक का बर अस्वीकारार्ह्य असावं अजूनही? या दोघींची मुलं लहान आहेत म्हणजे या देखील जेमतेम तिशीच्या आतल्या असणार. ती नवीन आलेली शेजारीण देखील साधारण याच वयातली असू शकते. मग तरीही ती अशी लिव इन मध्ये का राहात असावी असा विचार या का नाही करत. थोडे नकारार्थी विचार का आहेत यांचे?
समजा एक मुलगा आणि एक मुलगी यांनी लग्न न करता रहायचे ठरवले तर त्या बाबतीत समाजाची नकारार्थी भावना का असावी? त्या मुलांच्या पालकांचे मत खूपच महत्वाचे असणार. पण मग तो त्या दोन कुटुंबांचा प्रश्न ठरतो. अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसते. अस का असावं? जर ते जोडपं सभ्यता पूर्वक रहात असेल तर इतरांना त्यात हरकत घेण्यासारखं काय असाव?
माझ्या एका मैत्रिणीने प्रेम केलं आणि वर्षभरातच लग्न केलं. तीन वर्ष झाली असतील-नसतील आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याच पटेनास झालं. अगदीच सतत आणि टोकाची भांडण व्हायला लागली तेव्हा तिने घटस्फोट घेण्याचं ठरवलं. तशी ती चांगल्या कंपनीमध्ये काम करत होती आणि भरपूर पगार देखील होता. पण खुद्द तिच्या आई-वडिलांनी सांगितलं अग अस एकदम घटस्फोट नको घेउस. सुधरेल तो हळूहळू. लग्न केलं आहेस न? मग थोडं सहन करायला शिक. तिच्या निर्णयात तिला फक्त मानसिक बळ हवं होत. पण तिच्या बाजूने तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. आज तिच्या लग्नाला चौदा वर्ष झाली आहेत. दहा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि नवरा एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. मात्र केवळ लग्न केलं आहे म्हणून एका छताखाली रहातात. ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर.
एक अजून घटना अगदी चांगली माहितीतलीच. दोघ मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात होते. मुलगी अजून शिकत होती त्यामुळे त्यांना तितक्यात लग्न करायचं नव्हत. मात्र कुटुंबाच्या आग्रहामुळे दोघांनी लग्न केल. शिक्षण चालू असेपर्यंत मुलीने पुढे काय करायचं याचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिने एका जाहिरात कंपनीत इंटरव्ह्यू देला आणि तिला खूप चांगली नोकरी मिळाली. तिचा performance इतका चांगला होता की तिला तिच्या कंपनीने वरची पोस्ट दिली. मात्र त्यासाठी तिला दुसऱ्या शहरात जावं लागणार होत. मात्र सासरच्यांनी नाही म्हंटल त्यामुळे तिला ती ऑफर घेता आली नाही.
अशा काही घटना पहिल्या किंवा ऐकल्या की वाटत की लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेण कितीतरी महत्वाच असत. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करीयर प्लान्स सगळ समजून घेण आवश्यक असत. केवळ 'आवडला/आवडली' म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे.
अर्थात इतकं प्रक्टीकल असावं का? हा देखील चर्चेचा विषय होऊ शकतो. लिव इन मधील मुला-मुलीच्या पालकांचा याबद्दल विचार/मत देखील महत्वाच आहे. मुख्य म्हणजे लिव इन म्हणजे 'लग्न न करता एकत्र राहाण'. मग जर पुढे पटलं नाही तर मग दुसरा पार्टनर का? आणि अस पटेपर्यंत किती लिव इन नाती? असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. अलीकडे pre-marrage councelling देखील असतच. पण 'अलीकडची पिढी' अस म्हंटल तरी या मुलांना देखील मन-भावना असतातच न. त्यामुळे जर पालकांनी थोडा विश्वास दाखवला तर ही मुलं सतत धरसोड वृत्तीने नक्कीच वागणार नाहीत. त्यामुळे लिव इन नात्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये अस मला वाटत.
वाचन
26261
प्रतिक्रिया
72
तुमची मुलगी एखाद्या मुलाबरोबर
In reply to तुमची मुलगी एखाद्या मुलाबरोबर by श्रीगुरुजी
Haahaha , on mobile, don't
In reply to तुमची मुलगी एखाद्या मुलाबरोबर by श्रीगुरुजी
लिव्ह इन आणि विवाह पद्धत यांची तुलनाच होऊ शकत नाही
लिव इन
लिव्हिन आणि बिनलिव्हिन
श्रीगुरुजी,
In reply to श्रीगुरुजी, by ज्योति अळवणी
वैयक्तिक प्रश्नाला संयमित
In reply to वैयक्तिक प्रश्नाला संयमित by एमी
जेव्हा एखाद्या पब्लिक फोरमवर
In reply to श्रीगुरुजी, by ज्योति अळवणी
मुलाने मुलीला सोडणे यात पुरूष
In reply to मुलाने मुलीला सोडणे यात पुरूष by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
In reply to श्रीगुरुजी, by ज्योति अळवणी
माझा दुसरा प्रश्न होता "समजा
हे लिव इन नातं इतक का बर
In reply to हे लिव इन नातं इतक का बर by झपाटलेला फिलॉसॉफर
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
पिक्टोग्राफ ! =))
In reply to पिक्टोग्राफ ! =)) by डॉ सुहास म्हात्रे
टक्याने
In reply to हे लिव इन नातं इतक का बर by झपाटलेला फिलॉसॉफर
हे अगदि खरय..
In reply to हे अगदि खरय.. by शित्रेउमेश
पुरोगामी हिंदू समाजात असली
वेल, जगाच्या गाड्याची गती
In reply to वेल, जगाच्या गाड्याची गती by एस
सहमत
लिव्हिन आणि स्त्री
In reply to लिव्हिन आणि स्त्री by गामा पैलवान
गा. पै. जी,
In reply to गा. पै. जी, by ज्योति अळवणी
पुरुषानं हवं ते करावं का.
In reply to पुरुषानं हवं ते करावं का. by गामा पैलवान
स्त्री आणि पुरुष यांच्यात
माणसानेस्त्रीयांनीच लग्नाची आणि एकपत्नीत्वाची सोय उत्पन्न केली आहे. असे असते तर आणखी दारुगोळा भरता आला असता ;)In reply to लिव्हिन आणि स्त्री by गामा पैलवान
ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख करतो
In reply to ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख करतो by सर टोबी
ज्योति अलवनि आणि ज्योती अळवणी
In reply to ज्योति अलवनि आणि ज्योती अळवणी by गामा पैलवान
गा. पै. जी आणि सर टोबी,
लिव ईन मध्ये पुरूष नंतर
.
लिव्ह इन मध्ये किती वर्षे
नुसतेच लिव्ह-इन पेक्षा लव्ह-इन असेल तर बरे !
In reply to नुसतेच लिव्ह-इन पेक्षा लव्ह-इन असेल तर बरे ! by चामुंडराय
+१
अनेक सोसायटीजमध्ये लिव इन
लिव ईनचा हेतु
ज्योतीजी,
पहिला प्रणय
In reply to पहिला प्रणय by गामा पैलवान
!!!
In reply to !!! by मराठी कथालेखक
जाता जाता
In reply to जाता जाता by मराठी कथालेखक
तर स्पृहणीय ठरत नसावी
In reply to !!! by मराठी कथालेखक
लिविन वाल्यांची ओळख
In reply to लिविन वाल्यांची ओळख by arunjoshi123
अर्थात त्यात हिशेब इतका जास्त
In reply to अर्थात त्यात हिशेब इतका जास्त by मराठी कथालेखक
पण तरी दोन समंजस व्यक्ती
In reply to पण तरी दोन समंजस व्यक्ती by arunjoshi123
अजून चार प्रयोग करणं तद्दन
In reply to अर्थात त्यात हिशेब इतका जास्त by मराठी कथालेखक
वा लिव इनमधील कुणाशी थेट
In reply to वा लिव इनमधील कुणाशी थेट by arunjoshi123
काय काय गप्पा झाल्यात हे थोडं
In reply to काय काय गप्पा झाल्यात हे थोडं by मराठी कथालेखक
लिव इन म्हणजे मुर्खपणा हा
In reply to लिव इन म्हणजे मुर्खपणा हा by arunjoshi123
दोघांत इतकं आहे म्हटल्यावर
In reply to काय काय गप्पा झाल्यात हे थोडं by मराठी कथालेखक
त्यांनी सांगीतलेली माहीत
In reply to त्यांनी सांगीतलेली माहीत by arunjoshi123
धन्यावाद
In reply to वा लिव इनमधील कुणाशी थेट by arunjoshi123
सगळ्यात माझ्यासारख्या
लिव्हईन हा मूर्खपणा आहे
In reply to लिव्हईन हा मूर्खपणा आहे by आदिजोशी
कारण ह्या स्टेजला येऊन फक्त
जनावरी प्रणय व मानवी प्रणय
In reply to जनावरी प्रणय व मानवी प्रणय by गामा पैलवान
जनावर शब्दाचे दोन अर्थ होतात.
In reply to जनावर शब्दाचे दोन अर्थ होतात. by arunjoshi123
नीच शक्यंच नाही
लिविनची चिकित्सा करणारांनी
In reply to लिविनची चिकित्सा करणारांनी by arunjoshi123
कॉरेक्ट!
In reply to कॉरेक्ट! by एमी
१. कोणी चिकित्सा करावी.
In reply to १. कोणी चिकित्सा करावी. by arunjoshi123
गौण कसे काय?
In reply to गौण कसे काय? by एमी
लिविन वाल्या पोरी चिकण्या
In reply to लिविन वाल्या पोरी चिकण्या by arunjoshi123
मी बायकांच्या नाही मतप्रदर्शन
In reply to मी बायकांच्या नाही मतप्रदर्शन by एमी
एखादी बाई अगदी फुक्कट मिळेल,
In reply to कॉरेक्ट! by एमी
पैशासाठी लग्न करणाऱ्यांनी
त्या ज्योतीबाई उत्तरे देत
In reply to त्या ज्योतीबाई उत्तरे देत by arunjoshi123
arjunjoshi123,
In reply to arjunjoshi123, by ज्योति अळवणी
ओके
In reply to ओके by arunjoshi123
मी माझी मतं मंडली आहेत. परत
In reply to मी माझी मतं मंडली आहेत. परत by ज्योति अळवणी
ओके.
प्रथा कशा चालू होतात?
In reply to प्रथा कशा चालू होतात? by arunjoshi123
हम्म हा प्रतिसाद चांगला आहे.
In reply to हम्म हा प्रतिसाद चांगला आहे. by एमी
कढीसाग = कधीच
मी पाहिलेल्या गोष्टी --
सुबोधजी आपल्या मतांशी मी