आज १४ ऑगस्ट . बऱ्याच वर्षांनी ह्या दिवशी भारतात असण्याचा योग आला. सकाळी बाहेर गेलो असताना एक मुलगा मोटारीपाशी तिरंगा विकावयास आला आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या.
८ऑगस्ट ४२ ला 'चले जाव' ची घोषणा झाली आणि त्याच रात्री काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक झाली व ते तुरुंगात गेले. चळवळीचे नेतृत्व दुसऱ्या/ तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे गेले. चळवळीचे स्वरूप बदलले . पण आम्हां ८/९ वर्षाच्या मुलांना फक्त एवढेच समजत होते की काहीतरी निराळे घडत आहे.
युद्ध संपले -- सर्व नेते सुटले आणि परत फरक जाणवला. ज्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते त्यांना आता दिलीहून आमंत्रणे येऊ लागली. आझाद हिंद सेनेच्या रंजीत कथा ऐकू येऊ लागल्या. 'कदम कदम बढाये जा' एकदम लोकप्रिय झाले.
थोडक्यात सर्व वातावरण बदलू लागले. स्वातंत्र्याच्या गोष्टी होत होत्या पण सर्व साधारण मनुष्याला कितपत समजत होते ह्याबद्दल शंकाच आहे. प्रसारमाध्यमे आतासारखी अमाप नव्हती. पुण्यात मुख्य वर्तमानपत्रे म्हणजे 'सकाळ', 'काळ' आणि 'केसरी'. मी १३/१४ वर्षांचा होतो. मला तरी फारशी चर्चा झाल्याचे आठवत नाही. ( माझ्या वयोगटात).
जशी जशी १५ ऑगस्ट ४७ ची तारीख जवळ येऊ लागली तसे तसे वातावरण भारावलेले होऊ लागले. मला तर ते दिवस खरंच मंतरलेले होते असेच आठवते.
मी १९४१/४२ पासून राष्ट्र सेवादलाचा सैनिक होतो. जसजसा दिवस जवळ येत गेला तसतसे नवीन उपक्रम सुरू झाले. त्यातला एक म्हणजे नवीन ध्वज तयार करणे. पुण्यात भिकारदास मारुतीशेजारी एका बिल्डिंग मध्ये दलाचे एक कार्यकर्ते राहावयाचे. त्यांच्या गॅलरीत बसून कामास सुरुवात झाली. कापडाचे झेंडे शिंपी बनवत होते तर आम्ही मुले कागदाच्या पताका व झेंडे करत होतो. महत्वाचे काम नंतरच होते. ह्या सर्व गोष्टी दारोदारी जाऊन विकणे! मी दापोडी पासून केळकर रस्ता २/३ आठवड्यात कव्हर केला. का कोणास ठाऊक पण एका इराणी दुकानात पताका विकल्याचा मला फारच आनंद झाला होता.
बघता बघता १४ ऑगस्ट उजाडला. उद्यापासून आपल्या लोकांचे राज्य येणार एवढेच महत्वाचे होते. राष्ट्र सेवा दलाचा असल्यामुळे माझे विचार एकाच विचारसरणीचे होते हे मी आधीच कबूल करतो पण हे सर्वांच्याच बाबतीत होते.
त्या दिवशी एका निराळ्याच विश्वात वावरत होतो, रात्रभर गादीखाली ठेवून इस्त्री केलेली अर्धी चड्डी , पांढरा शर्ट आणि वर गांधी टोपी अशा थाटात रात्री ८/९ च्या सुमारास मंडईच्या आसपास कोठेतरी (ठिकाण आता लक्षात नाही) सगळे जण जमलो.
सगळ्यांना मशाली देण्यात आल्या. तेथून मिरवणूक सुरू झाली. इतरही अनेक लोक मिरवणुकीत होते. असे करत करत मिरवणूक कलेक्टरच्या कचेरीपर्यंत पोहोचली. 'भारतमाता कि जय', 'इन्किलाब झिंदाबाद' अशा अनेक घोषणा देत समुदाय काही निराळ्याच मूड मध्ये होता.
बरोबर १२ वाजता सर्वत्र शांतता पसरली - UNION FLAG सन्मानपूर्वक खाली आला आणि त्याची जागा तिरंग्याने घेतली. समुदाय वेडा झाला आणि...
भारत स्वतंत्र झाला!
वाचने
14972
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वानुभव आहे? म्हणजे तुमचे वय
वय
In reply to स्वानुभव आहे? म्हणजे तुमचे वय by आनन्दा
अरे वा ! अनिवासिंनी
+१११
In reply to अरे वा ! अनिवासिंनी by डॉ सुहास म्हात्रे
+1 छान वाटतंय वाचायला..
In reply to +१११ by मोदक
फार म्हणजे फार मस्त वाटलं हे
सगळ्यांना मशाली देण्यात आल्या
सगळ्यांना मशाली देण्यात आल्या . तेथून मिरवणूक सुरु झाली. इतरही अनेक लोक मिरवणुकीत होते. असे करत करत मिरवणूक कलेक्टर च्या कचेरी पर्यंत पोहोचली. भारतमाता कि जय , इन्किलाब झिंदाबाद अशा अनेक घोषणा देत समुदाय काही निराळ्याच मूड मध्ये होता. बरोबर १व२ वाजता सर्वत्र शांतता पसरली - UNION FLAG सन्मानपूर्वक खाली आला आणि त्याची जागा तिरंग्याने घेतली. समुदाय वेडा झाला आणि भारत स्वतंत्र झाला.कितीतरी वेळा वाचतोय हा भाग. तुम्ही एक ऐतिहासीक क्षण याची देही घडताना पाहिलात. १९४७ पासून आज पर्यंत इतकी स्थित्यंतरे पाहिल्यानंतर स्वस्थ बसून पूर्वायुष्याकडे पाहताना कसे वाटते आहे? टिपीकल मुलाखत छाप प्रश्न विचारला गेला आहे याची जाणीव आहे.. मात्र तुम्ही नियमीतपणे लिहिते व्हावे अशी इच्छा आहे.अगदी!
In reply to सगळ्यांना मशाली देण्यात आल्या by मोदक
सहमत. अनुभव/लिखाण आवडले ...
In reply to सगळ्यांना मशाली देण्यात आल्या by मोदक
मस्तच
वा!!
खुप सुरेख.
सुरेख सुरुवात झालिये
फारच सुंदर अन सोप्या भाषेत
+१००१ मस्त लिहीलेय...
वाचून शहारे आले. _/\_ जय हिंद
सुंदर लेख.
मन भरून आलं. पहिला
लेख आवडला. तुमच्याकडून
मस्त लेख; आवडला...
तुमच्या नजरेतला थेट सोहळा आमच्या मनाला हेलावून गेला !
समयोचित लिखाण
@ अनिवासि
आह्ह्ह, अप्रतिम लिहिलय.
एक आठवण
कालच्या पेपर मधे आलेली
आवडला लेख
कालचा पेपर
तुमच्या सविस्तर
In reply to कालचा पेपर by अनिवासि
चांगले वर्णन.
१५ ऑगस्ट
In reply to चांगले वर्णन. by हेमंतकुमार
आभारी आहे !
In reply to १५ ऑगस्ट by अनिवासि
मध्यरात्रीनंतर पुढचा दिवस
In reply to चांगले वर्णन. by हेमंतकुमार
वाचते आहे.. किती जबरदस्त
अनिवासि काकांना काल
सध्या शब्दातील हृदयस्पर्शी
रोमांचकारी
१५ ऑगस्ट ४७ साजरे करणे नक्कीच