सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!
दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!
जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!
कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!
शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!
—सत्यजित
वाचने
7230
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
परवा गुलजार साहेबांच्या
गुलजारसाहेबांबद्दल काय बोलणार
+१
In reply to गुलजारसाहेबांबद्दल काय बोलणार by एस
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to +१ by चांदणे संदीप
++११
In reply to +१ by चांदणे संदीप
प्रतिसादाबद्दल धन्यवाद एस!
काही विशेष नाही
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद एस! by सत्यजित...
झकास.
मनःपूर्वक धन्यवाद सर!
In reply to झकास. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा!
खुप छाम सत्यजितजी
धन्यवाद पैसा,पंडितजी!