मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवाजी महाराज -- काही रेखाचित्रे

मैत्र · · कलादालन
शिवचरित्राशी संबंधित काही रेखाचित्रे सुमारे दहा अकरा वर्षांपूर्वी काढली होती. शिवजयंतीपासून मिपाकरांसोबत हा आनंद वाटण्याचा विचार होता. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने जमलं. चित्रं जुनी आहेत तशी आणि काही प्रमाणात खराब झाली आहेत. तसेच फोटो घेताना थोडी बहिर्वक्रता आली आहे त्याबद्दल क्षमस्व. महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'महाराज' या पुस्तकात ज्येष्ठ आणि अत्यंत प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलेली असंख्य अप्रतिम चित्रे आहेत. ती पाहून केलेला हा प्रयत्न आहे. काही कमीजास्त असेल किंवा चूक असेल तर ती माझी आहे. मूळ चित्रे म्हणजे प्रतिभा आणि इतिहासाचा अभिमान यामुळे केवळ नतमस्तक व्हावे याच दर्जाची आहेत. राज्याभिषेकाचं चित्र अप्रतिम सुंदर आहे आणि त्या प्रसंगाचा विचार करताना तेच डोळ्यापुढे उभं राहतं. पण तेवढं कौशल्य माझ्याकडे नव्हतं. ___________________________________________________________________________________________________ वैभव देवगिरीचे
From Shivaji Maharaj Photos_Latest
मावळचे मैतर ... उद्याचे लढवय्ये !
From Shivaji Maharaj Photos_Latest
विनाशाय च दुष्कृताम !
From Shivaji Maharaj Photos_Latest
पक्षी पिंजर्‍यातून उडाला...
From Shivaji Maharaj Photos_Latest
रणझुंजार मर्दमराठा !
From Shivaji Maharaj Photos_Latest
आनंद वन भुवनी || ....
From Shivaji Maharaj Photos_Latest
लेखनविषय:

वाचन 38603 प्रतिक्रिया 58