'गुलज़ार'

सत्यजित... जे न देखे रवी...
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे! दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे! जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे! कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे! शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे! —सत्यजित
वर्गीकरण
लेखनविषय:

12 टिप्पण्या 7,229 दृश्ये

Comments

पुंबा नवीन

In reply to by चांदणे संदीप

++११ आणखी वेगळे आकृतीबंध ट्राय करून पहा असे सुचवतो..

एस नवीन

In reply to by सत्यजित...

तुम्ही इतर फॉरमॅटमध्ये आणि विशेषतः मुक्तछंदात तुमच्या गझलांप्रमाणेच अप्रतिम असे काही लिहित असाल असे वाटले. किंवा नसाल तर लिहून पहा. वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

आवडली गझल. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे