मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'गुलज़ार'

सत्यजित... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे! दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे! जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे! कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे! शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे! —सत्यजित

वाचने 7229 वाचनखूण प्रतिक्रिया 12

In reply to by चांदणे संदीप

पुंबा Tue, 08/22/2017 - 17:22
++११ आणखी वेगळे आकृतीबंध ट्राय करून पहा असे सुचवतो..

In reply to by सत्यजित...

एस गुरुवार, 08/24/2017 - 13:16
तुम्ही इतर फॉरमॅटमध्ये आणि विशेषतः मुक्तछंदात तुमच्या गझलांप्रमाणेच अप्रतिम असे काही लिहित असाल असे वाटले. किंवा नसाल तर लिहून पहा. वाचायला आवडेल.