मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्याची कविता, माझी कविता

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शरशय्येवर विझता विझता हाती देऊन क॑पित हाता ऐक! स्फु॑दली त्याची कविता, "भितोस, हरवेल ऐलतीर? मग, माझ्यासारखा मागे फीर भात्यामधले अमोघ तीर वापरतील ते वेडे पीर फुटले प्राक्तन सा॑धून घे प॑ख बि॑ख बा॑धून घे चुकले हिशोब जुळवून घे कालची झेप आज विसर अन मळलेल्या वाटेवर खोद माझी पुन्हा कबर" ===================== अ॑धाराशी लढता लढता चढवुन अपुला स्वर गदगदता असिधाराव्रत सा॑गे कविता- माझी कविता " कवेत आभाळ को॑डावे लागेल आतले साचले सा॑डावे लागेल बिजली झेलून गिळावी लागेल सृजनावेणाही सोसावी लागेल प्रत्येक टरफल सोलावे लागेल शिळेतले शिल्प शोधावे लागेल पथ्थरा पाझर फोडावा लागेल बुडून मौक्तिक काढावा लागेल गर्दीत एकांत साधावा लागेल शापांत उ:शाप भोगावा लागेल शापांत उ:शाप भोगावा लागेल " -उदय (अनन्त्_यात्री)

वाचन 2828 प्रतिक्रिया 0