मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगायास कारण ईतकेच आहे...

सत्यजित... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित

वाचने 2730 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चांदणे संदीप 09/05/2017 - 10:08
नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे!
हेच आवडया! Sandy

सत्यजित... 25/05/2017 - 02:45
अनिंदीता,सानझरी मनःपूर्वक धन्यवाद!