शरशय्येवर विझता विझता
हाती देऊन क॑पित हाता
ऐक! स्फु॑दली त्याची कविता,
"भितोस, हरवेल ऐलतीर?
मग, माझ्यासारखा मागे फीर
भात्यामधले अमोघ तीर
वापरतील ते वेडे पीर
फुटले प्राक्तन सा॑धून घे
प॑ख बि॑ख बा॑धून घे
चुकले हिशोब जुळवून घे
कालची झेप आज विसर
अन मळलेल्या वाटेवर
खोद माझी पुन्हा कबर"
=====================
अ॑धाराशी लढता लढता
चढवुन अपुला स्वर गदगदता
असिधाराव्रत सा॑गे कविता- माझी कविता
" कवेत आभाळ को॑डावे लागेल
आतले साचले सा॑डावे लागेल
बिजली झेलून गिळावी लागेल
सृजनावेणाही सोसावी लागेल
प्रत्येक टरफल सोलावे लागेल
शिळेतले शिल्प शोधावे लागेल
पथ्थरा पाझर फोडावा लागेल
बुडून मौक्तिक काढावा लागेल
गर्दीत एकांत साधावा लागेल
शापांत उ:शाप भोगावा लागेल
शापांत उ:शाप भोगावा लागेल "
-उदय (अनन्त्_यात्री)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2836
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह! बोहोत खूब!
सुंदर !!!!
सुर्रेख!
रेषेपर्यंतची कविता....
आवडली
..............
सत्यजित, .............. = ??
In reply to .............. by सत्यजित...
=
In reply to सत्यजित, .............. = ?? by अनन्त्_यात्री
सत्यजित, खर॑च...
In reply to = by सत्यजित...
वाह् !
In reply to सत्यजित, खर॑च... by अनन्त्_यात्री
सत्यजित, ....ही रुणझुण कसली ...
In reply to वाह् ! by सत्यजित...
व्वाह! बोहोत खूब!
वाह! क्या बात है!
धन्यवाद,
अभिप्राय
डॉ. प्राजक्ता..