जगायास कारण ईतकेच आहे...
नवे रोज धागे नवा पेच आहे
जगायास कारण ईतकेच आहे!
कुणी एकटा जात नाही प्रवासा
कुणी चालताना कुणा ठेच आहे!
कुणी आरसा काल देवून गेले
मला भेटतो मी नव्यानेच आहे!
कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे
उभे विश्व सारे फुकाचेच आहे!
नको फार त्रागा करु तू उन्हाचा
सखी सावली या उन्हानेच आहे!
—सत्यजित
वाचने
2730
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे!हेच आवडया! Sandy
कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे
उभे विश्व सारे फुकाचेच आहे!
व्वा !
संदीप,फुत्कार धन्यवाद!
अप्रतिम !!! कविता आवडली.
नको फार त्रागा करु तू उन्हाचा
सखी सावली या उन्हानेच आहे!
वाह्.. अप्रतिम लिहीलंय..
अनिंदीता,सानझरी मनःपूर्वक धन्यवाद!
सुंदर!
:)