Skip to main content

जगायास कारण ईतकेच आहे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 09/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2730
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे!
हेच आवडया! Sandy

अनिंदीता,सानझरी मनःपूर्वक धन्यवाद!